——————-
नागपूर शहरात एक नामवंत उच्चभ्रू,सुशिक्षित,प्रतिष्ठीत कुटूंब जुन्या चालीरिती प्रमाणेच एकत्रित संयुक्तपणे मोठ्या गोडगुलाबीने नांदत होते….घर कसलं,वाडाच जणु तो…घरातील तिन्ही मुले विवाहीत होती…घरात लहान लहान मुलाचं गोकुळच… घरात कसा सगळी कडे आंनदी आनंदच…..आजींचा घरातील संपुर्ण व्यक्तींवर आदर्शयुक्त दबदबा होता… आजीनां विचारल्या शिवाय इकडले पान कुणी तिकडे हलवू शकत नव्हते…..घरात कसं संस्कारमय वातावरण होते.त्या मुळे घरातील लहान मुलांचे मनावर आजींनी उत्तम संस्कार रूजविले होते…. तिन्ही मुले व सुना मोठ्या पदांवर नौकरीवर होते…घरात कामाला नौकरचाकर सह सर्व सुख सोयी उपलब्ध होत्या.. आजींचा तोरा कसा राजमाता सारखा होता…आजी वरवर जरी तापट स्वभावाच्या दिसत असल्या तरी मनातून एकदम ओल्या खोबऱ्या सारख्या गोड व मऊ….आजी रोजच लहान मुलांना घेवून नवनवीन गोष्टी सांगावयाच्या त्यामुळे मुलांना आजीचा फारच लळा…..सर्व कसे सुरुळीत व आनंदात सुरू होते…
पण अचानक एका रात्री आजींची प्रकृती खालावली.. तशी तिनही मुलांचे तोंडचे पाणीच पळाले…कुटूंबातील सगळ्यांची झोपच उडाली… एकच धावपळ सुरू झाली.. कुणी डाॅकटरांना फोन करतोय तर कुणी अँब्युलन्सला..लहान मुलं आजी..आजी असा टोह फोडीत होती….त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून आजी कसेबसे डोळे उघडून केविलवाण्या अश्रुपुर्ण नजरेने मुलांना न्याहाळत होती…
दवाखान्यात आजीला डाॕक्टरांनी तातडीने दाखल करून उपचार सुरू केलेत.. आजीचे स्वास्थ्य लवकर चांगले व्हावे म्हणून इकडे लहान मुलांसह सर्वांनी देवाकडे साकडे घालणे सुरू केले होते…..स्वर्गातून आजोबा आजीला कदाचित खुणावत असावेतं ,म्हणून की काय आजीच्या चेहऱ्यावर अशाही परिस्थितीत अधूनमधून हास्याची छटा उमटत असे.. शेवटी आजोबाच जिंकलेत… आजींनी मुलांकडे बधून शेवटचा श्वास घेतला… आजीची प्राणज्योत मालवली होती…पण त्या क्षणी सुध्दा आजीच्या मुखावर समाधान झळकत होते…..मुलांनी अश्रुपुर्ण नयनांनी आजींना विधीयुक्त मुखाग्नी दिला.. आनंददायी वातावरण कसे अचानक सुन्न झाले होते..
दुसरे दिवशी रक्षा विसर्जना नंतर चर्चा केल्यानुसार आजींच्या काही रक्षायुक्त अस्थी एका पितळी डब्यात ठेवून तो डबा लाल कापडात बांधण्यात आला….मोठ्या श्रध्देने तो डबा त्या भावंडानी मिळून गांधीसागर तलावा जवळील त्यांचेच मालकीचे वडीलोपार्जीत पुरातन मंदिरात एका कोपऱ्याच्या भिंतीला बांधून ठेवला व निधून गेलेत..येथील सर्व विधी आटोपल्यावर या अस्थींचे हरीद्वार येथे जावून विसर्जन करू असे त्यांनी ठरविले होते.
