लॉकडाऊनमधलं प्रेम
ती शिकवायची मुलांना स्वप्नं विणायला,
आणि मी शिकत होतो जीव वाचवायला…
ती स्क्रीनसमोर हसत असायची,
मी मास्कखाली श्वास रोखून जगत होतो.
बाहेर भीती होती, आत काळजी,
पण तिच्या एका संदेशानं दिवस उजळायचा.
“काळजी घे ना स्वतःची…” ती म्हणायची,
आणि त्या शब्दांत माझं मन विश्रांती घ्यायचं.
तीच्या वर्गात घंटा वाजायच्या ऑनलाइन,
आणि माझ्या वार्डात मॉनिटरचे आवाज.
दोन जगं होती वेगळी, पण हृदय एकच —
त्या अंतरातूनही प्रेम जिवंत होतं.
मी रुग्णांना जग देत होतो,
ती मला जगण्याचं कारण देत होती.
तिच्या डोळ्यांत विश्वास होता,
की “सगळं ठीक होईल” — आणि खरंच झालंही.
लॉकडाऊन संपला, पण आठवणी नाही,
त्या दिवसांचं प्रेम अजूनही तसंच आहे —
शांत, नि:स्वार्थ, आणि न बोलता उमटलेलं,
त्या काळाचं एक सुंदर स्मरण —
तिच्या डोळ्यांत विश्वास होता,
की “सगळं ठीक होईल” — आणि खरंच झालंही.
लॉकडाऊन संपला, पण आठवणी नाही,
त्या दिवसांचं प्रेम अजूनही तसंच आहे —
शांत, नि:स्वार्थ, आणि न बोलता उमटलेलं,
त्या काळाचं एक सुंदर स्मरण —
ती शिक्षिका होती, आणि मी एक डॉक्टर… पण आम्ही दोघं फक्त मनानं जोडलेलो होतो.
…वि.वि.कदम









