मराठीअलक -वैशाली जोशी
मराठीअलक -वैशाली जोशी

मराठीअलक -वैशाली जोशी

गजरा

मराठीअलक -वैशाली जोशी

वैदेही साठी ..वेदांत ने गजरा आणला आणि तो तिच्या केसांत माळताना.त्यांचे जे हास्यविनोद चालले होते नेमक्या तेव्हाच सुमतीताई देवळातून घरात आल्या .आणि कुठेतरी वसंतरावांच्या आठवणीत हरवून गेल्या वसंत राव पण असेच अधूनमधून सुमतीताईंसाठी गजरा आणून केसांत माळत असत .आपल्याला नेमका कशाचा त्रास होतो हे न समजल्यामुळे रात्रभर त्या बेचैन होत्या .तसे मुलगा .सून चांगलेच होते नातवाला तर सुमतीताईंचा फार लळा होता.
सकाळी सुमतीताई जेव्हा पुजेला बसल्या .नातवाने हळूच येउन त्यांच्या समोर फुलांचा हार ठेवला …आणि त्यांच्या गळ्यात हात टाकून म्हणाला आजी हा तुझ्या कृष्णा साठी बर का
सुमतीताईंची कालची बेचैनी कुठल्याकुठे पळून गेली

देव्हाऱ्यातला कृष्ण गालातल्या गालात हसतोय असे त्यांना वाटायला लागले

वैशाली जोशी खोडवे

पसारा

अग आई, किती हा पसारा बघ ना, चल आपण आवरू.. इती सौम्या

राहूदे ग बाई ..घर ना हे असेच छान वाटते ..थोडे पसरलेले ..त्यामुळे घराला कसे घरपणं वाटतं …ईती माधवी

सौम्या चा आवाज कि भास …माधवी एकदम भानावर आली
दोन तीन दिवसांपूर्वीच सौम्या लग्न होउन सासरी गेली होती ,
अतिशय टापटिपीची अन् शिस्तप्रिय सौम्या सगळ्या वस्तू जिथल्या तिने लागणारी सगळे म्हणत ,सौम्या अगदी माधवीवरच गेली म्हणून पण संसार आता बराच पुढे गेल्यामुळे माधवी बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकली होती
आता सौम्या नसणार त्यामुळे माधवी ने तिच्या आठवणीत रमतच .घरातला पसारा आवरायला घेतला …अन् मोबाईल ची रींग वाजली
आई ..फार .पसारा ..आवरत बसू नको गं …तु आता स्वतःकडे लक्ष दे , हे ऐकताच माधवीच्या डोळ्यातुन अश्रूंच्या धारा वाहू लागल्या…
आपली लेक आता खरच मोठी झाली आहे तर…

वैशाली जोशी खोडवे

 

 

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!