१०-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
Written by-ज्योती रामटेके
चंदना घरी आली.पियूष आला होता घ्यायला.चंदनाचे तिच्या लाघवी स्वभावाने घरात सर्वांना आपलेसे केले. तिला बघून सासरे खूष झाले. आली का चंदना, तुझ्याविना घर सूने..सूने वाटत होते,सासरे बोलले.
रिना-अरे, हे काय बाबा चंदना आल्याबरोबर मला विसरले का तुम्ही,पण खरे सांगायचे तर मलाही करमत नव्हते.
आणि हो,चंदना पियूष भावजी तर तुझ्या आठवणीत रडत होते.
जेवले नाही ते.काय रिना ताई किती खोटे बोलणार. तिकडे आल्यावर बोलायला तयार नाही.
नमु – मलाही करमत नव्हते वहिनी माहेरी गेल्यावर .चंदना वहिनी आल्यापासून तर रोज मस्त गरम जेवण मिळते.मजा आहे माझी.वहिनी बोलल्या ते खरे आहे. पियूष दादा काहीतरी हरवल्यासारखा दिसत होता.आज पहा त्याचा चेहरा.किती आंनदी दिसत आहे. वहिनी तुम्ही त्याला सोडून जाऊ नका बरे.
यांचे प्रेम घरीच बघा. तिथे आले आणि बसून राहिले चूपचाप .चंदना पियूषला चिडवत होती.
पियूष- वहिनी, चंदनाचे बाबा होते समोर,काय बोलणार?
त्यात अपर्णाची अंखड बडबड. चंदनाच्या विरुद्ध आहे ती.
आज इकडे राहूनच जा म्हणून आग्रह करत होती. उद्या शेतावर जायचे आहे.चंदना, वहिनी तुम्ही पण चला. डबा पार्टी करु.चंदना, वहिनीचे खरे आहे. दोन दिवस कसे गेले मलाच माहीत.तुझ्याविना समोरचे आयुष्य एकट्याने नाही जमणार.क्षणोक्षणी तुझा भास होत होता.तू आली आणि आयुष्यात आनंद आला. तू आता सकाळी जाऊन संध्याकाळी वापस येत जा.बाबाला पण करमत नव्हते.
आई दिवसभर घरी नसते.ते एकटे पडतात.तू आल्यापासून तुझी सवय झाली त्यांना.वेळेवर सर्वांना सर्व गोष्टी मिळतात. आई नेहमी बाहेर. गरम.. गरम कधी खायला मिळाले नाही. सकाळी जास्त स्वयंपाक करुन ठेवायची. आल्यावर थकून जायची ती. आम्ही पण कमी वयात समजदार झालो. आईला मदत करायला शिकलो.
रिना-चंदना, तू किती सुंदर स्वयंपाक करते ग. तुझ्या पोळ्या तर खासच.नरम मऊ, लुसलुशीत. मला शिकव तरी.
चंदना-ताई, अपर्णा डब्यात मी केलेल्या पोळ्या घेऊन गेली की तिच्या मैत्रिणी तुटून पडायच्या. आता दोन दिवस तिने मलाच पोळ्या करायला लावल्या.
रिना-चंदना, मी लग्न होऊन या घरात आली तेव्हा मला येत होता स्वयंपाक पण एवढ्या लोकांचा कधी केला नव्हता. हळूहळू जमत गेले सर्व.त्या काळात सर्वांनी समजून घेतले मला.
आई करायच्या कुरकुर. कधी त्यांनी मला समजून घेतले नाही.काही दिवसांनी मला दिवस गेले, तेव्हा पण त्यांचे वागणे तसेच. मला बरे नसायचे. नमु कामे करु लागायची.
मी कंटाळली होती. शेवटी मी रागाने माहेरी निघून गेली.
यांची जेव्हा बदली झाली तेव्हा मी बदलीच्या गावाला गेली.
तू साधी आहेस.या घरात आईला कोणाच्या सुख.. दुःखात काही रस नाही.यांची पुन्हा इथे बदली झाली तेव्हा आम्ही ठरवले कि एकत्र राहायचे नाही. यांनी तेव्हाच घराचे बांधकाम चालू केले. तुमच्या लग्नाच्या निमित्ताने राहिलो एकत्र. घर झाले कि जाऊ आम्ही. चंदना तुझ्या सहवासात प्रत्येक दिवस छान चालला आहे. किती लाघवी स्वभाव आहे तुझा. आपण राहिलो असतो ग सोबत पण आईच्या विचित्र स्वभावाचा त्रास होतो. चिडचिड होते.
चंदना-चालायचेच ताई या गोष्टी, घर म्हटले कि हे सर्व होणार.
आपण एकत्र राहायला काय हरकत आहे. आता मी आहे नं सोबत.
रिना-चंदना,आपण दोघी चांगल्या राहतो ते आईला आवडत नाही. आपण बोलत असलो कि लगेच आवाज देणार,रिना इकडे ये.
नाहीतर काहीतरी काम सांगतात. तुला जास्त अनुभव नाही आहे.त्या का अशा वागतात कळत नाही.त्या लहानपणापासून एकट्या वाढल्या. त्यांना बहिण.. भाऊ नव्हते. लग्नानंतर बाबा एकटेच. घरात फक्त सासुबाई.
त्यांना शिक्षणाचा गंध नाही. घरात शिकलेली सून आहे याचे त्यांना खूप कौतुक वाटायचे. त्या सर्व घर सांभाळायच्या. आईला आता पण तसेच हवे आहे सर्व.
आपण किती करायचे.मला नाही होत सहन. आपलेही काहीतरी अस्तित्व आहे नं. आता मुले झाली. त्यांना वेळ द्यावा लागतो. चंदना तू आहे स्वभावाने सहनशील.
त्याचाच घरातील लोक फायदा घेतात. तू बदल स्वभाव.
चांगले राहायचे पण काही गोष्टीवर ठाम राहायचे.दोघी बराच वेळ बोलत होत्या.
क्रमशः
पुढील भागाची लिंक
कशी वाटत आहे कथामालिका…अवश्य कळवा.
प्रिय वाचक,तुम्हीही लघूकथा,कथामालिका,लेख,रसग्रहण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.




कथा मालिका आवडते आहे.👌👌
छान रंगतेय कथा…
👌👌पुढील भाग
👌👌👌👌