तू झूठी मै मक्कार -Hindi cinema
तू झूठी मै मक्कार -Hindi cinema

तू झूठी मै मक्कार -Hindi cinema

तू झूठी मै मक्कार -Hindi cinema
सिनेमेही पुस्तकासारखी असतात.काही दर्जेदार काही सुमार,काही ह्या दोघांच्या मधली.
 निव्वळ वेळ घालवायला,डोक्यात काहीही शंका,प्रश्न निर्माण होऊ द्यायची नसेल तर बरेच सिनेमे पण टाईमपास म्हणून बघू शकतो.(जास्त सिनेमे ह्याच पठडीतील आहेत)
तू झूठी मै मक्कार ह्याच पठडीतील सिनेमा आहे.
बघितलाच पाहिजे असे नाही आणि बघितला तर फार बोअर होऊ असेही नाही.
सिनेमाची कथा विनोदी अंगाने जाणारी नेहमीची   love story  (सर्वच कथा नेहमीसारख्याच असतात पण दिग्दर्शक नेहमीसारख्या कथांना आगळेवेगळे रुप देतो)
रोहन अरीरा-मिकी(रणबीर कपूर) Break up condultant असतो.
श्रीमंत आणि माॕडर्न कुटुंबात वाढलेला मिकी कुटुंबासोबत attach असतो. त्याची आजी,आई-वडील,बहीण,भाची असे त्याचे श्रीमंत कुटुंब असते.
मित्राच्या(मनू-अनुभव सिंह  बॕचलर पार्टीला जातांना त्याला निशा-टीन्नी  (श्रद्धा कपूर ) भेटते प्रथमदर्शनीच मिकी तिच्या प्रेमात पडतो.हळूहळू तिलाही मिकी आवडतो(ये तो होना ही था)
दोघांचे कुटुंबही लग्नाला मान्यता देतात. तिचे मिकीच्या घरी जाणे-येणे सुरू होते.मिकीचे कुटुंब,मिकीची कुटुंबासोबत असलेली attachment तिला आवडत नाही. तिला लग्नानंतर दोघांचेच असे वेगळे घर हवे असते.तिची space हवी असते.
करियरला महत्व देणारी टीन्नी आईवर झालेला अन्याय लहानपणापासून बघते एकत्र कुटुंब असल्यामुळे  C.A, झालेल्या आईला घरीच रहावे लागते.आपलेही आईसाखे होऊ नये म्हणून तिला एकत्र कुटुंब नको असते.
प्रेमावर तिचे करियर,तिला हवी असलेली space मात करते.
तो कुटुंब सोडायला तयार नाही आणि  ही एकत्र कुटुंबात रहायला तयार नाही. तिला आता मिकीसोबत Breakup करायचा आहे.त्यासाठी ती Break up consultant ची मदत घेते.
तिचा Break up consultant मिकीच आहे हे तिला माहीत नसते.
दोघांचा Break up होतो. दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या होतात पण प्रेम कायम असते.
मैत्रीणीच्या डोहाळजेवणात पुन्हा दोघांची भेट होते.
यावेळी तिला मिकीच Break up consultant आहे हे समजते. मिकी तिला कुटुंब सोडू शकत नाही हे सांगतो.ती त्याला सोडून लंडनला जायला निघते.संपूर्ण कुटुंब तिला थांबवायला Airport वर जाते.
चित्रपटाचा शेवट आनंदी आहे.
प्यार का पंचनामा आणि  सोनू के टीटू की स्वीटी ही वेगळ्या धाटणीचे सिनेमा बनवणाऱ्या  लव रंजनने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
अनुभव सिंह बस्सीची कॉमिक टाइमिंग जबरदस्त आहे. जब आते हैं आपके चेहरे पर हंसी लाते हैं.कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचाचे काम थोडे आहे पण छान आहे.
प्रीतमचे संगीत आणि  सर्व गीते अमिताभ भट्टाचार्यने लिहिली आहेत.
तेरे प्यार में
गायक-अरिजीत सिंह, निखिता गाँधी
प्यार होता कई बार है
गायक-अरिजीत सिंह, चरण
शो मी द ठुमका
गायक-शाश्वत सिंह, सुनिधि चौहान
ओ बेदर्दया
गायक-अरिजीत सिंह
मैंने पी रखी है
गायक-श्रेया घोषाल, दिव्या कुमार  
तू झूठी मैं मक्कार
गायक- रणबीर कपूर, श्रद्धा कपूर
सिनेमेटोग्राफी सुंदर आहे.स्पेन सुरेख चित्रित केले आहे.
हलकाफुलका विनोदीप्रेमकथा असलेला हा चित्रपट रणबीर कपूरच्या प्रसन्न अभिनयाने सुसह्य झाला आहे.श्रद्धा कपूरचा अभिनय ठीकठाक.
 त्याचा खासम् खास मित्र बनलेला अनुभव सिंह बस्सीचे काम एकदम झकास साकारले आहे.याशिवाय  डिंपल,बोनी कपूर यांच्याही यात भूमिका  आहेत.
तरुण वर्गाला आवडेल असा सिनेमा,संगीत आहे.
सिनेमा बघतांना किसींग सीन जरा कमी असते तरी चालले असते असे वाटत राहते.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com

 

शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!