गांधीसागर तलावा जवळच झाडाखाली काही रिक्षाचालक व पादचारी नेहमीच विश्रांती घेत असतं…तसेच एक वृध्द भिक्षेकरी महिला भिक्षा मागून याच ठिकाणी मंदिरा शेजारी आपली शिदोरी खात असे..हि महिला तेथल सर्वांना परिचित झाली होती…काही मुलं तिची लाडीक खोड सुध्दा करायचे.पण कधी कधी खायला सुध्दा तेच देत असतं..जेवण झाले की नेहमीनुसार उरलेली शिदोरी ती वृध्द आजी एका कापडात बांधून दुसरे दिवसा करीता राखून ठेवीत असे..शिदोरीचे ते गाठोडं त्याच देवळात लटकून ठेवीत असे…कधीकधी तर हे खोडसाळ मुलं आजीची चेष्टा म्हणून ती शिदोरी सुध्दा खायचे…आजी चिडली की तिला ताजे काही तरी खायला आणून दयायचे असा नित्यक्रम सुरू होता….म्हणून कुणी या गोष्टीची तक्रार पण केली नव्हती…..
काही दिवसांनी ते तिघेही भावंड ठरल्याप्रमाणे आईच्या अस्थी हरिद्वार येथे विसर्जन करण्यासाठी नेण्या करीता त्या पुरातन मंदीरात गेले…बघतात तर काय त्यांनी त खुंटीला बांधलेला अस्थींचा डबा गायब होता…. लगेच त्यापैकी एका भावाने आपल्या प्रतीष्ठेचा उपयोग करून त्यांचे ओळखीच्या तत्कालीन शहर पोलीस आयुक्त यांना फोन लावून सर्व हकीकत कथन केली….
तत्क्षणीच पोलीस स्टेशन चा फोन खणखणला….सि.पी बोलतोय… कुठे आहेत तुमचे ठाणेदार….जयहिंद सर….सर साहेब पेट्रोलींगला गेले आहेत..दुसरा कुणी अधिकारी नाही काय ?…आहेत सर देतो सर….सराफ सर…सि.पी.साहेबांचा फोन आहे…मी तसाच घावत फोन जवळ गेलो…नमस्कार सर पि.एस.आय सराफ बोलतोय सर… दुसरीकडून आदेशवजा आवाज आला…हे बघा सराफ गांधीसागर तलावा जवळ माझे मित्र उभे आहेत.मंदिराच्या आवारात लटकवून ठेवलेला त्यांचे आईचे अस्थीचा डबा कुणीतरी चोरलेला आहे.त्यांच्या श्रध्देचा गंभीर विषय आहे…लवकर जा आणि त्यांना शक्य तेवढी सर्व मदत करा…नंतर मला पण कळवा काय झालं ते…मी लगेच खात्यातील शिस्तीचे सवयी प्रमाणे म्हणालो…हो सर…जसा तो डबा कुणी नेला असावा हे मला ज्ञातच होते.. लगेच मी दोन शिपायांना सोबत घेवून गांधीसागर तलावा जवळ पोहचलो…
गांधीसागर तलावाजवळ पोलीस बघताच तेथील लोक सर बाॅडी निघाली काय ? बाॅडी काढायला काही मुलांना बोलावू काय ? असे म्हणू लागलेत…त्यांचे बोलण्या कडे फारसे लक्ष न देता मि तक्रारदारांना शोधू लागलो…त्याचवेळी एका पांढराशुभ्र पोशाख परीधान केलेल्या ईसमाने मला आवाज दिला…
.साहेब ईकडे ईकडे..
तसाच मी तेथे पोहचलो…ज्या व्यक्तीने मोठ्या साहेबांना फोन केला होता ते माझे जवळ आलेत… व त्यांनी मला सर्व वृतांत सांगीतला… मी मंदिरा बाहेर जोडे काढलेत व मंदीराचे आत गेलो….डबा ज्या ठिकाणी लटकवून ठेवला होता ती जागा पाहिली…डब्याचे व कापडाचे वर्णन विचारले…माहीती घेवून मंदीराचे बाहेर आलो…तक्रारदार बंधूना धिर दिला….प्रयत्न करतो आम्ही..तितक्यात आमच्या स्टाॅफ पैकी एकाने विचारले काय होतं साहेब डब्यात ?..आमच्या आईच्या रक्षाअस्थी होत्या त्या डब्यात.. एका शिपायाने लगेच म्हटले..काय हो साहेब अस्थीच होत्या ना ? आम्हाला वाटलं मोठ्या साहेबांनी फोन केला तर किंमती वस्तूच चोरीला गेली की काय?..हो आमच्या साठी त्या मोल्यवानच होत्या..आमची श्रध्दा जुळली आहे त्या सोबत..तुम्हाला नाही कळायचं..तसेच मी त्या शिपायाचे बोलणे मधातच थांबविले व म्हटले जरा आजुबाजुला विचारपूस करा कुणी काही बघितलं काय?…मी पण विचारपूस करायला लागलो….
