.आशिकी गर्ल-अनू अग्रवाल
सौ. दर्शना भुरे…
11 जानेवारी अभिनेत्री अनू अग्रवाल चा आज वाढदिवस..
सुरुवातीला मॉडेलिंग सारख्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनू अग्रवालने …
1988…साली आलेल्या इसी बहाने नावाच्या टिव्ही सिरीयल मध्ये पहिल्यांदा अभिनय केला.तेव्हा तिने अभिनय क्षेत्रात येण्याचा मुळीच विचार केला नव्हता.
ती आपल्या व्यवसायात खुश होती.
पण योगायोगाने तिची भेट एका कार्यक्रमात निर्माते महेश भट्ट यांच्यासोबत झाली.
तेव्हा ते त्यांच्या आगामी चित्रपटासाठी एका नवीन नायिकेचा चेहऱा श़ोधत होते तिथे त्यांनी अनूला पाहिले आणि अनू च्या रुपात त्यांना चित्रपटातील भूमिकेसाठी योग्य नायिका भेटली.. तो सुपर हिट चित्रपट होता. 1990 सालात आलेला चित्रपट आशिकी..
महेश भट्ट च्या आशिकी चित्रपटातून तिने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले .आशिकी मधील तिच्या दमदार अभिनयाने अनूला रातोरात स्टार बनवले.. मासूम चेहऱा, निरागस हास्य असणारी ही अभिनेत्री लोकप्रिय झाली.
आशिकी चित्रपटातील अनू अग्रवाल सारखी प्रेमिका सर्वांना हवीहवीशी वाटू लागली होती.तरूणाई आपल्या प्रेमिकेमध्ये अनूची छबी पाहू लागली.
तरूण पिढीमध्ये ती आशिकी गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली..
अनू अग्रवाल ने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत एकूण फक्त आठ चित्रपट केले ..
गजब तमाशा, किंग अंकल, खलनायिका, जन्म कुंडली, रिटर्न ऑफ ज्वेलथीप ..
पण त्या चित्रपटातून तिला पाहिजे तसे यश मिळाले नाही.
1993…मध्ये तिने तामिळ चित्रपट
थिरुदा थिरुदा मध्ये अभिनय केला.
.रिटर्न ऑफ ज्वेलथीप हा तिच्या फिल्मीकरिअर मधील शेवटचा चित्रपट ठरला..यानंतर अनूने या जगमगत्या दुनियेपासून कायमस्वरूपी दूर राहण्याचा निर्णय घेवून
आपण या फिल्मी दुनियेसाठी बनलेलो नाही असा विचार केला.
व यापुढे फक्त आणि फक्त
स्वत:साठी, स्वत:च्या आवडत्या कार्यासाठी वेळ देण्याचे ठरविले..
तिने योगाचा सराव सुरू केला , देश विदेश भ्रमंती सुरू केली . सर्व काही तिच्या मनाप्रमाणे सुरळीत चालू असताना अचानक एक दिवस तिच्या आयुष्याने एक वेगळीच कलाटणी घेतली..
1999 मध्ये अनूच्या बाबतीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ती एका पार्टीवरून तिच्या मुंबई येथील राहत्या घराकडे निघाली असता तिचा भयानक कार ऍक्सिडंट झाला आणि त्यात ती गंभीररित्या जखमी झाली..
तिचा चेहरा पॅरलाईज झाला,
पुढील 29 दिवस ती कोमात गेली.
सलग पणे तीन वर्षांच्या उपचारानंतर अनू दुरुस्त झाली ..
पण त्या जीवघेण्या अपघातानंतर अनू मध्ये न ओळखू येण्याइतका कमालीचा बदल घडून आला.
स्वत: सोबत घडलेल्या सर्व घटनांची जाणीव करून देण्यासाठी अनू अग्रवाल ने आत्मचरित्र ‘असामान्य: मेमोयर ऑफ अ गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड’ देखील कथेच्या रुपात लिहिले आहे.
आज अनू अग्रवाल ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या, योगा टिचर आणि सोबतच एक motivational speaker आहेत.
11जानेवारी 1969 रोजी जन्मलेली..
आशिकी गर्ल …
अनू आज 53 वर्षाची झाली.तेव्हा तिला तिच्या आगामी उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुखमय आयुष्यासाठी आपल्या सर्वांकडून वाढदिवसनिम्मित्त
खूप खूप शुभेच्छा…
राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांचा आयकॉनिक चित्रपट ..
आशिकी मधील गाणे..
गायक.. कुमार सानू ,अनुराधा पौडवाल
१…दिल का आलम मैं क्या बताऊँ तुझे
दिल का आलम मैं क्या बताऊँ तुझे
एक चेहरे ने बहुत
एक चेहरे ने बहुत प्यार से देखा मुझे
दिल का आलम मैं क्या बताऊँ तुझे..
२….अब तेरे बिन
अब तेरे बिन जींगे हम
ज़हर ज़िंदगी का पी लेंगे हम
क्या हुआ जो एक दिल टूट गया
क्या हुआ जो एक दिल टूट गया
अब तेरे बिन जींगे हम
ज़हर ज़िंदगी का पी लेंगे हम जानम..
३….जान-ए-जान
जानम जान-ए-जहां
जान-ए-जिगर जानेमन
मुझको है तेरी कसम
तू जो मुझे ना मिला
मर जाऊंगी मैं सनम…
४….मैं दुनिया भुला दूँगा, तेरी चाहत में
हो दुश्मन ज़माना, मुझे ना भूलाना
मैं खुद को मिटा दूँगा, तेरी चाहत में
मैं दुनिया भुला दूँगी, तेरी चाहत में
तेरा साथ छूटा के वादा जो टूटा
मैं खुद को मिटा दूँगी, तेरी चाहत में…
५….साँसों की ज़रुरत है जैसे
साँसों की ज़रुरत है जैसे
ज़िन्दगी के लिए
बस एक सनम चाहिए
आशिकी के लिए….
६…नज़र के सामने जिगर के पास
नज़र के सामने जिगर के पास
कोई रहता है वो हो तुम
नज़र के सामने जिगर के पास
नज़र के सामने जिगर के पास
कोई रहता है वो हो तुम
नज़र के सामने जिगर के पास..
७….धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना
धीरे धीरे से दिल को चूराना
तुमसे प्यार हमे है कितना जाना
तुमसे मिलकर तुमको है बताना…
८….तू मेरी ज़िन्दगी है
तू मेरी हर खुशी है
तू मेरी ज़िन्दगी है
तू मेरी हर खुशी है
तूही प्यार तूही चाहत
तूही आशिक़ी है
तू मेरी ज़िन्दगी है
तू मेरी हर खुशी है..
Happy Birthday Anu Agarwal
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.






अप्रतिम लिहिले दर्शना मॅडम
Wah sundr g