दु: खातही काहीसे सुख शोधणारी …कल्पनाच किती रम्य …! दिवस हे असे काहीसे उदास कशाचीच शाश्वती नसणारे ..आपल्या प्रियजणांना कधी भेटता येईल याचा काहीच अंदाज न येणारे ..
पण ..पण ….
आपल्या मनातील राजसा सोबत ..Lock down झाल्यावर काय काय ..सुंदर होऊ शकेल ..याची कल्पनाच करू शकणारे …आणि ते स्वप्नात तरी प्रत्यक्षात उतरवू शकणारे ..असे हे …कल्पनेतील …दिवस …
मुग्धाला गाढ झोप लागली होती …अन् उशीर झाल्या मुळे आई उठवत होती ….
मुग्धा ..ऐ मुग्धा ..उठ ग ….किती उशीरापर्यंत झोपतेस
लाँकडाउन असल्यामुळे ..कामवाल्या मावशी पण येत नव्हत्या …त्यामुळे आईची कुरकुर सुरु होती …
मुग्धाला जाग आली …तिला कळेचना …आपण नेमके कुठे आहोत …..
आणि ..आणि …
ती पुन्हा .त्या रम्य स्वप्नात …हरवून गेली …
बहूदा …तो शनिवार असावा ….नाही तो शनिवारच …आहे ….न कर्त्याचा वार …शनिवार ..असे म्हणण्याची आपल्या एक पद्धत आहे …..पण इथे तर …सगळ्या सुंदर गोष्टी आमच्यात …शनिवारीच झालेल्या …सकाळ झाली तीच …तुझ्या मिठीत असल्याची …सुंदर जाणीव देऊन ….उठावे कि नाही ….कि असेच पडुन रहावे काही वेळ …या विचारात मी …..तु असा गाढ ..झोपलेला …मला घट्ट पकडून ..जसे काही मी पळूनच जाणार आहे कुठे …मिठी सैल झाली तर्…असे गोड भाव….तुझ्या चेहऱ्यावर ….
पण काही तरी मस्करी करण्याच्य मुड मध्ये मी …..हळूच उठले ..आणि ….केस ओले करून आले ….केस झटकून ..त्याच्या चेहऱ्यावर …. उडवले पाण्याचे तुषार .. त्याच्या चेहऱ्यावर …आणि …….तो उठायच्या ऐवजी …मलाच घेतले …ओढून त्याने परत एकदा ..त्याच्या जवळ …।…वेडाच आहे तो अगदी …..
पण आज ….चहा तर….तोच ..करणार आहे ….हे तर ठरलेलेच होते …….मस्त चहा पिउन ..मुडही …मस्तच झालेला ….त्यामुळे long drive ला जाऊन ..बाहेरच …जेवून येऊ असे ठरले …।पण आज मी drive करणार ..असे ठरले …..कुठल्याच नियमात ..न् बसणारे ..माझे driving त्याला tension आणणारे ..आणि मला त्याचीच मजा येणारे ……चर्चेला कुठल्याही विषयाचे बंधन नसणारा …तो आम्ही केलेला सुंदर प्रवास ..।कधीच संपू नये असे वाटणारा ….. घरी आल्यावर ह्या सगळ्याची एक वेगळीच …..नशा ..काही अपेक्षा …मला पण हवीहवीशी ….त्याचा ..डोळ्यात …मला दिसली….अपेक्षा पुर्तीचा क्षण हळूहळू …जवळ येत चाललेला …….खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर …….त्याचा आवडता ड्रेस …..Hot pant and top ….घालून आले ….आणि त्याला ….वेडे करून टाकले ….त्याची पण तयारी ..काही कमी नव्हती …..मोगऱ्याचा …गंध असा …खोलीभर …भरुन टाकलेला ……धुंद ..होऊन गेलो ……आम्ही दोघेही खूप खूप ….्वेगळ्याच ..दुनियेत घेऊन गेला ..तो मला ….नाही माहिती किती वेळ …….तो कोजागिरीचा चंद्र आणि मी .. एक तहानलेली ….मुग्धा …. …हाच तो क्षण …दोघांनाही त्रुप्त….करणारा ….आता ह्या क्षणी ..जीवन थांबले तरी चालेल याची अनूभूती देणारा ….गगना गंध आला ….मधुमास धुंद झाला …..
वैशाली जोशी खोडवे