विचारपूस करीत असतांना झाडा खाली बसलेल्या एका ज्योतिषाने मला आवाज दिला….साहेब ..तो रमेश रिक्षावाला नाही काय ?, तो नेहमी या मंदिरात ठेवलेली भिक्षेकरी आजीची गाठोडी उघडून शिदोरी खातो…मला पण खुप त्रास देतो सर तो…नुसत्या खोड्या करतो माझ्या व त्या आजीच्या…मी म्हटले कुठे आहे तो ?…आता येईलच सर थोड्या वेळात.. झालीच आहे त्याची वेळ.. आणि बाकी त्याचे मित्र पण येतीलच आता….त्यांना पण विचारा सर… आता साहेब रमेशला चोप देतील या आशेने तो ज्योतिषी सुखावला होता.. तर दुसरीकडे मी त्या आजीची व रमेश ची व्याकुळतेने वाट बघत होतो…..दुपारचे दोन वाजले असतील….काही वेळातच रमेश रिक्षा घेवून गांधीसागर तलावा जवळ नेहमी प्रमाणे आला…त्याने आपली रिक्षा लावली…. रिक्षाच्या सिट खालून जेवणाचा डबा काढला…. सिटवर ठेवला…तसे त्याचे लक्ष पोलीसा कडे गेले….त्याने आजु बाजुला विचारले
आजही तलावात बाॅडी निघाली काय?…ज्याला विचारले होते त्यानेच नाही असे उत्तर दिले..मग पोलीस कश्याला ?…मी हे सर्व पाहत होतो…मनात विचार केला..हा सवारी वाहून थकून आला आहे…याला पहीले जेवण करू दयावे मगच विचारावे..
पण तक्रारदाराला घाई झाली. साहेब ज्योतिषाने सांगीतला हा तोच रमेश ना ?…मग विचारा न त्याला ?….मी रमेश जवळ गेलो…त्याला म्हटले रमेश जेवायला बसतो आहेस ? त्याने लगेच हो सर. ती म्हतारी येईलच…. तिला भिक्षा नसेल मिळाली तर ती उपाशी राहील. ती आली की सोबतच जेवतो…त्याचे हे शब्द ऐकुन..त्या ज्योतिषाच्या कानशिलात दयाविशी वाटली मला …पण मी स्वतःला साभांळल….रमेश तु आजीचा डबा चोरून खातोस का रे??.. रमेश ने लगेच, नाही साहेब.. चोरून नाही हो खात मी…मी कधीकधी मस्करी करतो त्या आजीची…पण सोबतच जेवतो सर आम्ही….मिच आपला डबा देतो सर तिला. उपाशीच झोपते सर कधीकधी आजी… म्हणून वाट पाहतो.. कुणीच नाही सर आजीला..भिक मागून पोट भरते बिच्चारी…उरलेली शिदोरी बांधून ठेवते त्या मंदीरात कुत्रे खावू नये म्हणून.
कधी कधी मिच माझ्या आईचं एखादे फाटके लुगडं पण देतो आजीला…..
