अक्षम्य भाग-८

काही गुन्हे अक्षम्य असतात.
अक्षम्य
भाग-८
लिलावतीताईंची प्रकृती जरा ठीक नव्हती.शलाका दूपारी त्यांना भेटायला गेली .
नक्षत्रा आज घरीच होती.लिलावतीताई नुकत्याच झोपल्या होत्या.शलाका नक्षत्राशी बोलता बसली,
नक्षत्रा,कसे चाललेय काॕलेज इथून सुरु झालेल्या गप्पा तुला तुझ्यासोबत जे झाले ते आठवून खूप त्रास होत असेल ना.
हो ताई, डोक्यात सतत तेच येत राहते. आठवले कि शरीराला कंप सुटतो, जीव कासावीस होतो, मनाची अस्वस्थता वाढते.
ताई मला नेमके काय वाटते सांगू नाही शकणार मी. इच्छेविरुद्ध कोणी ओरबाडणे  खूप  अपमानजनक वाटते ताई. लाज वाटते स्वतःची स्वतःला.
त्या दिवसानंतर मी आरशातसुद्धा बघू शकले नाही.
आरशात माझे प्रतिबिंब आता स्वच्छ नाही दिसत मला.धूसर झाले ते आता कायमचे.
आरशातील प्रतिबिंब जर धूसर दिसते तर मी ….मी मला स्वतःला कशी दिसत असणार?
किळसवाणा वाटतो सगळा देहच आता.
अग,पण त्यात तुझी का चूक? ज्याने केले त्याला शिक्षा मिळाली त्याच्या कर्माची.
ताई,त्याची शिक्षा संपणारी आहे. शिक्षा संपली कि त्याचे आधीसारखेच जगणे सुरु होणार. 
पण माझ्या देहाचे काय? माझा काय गुन्हा होता ताई?
जो गुन्हा मी केला नाही त्याची शिक्षा मी जन्मभर भोगणार.
सुंदर आयुष्य होते माझे. 
आईबाबा,माझी लहान बहीण नाजूका. हसरं खेळतं घर होते आमचे. एका दिवसात त्याने घराची रया पालटली.
परिस्थिती गरीब होती पण ती बदलवण्याची ताकद आईबाबा आमच्यात पेरत होते.
आणि  अचानक त्याने…..नक्षत्रा पुढे बोलू शकली नाही.
नक्षत्रा पुढे उभे आयुष्य आहे.एखादे दुःस्वप्न समजून विसरुन जा ते.
ताई इतके सोपे नाहीय ते.
त्या माझ्या वेदना कोणीही समजून नाही घेऊ शकणार?
पण तुला प्रयत्न करावाच लागेल विसरण्याचा.
दुसऱ्यांच्या चुकांचे ओझे तू का बाळगायचे नक्षत्रा?
माझे दुर्भाग्य समजा ताई.
नक्षत्रा दुसऱ्यांची चूक जन्मभर वागवत त्याच्या वेदना भोगत राहशील तर ती तुझी चूक  ठरेल.
मी तुझी केस जिंकण्यासाठी घेतलेली मेहनत व्यर्थ जाणार.आनंदसर तुला लागेल ती मदत करणार.का? तू पुढे जावे यासाठीच नं.
आणि तूच तुझ्यावर झालेला अन्याय कुरवाळत बसली तर तू पुढे  तरी कशी जाणार?
विसर झालेले.काढून टाक सगळे मनातून.
देहाची विटंबना झाली.मन स्वच्छआहे तुझे. त्याचा आधार घे.मनाची ताकद कितीतरी मोठी असते.
नक्षत्रा शलाकाकडे बघतच राहली.
ताई मला क्षमा करा.
मी नक्की प्रयत्न करते तुम्ही सांगितले तसे वागण्याचा.
आता कशी शहाण्या मुलीसारखी बोलत आहेस.
शलाकाने नक्षत्राला तर समजवले होते पण स्वतःच्या मनाची समजूत घालणे नव्हते जमत तिला. तिच्या मनाची ताकद ती आजमावत नव्हती.
लिलावतीताई जाग्या झाल्या.त्यांना भेटून,काळजी घ्यायला सांगून शलाका घरी आली.
 आनंदसोबत काॕलेजमधून एक महिला शलाकाला भेटायला आली.त्याने दुपारी शलाकाला फोन करुन तसे सांगितले  होते.
 सोबता तिला कोर्टात नवऱ्याच्या विरोधात केस टाकायची आहे  हेही  सांगितले.
आनंदने ओळख करुन दिली.
