साक्षीचे लग्न जुळले आणि रेवतीची झोपच उडाली.
आपली छोटीशी परी इतकी मोठी झाली कधी कळलेच नाही.काळ कसा पंख लावल्याप्रमाणे वेगात निघून गेला कळले सुध्दा नाही.खरेच काळ आणि पक्षी यांचा वेग कधी कुणाला कळणार का? किती वेगाने निघून जातात… आपण फक्त बघत राहायचे …रेवती भूतकाळात डोकावू लागली.
लग्नाला पाच वर्षे झाली तरी घरी पाळणा हलेना.रेवतीला आता घाई झाली होती.डाॕ कडे फेऱ्या मारणे सुरू होते.
जे कुणी सांगेल ते…ते सर्व सुरू असायचे.कुंदन तर पार वैतागून गेला होता.किती घाई आहे रेवती तुला.. अग होईल न बाळ..फक्त पाच वर्षे तर झाली आपल्या लग्नाला.तुम्हाला तर काही कळतच नाही हो.माझ्या सर्व मैत्रिणी आई झाल्या.होईल ग सर्व ठीक..
कुंदन तिची समजूत काढायचा.आणि एक दिवस बाळाची चाहूल लागली.कुंदनचे तर सतत सुरू असायचे मला मुलगी हवी.खूपच काळजी घेतली रेवतीची त्याने.
बाळाचा जन्म झाला.गोरी… कापसासारखी मऊ..मऊ पिटूकली मुलगी कुंदनच्या हातात आली. कुंदन आणि रेवतीला स्वर्ग दोन बोट उरला होता.तिचे हसणे,…बोलणे ..घर कसे प्रसन्न वाटत होते.
साक्षी आता डाॕ झाली होती.रेवती आणि कुंदनला लग्नाचा विचार सुध्दा असह्य होत होता. साधा ताप जरी आला तरी रात्र …रात्र जागरण करणारे आई..वडिल..
नंतर थोडीच मिळणार .?काळजी घेणारा नवरा साक्षीला मिळेल का? देवा..माझ्या साक्षीला तिच्यावर खूप प्रेम करणारा …तिला फुलासारखे सांभाळून घेणारा नवरा मिळू दे या पलिकडे आम्हाला काहीही नको.
कुंदन तर मुलाची एवढी कसून चौकशी करायचा सर्वांना हसायला येत होते .साक्षी आणि रेवती चूप बसून सर्व बघायच्या.साक्षी तर हसून कुंदनला चिडवायची
पप्पा तुम्ही C I D..मध्येच पाहिजे होते.किती चौकशी करता.अरे बाळा काळजाचा तुकडा परक्या व्यक्तीच्या हाती देणे इतके सोपे थोडीच आहे.बाप आहे मी तुझा.
तुझ्या सुखाचा…आंनदाचा विचार करायला नको का?
सरतेशेवटी राज सर्वांना आवडला.लग्नाचा दिवस आला.
लग्न थाटामाटात पार पडले.निरोपाची वेळ आली.कुंदन
रेवतीच्या ह्दयाची कालवाकालव वाढली.पोटचा गोळा अनामिक व्यक्तीच्या हाती सुपूर्द करणे किती वेदनामय असते आईवडिलांसाठी…मुलीला छान सासर मिळाले या आंनदा सोबतच ती आता परकी झाली याचे दुःख. आई..बाबांचे तर एकच मागणे असते
देवा,..तिला आंनदाच्या श्रीमंतीत चिंब…चिंब भिजू दे.सुखी ठेव.रृ
हा निरोप खरेच आईवडिलांसाठी आंनदाचा तितकाच दुःखाचा.
साक्षीच्या आयुष्यात नवीन सुरूवात होणार होती.
ज्योती रामटेके









मस्तच
मुलीच लग्न म्हणजे एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्यात दुराव्याचे दुःख
छानच
Mast 🌹🌹🌹