आजी बाबत साहेब विचारपूस करीत आहेत…काही झालं तर नाही नं आजीला ? …तलावा जवळ पोलीस पण आहेत ?त्याचे मनात शंकेची पाल चुकचुकली त्याने एक नजर तलावाचे दिशेने भिरकावली लगेच विचारले काय झालं सर आजीला ?.मी त्याला सर्व वृतांत सांगीतला…तसे त्याचे डोळे पाणावले..तो लगेच म्हणाला हो सर मी कधी कधी खोडी काढतो आजीची…. काल मला मंदिराचे आत भिंतीला एक गाठोडं लटकून ठेवलेलं दिसलं…म्हटलं उघडून बधावं आजीने काय ठेवलं ..गाठोडं उघडलं….तर एक डबा त्यात राख व काही हाडकुड दिसली…मी मनात म्हटलं…आजीला डबा सापडला असेल..म्हणून तिने गाठोड्यात बांधून लटकून ठेवला असेल….तो काही बोलणार इतक्यात मीच त्याला विचारले..गोठोड्याचे कापड कोणत्या रंगाचे होते?..डबा कसा होतो?…केवढा होता ? तो डबा कुठे ठेवला तु? …चल दाखव ? ….असे अनेक प्रश्न विचारलेत…आता मात्र तो पार गोंधळला होता…काही तरी घडलं याची कल्पना त्याला आली होती…त्याने श्वास घेवून.. साहेब लाल रंगाचा कापड होता…हातानेच करून ऐवढा पितळीचा डबा होता. त्यात राख व हाडं होती..डबा प्लास्टिकच्या पिशवित लाल कापडात बांधला होता…मी लगेच त्याला विचारले कुठाय तो डबा ?…अरे तो डबाच तर शोधतोय आम्ही.या साहेबांच्या आईच्या रक्षाअस्थी होत्या त्या डब्यात…सर तो डबा तर मी गाठोड बांधून तलावात तसाच फेकून दिला..म्हटलं याचे काय काम आजीला..म्हणून फेकून दिला. सावजा जवळ पोहचून सावज हातून निसटून जावं तस काहीस माझं झाले होते.. तर दुसरीकडे तक्रारदार
हाणा याला सराफ साहेब…अस्थीचा डबा फेकून दिला म्हणतो ?…
मी त्यांना शांत केले..लगेच माझ्या मनात एक विचार आला…सकाळ पासून सगळे विचारताहेत बाॅडी मिळाली काय? आज बाॅडी तर नाही मिळाली,पण अस्थी शोधायची वेळ आली आहे..काय काय काम करावे लागणार पोलीसांना अजून ? पण शोधावे तर लागणारच, मी स्वतःच मनाशी पुटपुटलो…
तत्क्षणीच मला राजेश खरे याची आठवण झाली..मी मोबाईल काढून राजेश ला फोन केला…राजेश ने फोन उचलला व विचारले…बाॅडी मिली क्या सर,आता हूँ सर.. पाच मिनीटमे… वाचकांना प्रश्न पडला असेल आता हा राजेश कोण ?… राजेश आमच्या पोली स्टेशन मधील सफाई कामगार.. तलावात मृतदेह तरंगताना दिसला,की हा पोलिसां सोबत नेहमीच मदतीला हजर…त्याने किमान दोन हजारांचे वर तलावातून मृतदेह बाहेर काढले असतील…तो पोलीसांचा देवदुतच जणू..
राजेश लवकरच आला…कँहा है सर बाॅडी..असे म्हणून तो तलावाकडे बधू लागला..मी त्याला घडलेला पुर्ण वृतांत सांगीतला…तसे त्याने सर तलाब मे बहोत पाणी है…दलदल भी बहोत है..जोखीम है सर निकालने मे..तसे त्या तक्रारदार बंधूनी राजेशला विनवणी करून भाई आपको हम बक्षीस देगे..माँ के प्रती हमे श्रध्दा है..उसकी अस्थीया हरीद्वार विसर्जीत करना था…लेकीन इसने सब गडबड किया….राजेश ने त्यांना लगेच म्हटले बक्षीस का लालच नही है सर मुझे…दलदल बहोत है…आपने माँ का नाम लिया..देखता हूँ कोशीश करके,लेकीन मिलेगा ही यह बोल नही सकता…असे म्हणून राजेश ने माझे कडे बघीतले. सर गल लेके आता हूँ असे म्हणून तो निधून गेला..त्या फावल्या वेळेत मी..रमेश ला घेवून मंदीराजवळ गेलो..डबा कसा फेकला..डबा किती अंतरावर पाण्यात पडला असेल.. याचे प्रात्यक्षिक डेमो करून बधितले व कामाची एक दिशा आखली…..
