आज जाई खुपच आंनदी होती .कारणही तसच होतं. तिच्या पतीची बदली आणि प्रमोशन झाल होत.
ते पण तिच्या जिवलग मैत्रिणीच्या शहरात.
अजुन जायला अवकाश होता जाई अगदीच उतावीळ झाली होती .किती तरी दिवसांनी निशिगंधाची भेट होणार या कल्पनेनेच खुश होत होती नवरा दुरुनच गंमत बघायचा.
खूप कल्पना होत्या दोघांच्या इकडे फिरायला जाऊ .तिकडे फिरायला जाऊ पण कधी जमलच नाही सारखा पैशाचा विचार.
बहीण भांवाची जबाबदारी होतीच नंतर मुले झाली. खर्च वाढला.जाई किती वेळा नाराज झाली पण काहीच करु शकत नव्हतो पण आता नाही. आता जाईची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार.तो पण मनात सुखावला व आँफिसला निघुन गेला.
घरी जाईची गडबड सुरुच होती निशिंगधाला काय आवडेल याचा विचार करु लागली आणि नकळत भुतकाळात रमली.
खूप मैत्री होती दोघींची घर पण जवळ जवळ शाळेत सोबत जाणे सोबत येणे सोबत नदीवर फिरायला जाणे.दोघींची जोडी चांगलीच प्रसिध्द झाली होती.दिसणे,विचार मात्र वेगळे होते निशिंगधा नावाप्रमाने सुंदर होती अगदीच फुलासारखी.दिसल्यावर कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी.लाघवी.बोलायला हुशार .पण ती कधीच खोलवर विचार करायची नाही.पैशाला जास्त महत्त्व देणारी.जाईला तिची काळजी वाटायची खुपदा ती समजावून सांगायची निशिगंधा फक्त हसायची.
अग, किती काळजी करतेस माझी. काळजी करणे बंद कर बाई .
असे बोलणे दोघींचे सुरू राहायचे. काँलेजचे दिवस ते पंख लावल्यासारखे भराभर उडाले.नोट्स काढने प्रॕक्टीकल यात अनुराग दोघींना भरपुर मदत करायचा तिघांची छान मैत्री होती.जाईला केव्हाच कळले होते अनुरागच्या मनातले.अनुरागचा जीव जडला होता निशिगंधावर..जाई तिला सांगायची अनुरागचा स्वभाव तो किती अभ्यासु आहे काँलेज मध्ये टाँपर आहे.पण तिला त्याच मन कधी उमजलच नाही तिची धाव फक्त पैशाकडे.
दिवस चालले होते अनुराग मागे फिरला होता पण अजूनही तिच्यात जीव होता.परिक्षा संपल्या होत्या.दोघींच्या घरात लग्नाचा विचार सुरू झाला निशिंगधाला तर श्रीमंत नवराच हवा होता आणि जाईला तर काही कळतच नव्हते. वडिल नव्हते .आईने नोकरी करुन मोठे केले होते आपल्या आईने काय काय भोगल याची जाणिव जाईला चांगलीच होती.ती काहीच बोलत नव्हती.निशिंगधाचे मात्र हा नको तो नको अस सुरू होत.
पाहता पाहता निशिगंधाला खूपच श्रीमंत स्थळ सांगून आले.मुलगा दिसायला सुंदर .गर्भ श्रीमंत घरी मोठा बिजनेस.काहीच कमी नव्हते .मोठा बंगला , नोकर , गाड्या तिला जे पाहिजे होते ते सर्व मिळाले होते .निशिगंधा खूप खुश होती .अनुराग मात्र दुःखी झाला होता पण तिच्या सुखात खुश झाला.आपली जिवलग मैत्रीण आपल्याला सोडुन जाणार या कल्पनेने जाई दुःखी झाली. निशिगंधा खरेदी करण्यात गुंग होती जाईला घेतल्याशिवाय कुठेच जात नव्हती .
शेवटी लग्नाचा दिवस उजाळला.निशिगंधा खुपच सुंदर दिसत होती. भरजरी शालु , दागिने अजुनच खुलले होते तिच्यावर. निशिंगधाचा नवरा राघव दिसायला सुंदर रुबाबदार होता .लग्नाचा खुप थाट होता , जाईची लगबग सुरू होती , जाईला राघवची भिरभिरणारी नजर आवडली नाही.
सोबत सुंदर बायको असतांना त्याच काहीतरी वेगळच सुरू असायच.जाईला निशिगंधाची काळजी वाटायला लागली होती .पाठवणीची वेळ झाली , जाई निशिंगधा ओक्साबोक्सी रडायला लागल्या.
अनुराग दुर उभा राहुन बघत होता आतुन खुप दुःखी झाला होता.निशिगंधा सासरी निघून गेली .जाई खुप ऐकटी पडली होती.स्थळ येणे सुरुच होते.तशातच सागरच स्थळ चालुन आले.जाई पाहिजे तेवढी खुश नव्हती .सागरवर खुप जबाबदाऱ्या होत्या..भावाच शिक्षण ..बहिणीचे लग्न ..वडिल नव्हते .सागर खुप समजदार आणि कष्टाने समोर येत होता
आईला भावाला सागर खुप आवडला होता.जाईला आई सतत समजावून सांगायची.शेवटी जाई तयार झाली.सुरूवातीलाच आपल्याला खुप तडजोड करावी लागनार हे तिला कळले होते.सागरचा स्वभाव तिलाही आवडला होता.घरची लोक पण छान होती.
निशिगंधा लग्न झाल





