प्रेमकविता
प्रिया रे-प्रेम कविता
प्रिया रे …
मी हसरी जुईची वेल
दारीचा चाफा अबोल
तु डोह खोल,अथांग…
तुझ्या शब्दांना पृथ्वीचे मोल..
प्रिया रे…
मी रिमझिम पाऊस धारा
जराशी उनाड वारा..
तू मृगाची तृप्त बरसात
अन् सुखाची अमृतधारा…
प्रिया रे…
मी बडबड ,अवखळ गाणी
कथा,कवितेतली वेडी राणी
तू संयमी पाठ जीवनाचा…
धडा शांतीचा आणि…
प्रिया रे…
मी जरतारी चे वस्त्र..
आणि रेशमी धागा.
तू मनी प्रीत भरणारा..
आणि हृद्ययातली जागा..
प्रिया रे…%3