तितक्यात राजेश गळ घेवून पोहचला….राजेश ला रमेश ने डबा कसा फेकला…कुठपर्यंत चा भाग शोधावा लागेल…जास्त गाळ असेल तर पाण्यात आत जास्त जावू नकोस…प्रयत्न कर सापडला तर ठिक नाही तर राहू दे..जिव धोक्यात घालू नकोस अश्या सहानुभूतीपुर्वक सुचना दिल्या
तितक्यात जमलेल्यापैकी कुणीतरी तक्रारदार बंधूना उद्देशून म्हटले की
” सहाब ईस तलाब मे गणेशजी,दुर्गा माता शारदा माँ,की मुर्तीयाँ विसर्जन होती है, शायद आपके माँ की भी यही ईच्छा रही होगी तभी तो अस्थीयाँ यही विसर्जीत हूई…तसेच तक्रारदार ने नही हम हरिद्वार मे विसर्जीत करने वाले थे…हमारे तिनो भाईयों की माँ के प्रती आपार श्रध्दा है.और सुबह से पुलीस अपना काम लगन से कर रही है..हमको पुरा विश्वास भी है..अस्थीयो का डबा जरूर मिलेगा .पोलिसांची प्रशंसा..माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना….कुणीतरी कौतुक करताहेत न चला…मी लगेच राजेश ला धिर दिला..
राजेश पाण्या त उतरला..एका हातात गळ तर दुसर्या हाताने पाणी बाजूला सारत त्याने शोध सुरू केला…बराच वेळ शोध घेतला…थांबला…पुन्हा शोध सुरू केला…ईकडे बधणारे वाढलेत…काही फुकटचा सल्ला देत होते..ऊधर देख राजेश..पण राजेश कुणाकडेही लक्ष न देता आपले काम चोखपणे करीत होता…हरला तो राजेश कसला…अखेर तिसर्या प्रयत्नात त्याचे गळाला काही तरी लागले असावे हे त्याचा चेहराच सांगीत होता…त्याने गळाला लागलेली वस्तु गळ काट्यातून काढली व थोडा दूर पाण्यात गेला..डुबकी मारली…पोहत पोहतच..त्याने तलावातील पाण्यानेच ती वस्ती धुतली…ती वस्तू दुसरी तिसरी कोणती नसून तो डबाच होता..मी मनोमन राजेशला धन्यवाद दिले..तक्रारदार सुखावले होते..पण सवयी नुसार…परंतू हा शब्द असतोच..नेमके तेच झाले…तक्रारदाराचे एका भावाने राजेश ला हाक देवून भाई डबेमे अस्थी तो है न असा प्रश्न केला.
.डबा बंद है तो अस्थीयाँ होगी ही..असे आशावादी उत्तर राजेश ने दिले…मी त्याला पाण्यातून बाहेर येण्यास सांगितले…
राजेश पाण्या बाहेर आला मी त्याला जवळचा गमच्छा काढून दिला व अंग पुसण्यास सांगीतले…तसा तो म्हणाला
सहाब जिसके लिए ईतनी मेहनत कीये,वो अम्मा की अस्थीयाँ है की नही पहले देख लेते है..
.त्यानेच डबा उघडला.डब्याचे आत रक्षायुक्तअस्थी बघून सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला…..
तक्रारदाराने लगेच मोठ्या साहेबांना फोन लावून धन्यवाद दिले…मी साहेबांना सर्व वृतांत एकविला…त्यांनी राजेशचे स्वतः कौतुक केले व दुसरे दिवशी राजेश ला कार्यालयात घेवून येण्याचे फर्माविले..मला व स्टाॅफ ला सुध्दा धन्यवाद दिलेत…तक्रारदार बंधूनी स्वखुशीने राजेश व रमेश ला बक्षीस दिले..मी आभारयुक्त नजरेने दोघांनाही धन्यवाद दिले..राजेश चे विशेष कौतुक केले.तलावातून मृतदेह काढून निस्वार्थ सेवा देण्याच्या या कार्याची दखल घेवून नगर प्रशासनाने त्यास नागभुषण पुरस्कार प्रदान केला….आमचे वरीष्ठांनी देखील राजेश ला पुरस्काराने गौरवान्वीत केले..
अखेर तक्रारदार बंधूची आईप्रती असलेली श्रध्दा व पोलीसांवर असलेला विश्वास जिंकला..
अरविंद सराफ.







वाह अप्रतिम
धन्यवाद