नियती- मराठी लघुकथा
नियती- मराठी लघुकथा

नियती- मराठी लघुकथा

नियती- मराठी लघुकथा

निशा चे वडील सरकारी क्लास वन अधिकारीआणि आई गृहिणी.निशाला दोन बहिणी आणि एक भाऊ. निशा आई-वडिलांची चार नंबरची मुलगी, आई-वडिलांना दोन मुली आणि एक मुलगा होता पण अजून एक मुलगा असावा  ह्या अपेक्षेने  चौथी मुलगी झाली ती म्हणजेच निशा.

निशाचा जन्म झाल्याबरोबर आई ने नर्सला विचारले

काय झाले?

नर्स बोलली

खूप सुंदर, गोरी-गोरी, लोभस, गोंडस, मुलगी झाली आहे तुम्हाला ताई.

तिचे वाक्य संपत नाही तर लगेच निशाच्या आईच्या तोंडून….

“विष पाजून मारून टाका तिला””

असे उद्गार निघाले ती नर्स स्तब्धच उभी राहिली तिला काहीच सुचेनासे झाले. नर्स म्हणाली,

बाई इतकी  सुंदर मुलगी झाली आहे तुम्हाला असे का बोलता?

त्यावर  निशाची आई बोलली

‘आम्हाला मुलगा हवा होता’.

नर्सने  स्वतःच्या डोक्यावर हात मारला आणि तिथून काढता पाय घेतला. पण निशाच्या वडिलांनी निशाचे खूप भरभरून स्वागत केले

असाच काही काळ लोटला.निशाचे वडील निशा चे खूप लाड करत होते. वेळ मिळाला की तिच्या सोबत खेळत असे. तसे क्लास वन अधिकारी असल्याकारणाने त्यांना फारसा वेळ मिळत नव्हता पण तरीही वडील निशाला आवडणारी वस्तू, कपडे- लत्ते, दाग-दागिने,खेळणी,शालेय साहित्य सर्व निशाला व्यवस्थित घेऊन देत असत. तसे ते चारही मुलांसोबत खूप प्रेमाने राहत होते.पण निशा ची आई निशाला जेवायला बरोबर देत नसे. शाळेत जाताना टिफिन देत नसे. निशाचे केस विंचरून देत नसे. निशा चे केस खूप सुंदर,लांबसडक, दाट, काळेभोर होते.निशाला कधीकधी वेणी घालण्याचा कंटाळा यायचा.

एक दिवस

निशा रोजच्या दिनचर्ये प्रमाणे सकाळी लवकर उठली सकाळी साडे सातला शाळा असायची .आज तिला कंटाळा आला होता वेणी घालण्‍याचा निशाने आईला झोपेतून उठवले आणि

आई मला आज केस विंचरून दे ना गं

असे बोलून आईला उठवले आई झोपेतून उठली आणि  केस विंचरून  देत होती केस विंचरताना आईने तिच्या समोर बसलेल्या निशाला चार-पाच लाथा मारल्या.आणि रागारागाने मनातच पुटपुटत होती सोबत  केस विंचरण्यापेक्षा ओढतच जास्त होती.निशाला त्या वेदना सहन होत नव्हत्या पण काही न बोलता निशाने डोळ्यातून पाणी काढले आणि रडतरडत शाळेत निघून गेली. टिफिन तर असाही मिळतच नव्हता.

निशाला जेवण व्यवस्थित मिळत नसल्याने ती खूप कुपोषित झाली होती आणि शारीरिक वाढ वयानुसार जशी व्हायला पाहिजे तशी झाली नाही.

कालांतराने निशा आता मोठी होऊ लागली पण शिक्षणातही निशाला तडजोड करावी लागली.

निशाच्या वयाच्या विसाव्या  वर्षी निशा चे योग्य वर शोधून दिनेश सोबत लग्न झाले. लग्नानंतरचे दोन-तीन महिने खूप सुखाचे गेलेत. दिनेश निशाची नखे काढण्यापासून काळजी घेत होता. निशाला स्वतःच्या ताटात जेवायला घेऊन बसत असे .घर काम दोघे मिळून करत असत. .तसा दिनेश सरकारी क्लास वन अधिकारी असल्याने हाताखाली बाकी कामाला कर्मचारी होतेच. निशा च्या लग्नाला आता तीन महिने झाले होते.दिनेश च्या मामाकडे लग्नाचा कार्यक्रम  होता. निशा आणि दिनेश दोघेही लग्ना साठी गावी गेलेत. दिनेश चे आई आई-वडील भाऊ- भावजय सर्वजण लग्नासाठी आले होते. निशा चे आई -वडील  सुद्धा आले होते. निशा आणि दिनेश चे परतीचे विमानाचे तिकीट लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी होते.

लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व पाहुणे मंडळी जिकडे-तिकडे आपापल्या गावी गेलेत. निशा चे आई -वडील पण निघाले.निघताना दिनेशला बोललेत की,

तिकीट उद्याचे आमच्या शहरातूनच आहे,तर आज रात्री जावई तुम्ही आणि निशा आमच्यासोबत आमच्या घरी चला.उद्या असेही तुमचा विमान प्रवास आमच्या शहरातूनच आहे.

त्यावर दिनेश हो बोलला.आणि निशाच्या आई-वडिलांसोबत दिनेश आणि निशा वडिलांच्या कारमध्ये गेलेत दुसऱ्या दिवशी निशा आणि दिनेश विमान प्रवासाने स्वतःच्या घरी पोहोचलेत.

इकडे दिनेशच्या आई-वडिलांना- भावाला दिनेश चा आणि निशा चा राग आला.दिनेश लग्नानंतर रात्री आपल्यासोबत न राहता सासुरवाडीला मुक्काम केला यावरून दिनेश चे आई-वडील  दिनेश ला बोलले की

तू आता आमचा राहिला नाही.आम्ही शेतात कष्ट करून तुला सरकारी क्लास वन अधिकारी बनवले.कष्ट आम्ही केलेत….. तुझ्या शिक्षणासाठी खर्च आम्ही केला….. आणि तुझ्या भल्यामोठ्या पगाराची मलई आता निशा एकटी खाणार.

बस……….

इथून निशाच्या सुखी संसाराला ग्रहण लागले. दिनेश निशाला दागिने कधी खरेदी करू देत नव्हता. म्हणायचा माझी आई-भाऊजय कुठे दागिने घालतात?

तू सुद्धा नको घालू. भारीची साडी घेऊ देत नव्हता म्हणायचा

माझी आई-भाऊजय कुठे भारीची साडी घालतात…. तू सुद्धा घालू नकोस.

लग्नाला दोन वर्षे झालेत निशाला मूलबाळ झाले नव्हते. आता येथून निशाची इन फर्टिलिटी ट्रीटमेंट सुरू झाली ….कारण लहान असताना पोषक आहार मिळाला नाही. निशा च्या आईने निशाची व्यवस्थित काळजी घेतली नाही. त्यामुळे शरीराची सर्व अवयवांची वाढ व्हायला हवी होती तशी निशाची झाली नाही.त्यानंतर इनफर्टिलिटी ट्रीटमेंट सुरू असताना सुद्धा

पती-पत्नीमधील नाते नॉर्मल असावे लागतं. मानसिक आधार असावा लागतो.

घरातील वातावरण पोषक असावे लागते.

तरच  इनफर्टिलिटी ट्रीटमेंट मध्ये प्रेग्नेंसी कंसीव होण्यास मदत होते. पण असे कुठलेही निशाच्या आयुष्यात घडत नव्हते .उलट मूलबाळ नसल्याने निशाला पतीची साथ हवी होती ती मिळत नव्हती.सासरची मंडळी कडून जिव्हाळा मिळत नव्हता…. ती मनाने तुटत चालली होती. तरी तिचे स्वतःचे प्रयत्न सुरू होते. मध्ये बरीच वर्षे तणावात गेली.इनफर्टिलिटी ट्रीटमेंट साठी निशा शहरात शिफ्ट झाली. वजन कमी करण्यासाठी निशाने…. जिम जॉईन केले आणि अवघ्या दोन महिन्यांमध्ये पी सी ओ डी प्रॉब्लेम असूनही… जिद्दीने तीस किलो वजन कमी केले. आता इनफर्टिलिटी ट्रीटमेंट सुरू झाली.निशा चे एव्हाना पिकप पण झाले…. आता निशा आतुरतेने टेस्ट ची वाट बघत होती… टेस्ट पॉझिटिव्ह सुद्धा आली .पण………..

एक आघात….. आता झालेला आघात फक्त निशालाच नुकसान देणारा ठरला. निशाला सकाळी-सकाळी दिनेश च्या मित्राचा फोन आला… आणि.. दिनेश च्या मित्राने निशाला सांगितले की,

दिनेश ला मुलगी झाली आहे. ऑफिसमधील एक सहकर्मचारी बिजलीला मुलगी झाली .

निशाच्या पायाखालची जमीनच सरकली

जशी उभी होती तशी धाडकन खाली बसली ….कानातून आवाज येणे बंद झाले ….नाडीचे ठोके जाणवत नव्हते….. डोळ्यासमोर रंगीबिरंगी चक्र फिरत होते …..सर्व

स्तब्ध….!!!!!

