भाग-४
तृष्णा
तृष्णाचे बाबा गेले आणि आईचे आयुष्य बदलले.
पुढे ….
भाग-४
आईला माझ्या देखणेपणाचे कौतुक कमी आणि काळजीच जास्त वाटायची.
मी लिहिलेलेही तिला जास्त आवडायचे नाही.नववीत असतांना मी एक प्रेमकविता लिहिलेली. ती आईला दिसली.
झालं तिला वाटले मी प्रेमातच पडले.खूप कसून चौकशी केली माझी.
(डोअर बेलचा आवाज ) तृष्णाने घाईघाईने शुटींग बंद केले.
तिचे स्वगत बघण्यात मग्न झालेला अमोल तंद्रीतून बाहेर आला.
तो विचार करायला लागला.
तृष्णा- देखणी,संवेदनशील,आणि बोलतांना भाव असे कि आपणही त्याच जगात पोहचतो.
कोण आहे ही? आता कुठे असेल? आणि तिचा जोडीदार? ती शुटींग का करत असेल?आता बेल वाजली तेव्हा तिचा सखा आला असेल का?
अनेक प्रश्नांनी मनात गर्दी निर्माण केली.
मोबाईलची रिग वाजली.
अमोल कधीची काॕल करतेय.कुठे आहेस?
काही नाही ग.झोपतोय आता.
तू झोपली नाही अजून?
अरे,तुला फोन केल्याशिवाय झोपते का मी?
अमोल तू ठीक आहेस ना.
हो ग.
तू कशी आहेस?
बरी आहे यार.पण तुझी खूप आठवण येतेय.
अग एक दोन दिवसात येतच आहे मी.
बरं काळजी घे.उद्या बोलू.
असे म्हणत मुक्ताने फोन ठेवला.
अमोल विचार करत होता.आतापर्यत खूप सिनेमे बघितले होते पण हे असे जिवंत चित्रिकरण पहिल्यांदाच बघत होता.
विचार करता करता त्याचा डोळा लागला.
त्याला पहाटेच जाग आली.विजयला फोन करुन जरा लवकर यायला सांगितले.बाबांना फोन केला.
बाबांनी घरासाठी लवकर गिऱ्हाईक शोध असे सांगितले.
नाहीतर परत येऊन पुन्हा जा असे सुचवले.
विजयसोबत अमोल घरी आला. बाजुचे शेजारी भेटले त्याला.त्यांचे घर या घराला लागूनच होते.त्यांनी घर विकत घेण्याची इच्छा बोलून दाखवली.
अमोल सांगतो बोलला. विजयला परत जायला सांगितले आणि तो घरात आला. काल कॕसेटमध्ये जे बघितले त्याच्या खाणाखुणा शोधायला लागला.
डोअर बेल दिसली पण आता बंद स्थितीत होती.तृष्णाचा,तिच्या सख्याचा एकही फोटो दिसत नव्हता.त्याची उत्सुकता वाढत होती.पण ती शमवण्याचे कुठलेही साधन दिसत नव्हते.
अमोलची नजर सर्वत्र भिरभिरत होती. थोडावेळ थांबून तो बाहेर पडला. शेजारचे काका त्याला येतांना दिसले. त्यांना घर बघायचे होते.अमोल त्यांना घेऊन परत आत आला.त्यांनी घर बघितले. त्यांनी अमोलच्या बाबांचा नंबर मागून घेतला.
काका तुम्ही राहायला आले तेव्हा कोणी राहायचे का इथे?
नाही रे बाळा.
मला इथे येऊन पंधरा वर्ष झाली पण हे घर मी नेहमी बंदच बघितले.
मला आश्चर्य वाटायचे.नशीब कोणी कब्जा नाही केला घरावर.
अमोल काही बोलला नाही.त्याला हाॕटेलवर परतायची घाई झाली होती. कॕसेट नंबर दोन आज बघायची होती.विजयला त्याने बोलवून घेतले.
