PHONEBHOOT Review In Marathi
OMG
भूत आणि काॕमेडी-impossible.
भूतांनी विनोद करणे,भूताने वाया गेलेल्या दोन मित्रांना बिझनेस करण्याची आयडिया देणे…सगळेच अशक्य वाटतेय नं पण हे शक्य आहे. फोनभूत सिनेमा बघितल्यावर हे लक्षात येते.
‘फोनभुत’ नावावरुन आणि सिनेमाची सुरुवात बघून घाबरलेले प्रेक्षक थोड्याच वेळात खळखळून हसायला लागतात.हा विनोदी सिनेमा सिरियसली बघितला तर भूतांची भीती नक्कीच कमी होईल.
भुतांच्या कथेत रमणारे गुल्लु आणि मेजर आणि त्यांना बिझनेस आयडिया देणारे भुत रागिनी यांच्या भोवती ही कथा फिरत राहते.
गुल्लु-मेजर दोघे खासमखास मित्र.
Horror ची Craze असणारे हे दोघे भुतांना मुळीसुद्धा घाबरत नाहीत.
त्यांच्या घराच्या सजावटीतही भुत,आत्मा यांच्याशी निगडीत असलेल्या गोष्टींचा समावेश आहे. राका नावाचे भुत त्यांच्या घरात त्यांच्या सोबत राहते.
दोघांचेही वडील ह्या दोघांमुळे त्रस्त आहेत. जरासुद्धा गांभीर्य नसणारे गुल्लु-मेजर वेगवेगळे व्यवसाय करुन बघतात.आणि प्रत्येक वेळी अपयश पदरात पाडून घेतात.
एकदा ते एक मोक्षपार्टी आयोजित करतात.तिथे खूप भुतं जमा होतात.तिथेच त्यांना रागिनी भेटते.
दोघांच्या चांगुलपणावर,भुताला न भिण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे तिला दोघे आवडतात.ती त्यांना बिझनेस आयडिया देते.अर्थात त्यात तिचाही स्वार्थ असतोच.(भुत बनल्यावरही स्वार्थ कायम राहतो)
गुल्लु-मेजरचा व्यवसाय सुरु होतो.कुणाकडे भुत असेल तर त्याला हाकलणे,मोक्षप्राप्ती देणे….
सुरुवातीला न चालणारा त्यांचा व्यवसाय जोम धरु लागतो.
आता सिनेमा भुतांवर असला तरी त्यात एक व्हिलन असल्याशिवाय मजा तर येणार नाही. तो तर हवाच.तर हे काम आत्माराम (जॕकी)करतो.
मोक्ष मिळवून देतो असे सांगत भुतांची फसवणूक करतो.
काही भुतांचे आत्मे एका बाॕटलमध्ये भरुन ठेवतो.
गुल्लु आणि मेजरचा व्यवसाय खूप चालायला लागतो.त्यांच्यामुळे आत्मारामचा धंदा कमी चालतो. गुल्लु -मेजरला धडा शिकवायचा असे ठरवलेला आत्माराम त्यांना त्रास देण्यासाठी तीन भुतांना पाठवतो.पण गुल्लु-मेजर त्यांना परत पाठवतात.
सिनेमात रागिनीची प्रेमकथा दाखवली आहे.
तिचा प्रियकर आणि तिचा एका अपघातात घडवून आणल्या जातो. तिच्या प्रियकराचा आत्मा आत्माराम एका बाॕटलमध्ये बंद करतो.
रागिनीला त्याची सुटका करायची असते. त्यासाठी तिला गुल्लु-मेजरची मदत हवी असते.याकामी राका गुल्लु-मेजरला मदत करतो.
शेवट अर्थात हिरोकी जय और व्हिलन की पराजय -असा अपेक्षित आहे.
विनोदनिर्मितीची एकही संधी दिग्दर्शक,लेखकाने सोडली नाही. गुल्लु-मेजरचे वडील मुलांच्या वागण्याला कंटाळलेले असतात.ते दोघांना भेटायला येतात हा प्रसंग असो की रागिणी तिची आणि दुष्यंतची अपूर्ण प्रेमकथा सांगते तो प्रसंग असो..
.हास्य अत्र तत्र सर्वत्र आहे.
सिनेमात चिकनी चुडैल बनलेली शीबा खूप हसवते.
भुताच्या जगातही भाषावैविध्य कायम आहे.
तामीळ भूतनी रजनीकांतचा फोटो बघून नाचायला लागते.बंगाली भूत भांगडा करते.बंगाली भुत मोक्ष शब्दाचा उच्चार मोख करते. हे पडद्यावर बघतांना प्रेक्षक हसू आवरु शकत नाही.
गुल्लु आणि मेजर बनलेली ईशान-खत्तर आणि सिद्धांत चतुर्वेदीची जोडी प्रसन्न वाटते.कॕटरीना कैफ रागिनीच्या भूमिकेत फिट्ट बसली.
सिनेमातील गाणी लक्षात राहण्यासारखी नाही.
सिनेमा दर्जेदार ,अभिनयसंपन्न किंवा अप्रतिम संगीत असलेला नाही पण बघतांना सतत चेहऱ्यावर हसू फुलवत राहते.
रवि शंकरन आणि जसविंदर सिंग यांनी लिहिलेली ही Horror comedy(सिनेमा बघतांना Horror शब्द लगेच गळून पडतो आणि उरते फक्त Comedy)
गुरमीत सिंहने दिग्दर्शित केली आहे.
ज्यांना Logic बाजूला ठेवून सिनेमाचा आनंद घेता येतो अशा प्रेक्षकांना फोनभुत आवडेल.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
खुप छान