थोड्यावेळाने हिम्मत करून निशाने ऑफिसला फोन लावला…. कारण दिनेश फोन उचलत नव्हता. निशाने लावलेला फोन ऑफिसमधील कर्मचाऱ्याने उचलला पण कर्मचारी काही बोलतच नव्हता. निशाने खूप आग्रह -विनवणी करून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की,

हो, दिनेश साहेबांना मुलगी झाली आहे. आणि ऑफिस मधील  बिजली नावाची सहकर्मचारी आहे.

बिजली  दिनेश पेक्षा बावीस वर्षांनी लहान होती. तरी ती दिनेशच्या प्रेमात पडली.

हे सर्व ऐकून निशाची हिम्मत तुटत चालली होती. निशाने स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला. पण निशावर आघात  झाला होता… त्याचा परिणाम निशाला ब्लिडिंग सुरू झाले आणि आई व्ही एफ सायकल फेल झाली. निशा खूप रडत होती. त्यावेळेला निशा एकटीच होती.तिच्यासोबत कोणीही नव्हते….. हे सर्व निशा एकटीच सामना …..करत होती नंतर निशा चे आई-वडील -बहिण-भाऊ… तिच्या मदतीला आले दिनेश फोन उचलत नसल्याने ….निशाने कर्मचारी कडे निरोप देऊन दिनेश ला बोलावून घेतले होते.पण सर्वजण वाट बघत आहेत. आपण न गेलेलेच बरे म्हणून चार-पाच दिवस दिनेश गेला च नाही. पण सहाव्या दिवशी दिनेश  निशा कडे गेला. निशा आई-वडील बहिण-भाऊ सर्वांना बोलली की

हा माझा वैयक्तिक जीवनाचा नाजूक प्रसंग आहे. दिनेश आणि मी आम्ही मिळून सोडवू, तुम्ही सर्वजण परत जा.
सर्वजण परत गेलेत.  आता फक्त निशा आणि दिनेश दोघेच होते. निशा खूप रडत होती निशाने चार पाच दिवसापासून आंघोळ सुद्धा केली नव्हती निशा चार पाच दिवसापासून जेवली सुद्धा नव्हती निशा फक्त सारखी रडत होती.

दिनेश निशाला जवळ घेतले. समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण निशाचे म्हणणे की

तू माझा विश्वास घात का केलास?तु मला बोलला असता तर कदाचित दुसऱ्या लग्नाला मी परवानगी दिली असती.मला नातेवाईकांनी, शेजारी-पाजारी यांनी, मित्र-मैत्रिणी पैकी, ऑफिस कर्मचारी यापैकी …कोणीही दिनेश तुला मुलगी होईपर्यंत काहीच सांगितले नाही…. हा माझ्यावर अन्याय आहे. हा अन्याय दिनेश मी तुझ्यासाठी पचवते. मी तुझी एवढी मोठी चूक असूनही माफ करायला तयार आहे. बिजली तुझ्यापेक्षा बावीस वर्षांनी लहान आहे.ती मुलगी आपल्याकडे घे बिजलीला तिचा नवीन संसार आपण थाटून देवू. बिजलीला सर्वतोपरी मदत आपण करू….. आपल्याला ही मुलगी मिळेल आणि बिजली तिच्या संसारात सुखी होईल.
पण ….!!!
पण….!!!
दिनेश यासाठी तयार नव्हता.. कारण दिनेश चे म्हणणे असे की,

मला बिजली नि मुलगी दिली…….मी तिला सोडणार नाही…

त्यावर निशा बोलली

आपण सर्वजण मिळून राहू.

आणि आता सर्वजण एकाच घरात मिळून राहू लागले.घरात लहान मूल होते त्यामुळे सर्वजण मुलासाठी तरी खुश होते. पण निशाने वंशाला मूल दिले नाही आणि बिजली ने मुल दिले .बसsssss या कारणाने दिनेश आणि बिजली कडून निशाला मानसिक त्रास दिला जात होता .हे निशाला सहन न झाल्याने निशाने त्या सर्वांपासून दूर शहरात जे घर होते तिथे राहायला गेली.पण निशाला स्वतःचे मूल तर हवे होतेच. निशा चे आयुष्य त्याशिवाय पुढे कसे जाईल. काही दिवस असेच गेले…… निशाने मनाची तयारी करून आय व्ही एफ च्या मदतीने मुल होण्यासाठी आपण एक प्रयत्न करावा असे ठरविले आणि दिनेश सोबत ती तसे बोलली .दिनेश पण तयार झाला, आणि दिनेश निशाकडे आला. दोघेही एक चांगल्या आई व्ही एफ सेंटरला…….. डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन…….. काऊन्सेलिंग साठी……. हॉस्पिटलला आलेत ……..डॉक्टर सोबत निवांत सर्व चर्चा झाली…….. सर्वकाही ठरणे ……आणि नंतर….