शलाका ह्या मिसेस् अस्मिता.अस्मिता पवार.आमच्याच काॕलेजमध्ये आहेत.अर्थशास्त्र शिकवतात.
नमस्ते मिसेस् पवार.
अहो मला अस्मिता म्हंटले तरी चालेल.
बरं.
अस्मिता आधी आपण चहा घेऊ आणि मग बोलूया. तुम्हाला घाई तर नाही नं.
नाही हो निवांत आहे मी.
उलट घरी जायला जेवढा उशीर होईल तेवढे बरे.
बसा तुम्ही जरावेळ आनंदशी गप्पा मारत.
मी आलेच चहा घेऊन.
चालेल.
शलाका चहा घेऊन आली. चहा पिता पिता शलाकाने बोलणे सुरु केले.
बोला अस्मिता.
याआधी आनंदकडून एक दोनदा तुमचा उल्लेख  ऐकला मी.
हो का?
तुमच्या हुशारीबद्दल सांगितले होते त्यांनी.
मी आज का भेटायला आली याची कल्पना आनंदसरांनी दिली असेल. तुम्हाला?
हो.थोडीफार.
शलाका मी अर्थशास्त्रात पी.एच.डी केली आहे. नवरा कस्टममध्ये कमिशनर आहे.आम्हाला एक मुलगी आहे.नववीत आहे.म्हणजे लौकिकार्थाने आमचे सुखी कुटूंब आहे.
सासर श्रीमंत आहे. सासरी भरपूर शेती.दिर,नणंद यांची आमच्यावर काहीही जबाबदारी नाही.इथे तीन बेडरुमचा फ्लॕट आहे. त्यात आम्ही तिघेच राहतो.
सासरचे लोकं कामानिमित्त आले तर आले.त्यांचा मला काहीही त्रास नाही. नवऱ्याचे माझ्या काहीच बंधने नाहीत. मी नौकरी करत नव्हते तरीही मला आर्थिक स्वातंत्र्य होते. वर्षातून एकदा आम्ही परदेशवारी करतो.
अरे वा!छान चाललाय तुमचा संसार.
एकंदरीत मजेत चाललयं तुमचे आयुष्य 
शलाका बोलली.
वरवर बघता तुम्ही असे समजू शकता.
सगळे तसेच समजतात. सगळी सुखे माझ्या पायावर लोळण घेत आहेत असेच सगळ्यांना वाटते.
कुणाला काही सांगितलं तर मलाच सुखाची व्याख्या ऐकवतात.
आई तर म्हणते,अस्मिता सुख सुख म्हणजे अजून काय असते?
तुला जे मिळाले यातले खूप स्त्रियांना काहीही मिळत नाही.
सोन्यासारखा संसार आहे.सांभाळून ठेव बाई तो.
मैत्रिणी म्हणतात अजून काय हवे ग तुला?
गाडी,ड्रायव्हर,नौकर,पैसा सगळे तर आहे तुझ्याजवळ.
आनंद आणि शलाकाला आता थोडे आश्चर्य वाटायला लागले. नेमके काय दुःख असणार? दोघांनाही प्रश्न पडला
पवार मॕडम कुणालाही तुम्ही सांगितले ते ऐकून तसेच वाटेल. आनंद बोलला.
हो.खरयं तुमचे आनंदसर.
पण मला घटस्फोट घ्यायचाय.
काय बोलता अस्मिता तुम्ही?
मी मनातलच बोलतेय.मी पूर्ण विचार करुन हा निर्णय घेतला.
का पण?
माझ्या एकटेपणामुळे.
नवऱ्याला माझ्यासाठी वेळ नाही. मी कंटाळले एकटेपणाला.
अहो मॕडम त्यांची समजूत घालता येईल.
समूपदेशन करता येईल.एकदम घटस्फोट कशाला?
झाले हो सगळे प्रयत्न करुन. गेली चारपाच वर्ष तेच करतेय मी. खूप प्रयत्न केले.प्रेमाने,रागाने समजवून झाले.
मला भेटता येईल का त्यांना ? शलाकाने विचारले.
तो माणूस सतत बिझी असतो.
पण त्यांना एकदा तरी भेटायला हवे.
तुम्ही त्यांना घटस्फोट घेणार हे सांगितले का?
क्रमशः
मुळ कथेची कल्पना-विशाल भोवते
अस्मिताच्या आयुष्यात पुढे काय होते….वाचा पुढील भागात
पुढील भागाची लिंक

https://marathi.shabdaparna.in/अक्षम्य-भाग-९

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!