दुपारची जेवणाची वेळ झाली होती.येता येता त्याने जेवण केले.हाॕटेलमध्ये आला.
अमोलीला फोन केला.
आईशीही बोलला.
रुममध्ये जाऊन कॕसेट नंबर दोन लावली.
तृष्णा हसत हसत समोर आली.अमोलने भान हरपून विचारले.काल कोण आले होते?
मंजूळ आवाजातील तिचे बोलणे सुरु झाले.
त्यादिवशी बेल वाजली .माझा सखा आला होता.
मी सांगू का एक गोष्ट मला नाही वाटत आमचा संसार जास्त दिवस चालेल.अमोलच्या ह्दयात चर्र झाले.
का? असे मनातच त्याने विचारले.
तृष्णा रडायला लागली.मला आईची खूप आठवण येते.आईचे फोन येतात पण मी काय सांगू आईला?
तिने खूप आशेने माझे लग्न करुन दिले.
मी तिला खोटे खोटेच मी सुखात आहे असे भासवत राहते.
तृष्णाने डोळे पुसले आणि हसायला लागली.मी त्यादिवशी कवितेबद्दल सांगत होती.आईला मी कविता करणे आवडायचे नाही.कवितेतील कल्पना तिला खऱ्या वाटायच्या. मी कुणाच्या प्रेमात पडेन आणि आयुष्यभराचे नुकसान करुन घेईन अशी भीती तिला वाटत असायची.
आई-बाबांचा प्रेमविवाह होता.श्रीमंत घरातील देखणी आई बुद्धिमान बाबांच्या प्रेमात पडली. बाबांसाठी माहेरची नाती तोडली.आईचे माहेर सुटले आणि सासरी तिला कोणी स्वीकारले नाही. आईबाबांचे लग्न झाले आणि वर्षभरात मी आले. तृष्णा नाव बाबांनी ठेवले. बाबा गेले आणि घराची रयाच गेली.
आई आणि मी घरात कायम दोघीच.दोघींचे घर होते पण घरपण बाबांसोबत गेले होते. आता आउ मी केलेला पसारा आवरायची नाही. तिला घर नीट ठेवायची इच्छाच राहली नाही.ते सजवावे असे आईला कधीही वाटले नाही.बाबा जातांना जसे घर होते तसेच ते कायम राहले. घरी एकही नवीन वस्तू आली नाही.माझ्या मैत्रीणींच्या घरी सण,वाढदिवस,हळदीकुंकु काय काय असायचे.
मी आईला विचारले तर तू लग्न झाले कि करशील सगळे असे बोलून ओलावलेले डोळे पदराने पुसायची. नंतर नंतर तसले प्रश्न आईला विचारणे सोडले.
आईने प्रेमविवाह केला म्हणूनच हे सगळे तिच्या आयुष्यात घडले असेच तिला वाटायचे. म्हणून मी प्रेमात पडू नये हा तिचा प्रयत्न असायचा.
दहावी पास झाले.काॕलेजमध्येअॕडमिशन घेतली.
मी शिकून काही विशेष करावे असे माझे कधी ध्येय नव्ते आणि आईचेही माझ्याबाबतीत नव्हते. ग्रॕज्युएशन झाले कि लग्न असे आईने ठरवले होते. अकरावीत असतांना चैतन्य आयुष्यात आला. आणि तोवर स्थिर असलेल्या आयुष्यात चैतन्य आले.ते हसतेखेळते झाले. माझ्या सारखाच तोही कविता रचायचा.
माझ्यावर,माझ्या देखणेपणावर एक तरी कविता करायचा रोज…
चैतन्य घेऊन आलेला चैतन्य तृष्णाच्या आयुष्यात कायम राहतो कि….वाचा पुढील भागात
शब्दपर्णवरील वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या कथामालिकांच्या लिंक पुढे दिल्या आहेत.
आभास हा छळतो मला
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
सुंदरा मनामध्ये भरली
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.








Mast
कथा मालिका आवडली.👌