काही गुन्हे अक्षम्य असतात
अक्षम्य -भाग-१७
माझ्या कृत्याची जाणीव झाल्यावर मी अंधारात चाचपडतच घरी आलो.आई देवाजवळ दिवा लावत होती
कुठे गेला होता आनंद?
आईकडे बघण्याचे धैर्य शलाकाच्या दारीच संपवून आलो होतो. मी सरळ वर गेलो.बेडरुमच्या खिडकीकडेही मी बघू शकलो नाही. नंतरही कित्येक दिवस मी खिडकी बंदच ठेवली.सरळ बेडवर स्वतःला झोकून दिले.
मी काय करुन बसलो होतो?
क्षणिक आनंदासाठी मला आता कायमची अपराधीभावना
छळणार होती. दुसऱ्या दिवशी काॕलेजमध्ये गेलोच नाही.पण घरी राहलो तर मला वेड लागले असते म्हणून नंतर काॕलेजमध्ये जाणे सुरु केले. शलाका दिसली नाही काॕलेजमध्ये.सर नियमितपणे काॕलेजमध्ये यायचे. सरांना काहीही माहित नव्हतेच.
शलाकासाठी मी वेडापिसा झालो होतो.पण आता डोके जागेवर आले होते.
शलाकाला काय वाटत असेल? ह्या विचारानेच अंगभर शहारे यायचे.
मला शलाकासोबत लग्न करायचे होते.
आईला समोरासमोर मी विचारु शकत नव्हतो.
बाबांना फोनवर सांगितले. आणि शलाकाच्या वडिलांना विचारायलाही सांगितले.
बाबा तयार झाले लगेच पण मी घाई का करतोय हे त्यांना कळत नव्हते.
शलाकाचे बाबा लग्नासाठी तयार झाले. पण शलाकाच्या आईसारखे ते माझ्यावर खूष कधीच नव्हते.त्यांना नेहमी त्यांच्या लेकीसाठी माझ्यापेक्षा योग्य जोडीदार मिळाला असता असे वाटायचे.
लग्न झाले.मी केलेल्या पापाचे प्रायश्चित झाले असे वाटले मला.पण तसे नव्हते.शलाकासाठी ते विसरणे शक्य नव्हते.
लग्न झाल्यानंतर तिला नाॕर्मल व्हायला बरेच दिवस लागले.
मुक्ताच्या जन्मानंतर ती खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यात रुळली.पण ती मला फसवत आहे ही बोच तिच्या मनात कायम होती.त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे मुक्ताचा बाप मी नाही हा तिचा समज मला जास्त वेदना देतो.
पण मी शलाकाला फसवले नाही.जर मी तिच्यासोबत लग्न केले नसते तर अपराधी ठरु शकलो असतो.आणि मला ती आवडायची म्हणून माझ्या हातून आगळीक झाली.
खरेच मी समजतोय तेवढा मी चुकलो का? आणि मीही शिक्षा भोगलीच कि शलाकासोबत.पश्चातापाच्या आगीत मीही जळत राहलो.
कित्येक दिवस आईबाबांच्या नजरेला नजर नाही मिळवू शकलो.
पण आता पुढे काय? मी शलाकावर उपकार केले याची पदोपदी शलाका आणि आई जाणीव करुन देत आहेत.हीच गोष्ट माझ्यासाठी त्रासदायक ठरत आहे.
माझ्या गुन्ह्याचे परिमार्जन होण्याऐवजी गुन्हा उपकारात बदलला आहे.आता हे सगळे सहन करण्यापलीकडे चालले.
शलाकाला सांगणे गरजेचे आहे त्याशिवाय मनाला स्वस्थता लाभणार नाही.
बाबाssss
काय ग मुक्ता?कधी आली?
हे काय आताच.
आईबाबा तुम्ही तर उद्या येणार होते.
तुझ्या आईने आणले रे लवकर परत.बाबा म्हणाले.
खूप दिवसांनी घराबाहेर पडले होते.जरा चार दिवस तरी राहायचे होते.
मला इथेच बरे वाटते आनंद असे म्हणत आई चहा बनवायला लागली.
तेवढ्यात शलाकाही आली.
आले का सगळे परत.आई काही जास्त दिवस राहू शकणार नाहीत हे माहितच होते मला.शलाका म्हणाली.
आईने शलाकासाठीही चहा ठेवला.
आई,तुम्ही प्रवासाने थकल्या असणार.मी स्वयंपाक करते आज. चहा पिता पिता शलाका बोलली.
हो ग शलाका मी पडते जरा आता.
जेवण आटोपले.मुक्ताची बडबड चालू होती.
आजोबा
बोला मुक्ताराणी.
मी नं आता आत्यासारखे डाॕक्टर बनायचे ठरवले.
सगळे हसायला लागले.
शलाका….आनंदने आवाज दिला.
अग,उद्या मी काॕलेजच्या कामासाठी बाहेर चाललो,दोन दिवस लागतील परतायला.
लग्नानंतर आनंद पहिल्यांदाच एकटा कुठे चालला होता.
शलाकाला आश्चर्य वाटले.
काय काम आहे रे आनंद.
अग First year चे पेपरस् सेट करायला बोलवले.म्हणजे आधी मिटींग आहे त्यासंबंधी .
अच्छा.
चल तू पण सोबत.
नाही रे तू दिवसभर कामात राहशील.मी एकटी काय करणार तिथे?
आनंद गेला.शलाका ह्या घरात पहिल्यांदाच आनंदशिवाय राहली.
आनंदने दिवसभर कामे केली.रात्री हाॕटेलमध्ये राहावे लागणार होते.झोपायला बेडवर आडवा झाला.पण बेडवर येण्याआधी डोळ्यात असलेली झोप आता पार लांब गेली होती.डोळ्यासमोर ती रात्र उभी राहली.
आयुष्यातील सर्वच क्षण क्षणभंगूर नसतात.काही क्षण कायम पाठलाग करतात.
नेमके पाठलाग करणारे क्षण त्रासदायक ठरतात.
आनंदने आता मनात ठरवले,भूतकाळात घडलेले सगळे खोडून टाकायचे,आयुष्यातुन ते क्षणभंगूर नसलेले क्षण आता पार हद्दपार करायचे.आयुष्याची नव्याने सुरुवात करायची.फक्त मला माहित असलेले सत्य आता मी विसरायलाच हवे.
आनंद मनाशीपक्का निर्धार करत झोपी गेला.
पहाटेच त्याला जाग आली.आजचा सूर्य खऱ्या अर्थाने नवी पहाट घेऊन आला.आनंदला त्याचे मन निरभ्र,स्च्छ झाल्याचे जाणवले,मनावर पाच वर्ष लादलेले ओझे आजच्या सूर्योदयाने उतरवले होते.त्याने शलाकाला फोन केला.
आनंद येतो आहेस नं उद्या,?
हो ग.पण रात्रच होईल परतायला.
आईबाबा काय करत आहेत?
मुक्ता कुठे आहे? अशी विचारपूस करुन आनंदने फोन ठेवला.
क्रमशः
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.






अक्षम्य चा बोध झाला , छान कथा