डॉक्टर कडून निशा आणि दिनेश परतीच्या प्रवासाला निघालेत. गाडीत निशा, दिनेश आणि ड्रायव्हर होता. दिनेश क्लास वन अधिकारी असल्याकारणाने दिनेश जवळ नेहमी  फोरविलर असायची. अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास झाला होता. बिजली पासून दिनेश ला मुल मिळाल्यामुळे दिनेश निवांत होता पण निशाला मुल नसल्याने निशा ला  खूप supress केले गेले होते…. त्या ओघात कारमध्ये निशा आणि दिनेश मध्ये वाद सुरू झाला……त्या  वादाचे रूपांतर निशा ने चालत्या गाडी मध्ये दिनेशला मारले. गाडीमध्ये दिनेश  गप्प राहिला आणि घरी पोहोचले. घरी आल्यावर निशा चहा ठेवण्यासाठी स्वयंपाक घरात गेली….. इकडे दिनेश ने स्वतःचे चार-पाच ड्रेस घेतले…… लाॕकर मधील सर्व सोन्याचे दागिने घेतले…… प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्र घेतले…. आणि दिनेश बिजली कडे निघून गेला…. जाताना  दिनेश ने बँक मधील सर्व कॅश काढून घेतली…. कारण जॉइंट अकाउंट होते. निशा बाहेर चहा घेऊन येते तोपर्यंत दिनेश घर सोडून निघून गे ला होता. निशा साठी हा पण खूप मोठा आघात होता. निशा च्या पर्स मध्ये फक्त साडेसातशे रुपये होते.

निशा आता मनाने खूप तुटली  होती. धीर देण्यासाठी फक्त आई-बहिण-भाऊ एवढेच होते. निशा आता डिप्रेशनमध्ये गेली होती. डिप्रेशन मुळे निशाने मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचे ठरविले आणि निशा ने अपॉइंटमेंट….. घेऊन मानसोपचार तज्ज्ञाकडे.  ट्रीटमेंटसाठी गेली …..तिथे डॉक्टरांना  सर्व सांगत होती.

सांगताना निशाने दिनेश बद्दल सर्व डॉक्टरांना सांगितले. तेव्हा डॉक्टर बोलले की दिनेश मेंटली डिस्टर्ब आहे आणि दिनेशला…. मेंटल डिसऑर्डर….. स्प्लिट पर्सनॅलिटी….. नावाचा डिसीज आहे .निशाला ट्रीटमेंट घेण्याची गरज पडली नाही. काही काळ लोटला  डॉक्टरची अपॉइंटमेंट चा दिवस आला होता.निशा ने दिनेश ला फोन केला….. कारण दिनेश शिवाय… निशाला ट्रीटमेंट सुरू करता येणार नव्हती. दिनेश यायला तयार नव्हता.

निशा बोलली,

अरे दिनेश तुला मूल मिळाले पण मी तुझी लग्नाची बायको आहे….. मलाही आई व्हावेसे वाटत असेल ना? तू येशील तरच ट्रीटमेंट सुरू होईल ना ?

त्यावर दिनेश बोलला.

“मी काही अटीवरच येईल”.

पहिली अट, “घटस्फोटाच्या पेपरवर  निशा तुझी सही द्यावी लागेल”.

दुसरी अट, “होणाऱ्या बाळा समोर माझे नाव लागणार नाही”.

तिसरी अट, “होणाऱ्या बाळाचा माझ्या प्रॉपर्टी वर अधिकार नसेल”.

आणि ह्याच्या बदल्यात मी ट्रीटमेंटला मदत करेल….!!!

सर्व अटी निशाने आई होण्यासाठी मान्य केल्यात…. आणि निशाला आई व्ही एफ ट्रीटमेंट साठी दिनेश ची मदत मिळाली….. पण….. निशा वर आघातच एवढे मोठे मोठे झाले होते की …..ही पण सायकल फेल गेली .

आता निशा चे वय झाल्याने निशा दुसरे लग्न करू शकत नाही……. आता निशा जवळ मूलबाळ पण नाही…… आणि बाळ  दत्तक करण्यासाठी च्या… तरतुदी  निशा पूर्ण  करू शकत नसल्याने…… निशाला बाळ दत्तक  घेता येत नाही. आता निशा  एकटी आहे आणि नियती कडून न्याय मिळण्याची अपेक्षा करत आहे

 

वाचक मंडळी
कथा एका सत्यकथेवर आधारित आहे.

“निशाने आता काय करायला हवे?”.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

 

 

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!