११-हरवून गेल्या जाणिवा-मराठी कथामालिका
११-हरवून गेल्या जाणिवा-मराठी कथामालिका

११-हरवून गेल्या जाणिवा-मराठी कथामालिका

११-हरवून गेल्या जाणिवा-मराठी कथामालिका

 

सौ. दर्शना भुरे..

 

संध्याकाळचे जेवण आटोपले. नर्मदाआत्याने रोजच्यासारखा तिन्हीसांजेला तुळशीपाशी दिवा लावला. घरातील सर्वांना देवघरात आरतीसाठी बोलावले.

 

नेहमीप्रमाणे आधी मुलांच्या तोंडून शभम् करोति वदवून घेतले. नंतर टाळ्यांचा गजरात आरतीला सुरुवात झाली.आज देवासमोर आरती ओवाळण्याचा जानकीचा नंबर..

 

नर्मदाआत्याने मुलांचा उत्साह पाहता सर्वांना देवासमोर आळीपाळीने आरती ओवाळण्याचा एक एक दिवस ठरवून दिला होता..त्यामुळे मुले पण खूष होती..आरतीत सर्व तल्लीन झाले होते..

 

पण मधुकरराव आपल्याच विचारात गुंतलेले …

या वयात सर्वच मुलींची लग्न होतात….हे पाहुण्यांच्या वाक्याचे पडसाद राहून राहून त्यांच्या कानात घुमत होते..

 

आरती संपल्यावर जानकी काकासमोर आशिर्वादासाठी आरतीचे ताट घेऊन उभी होती. पण त्यांचे तिकडे ही लक्ष नव्हते.

जवळच उभी असलेली त्यांची पत्नी विमल त्यांना म्हणाली,

 

अहो..काय झाले तुम्हाला..एवढा कसला विचार करत आहात.. आजच्या आरतीत सुध्दा लक्ष नव्हते तुमचे ..

 

मधुकरराव म्हणाले.

 

काही नाही ग..वैकुंठाविषयीच..जाऊ दे.. मग निवांत बोलू आपण..असे म्हणून त्यांच्यासाठी चहा घेऊन यायला

सांगून देवघरातून बाहेर पडले..

चुलीवर चहाचे आंधण ठेवून विमलने स्वयंपाकघरातील उकाडा थोडा कमी व्हावा म्हणून बाजूची खिडकी उघडली.

 

रात्रीची वेळ असल्याने बाहेर छान टिपूर चांदणे पडले होते.

दूर दूर पर्यंत रस्ते चांदण्यांच्या प्रकाशात नाहून निघाले होते..

अधूनमधून येणारी मंद मंद गार हवेची झुळूक शरीराला आल्हाददायक वाटत होती..

ती खिडकीतून बाहेर पाहत तशीच कितीतरी वेळ उभी होती..

 

 

 

विमल चहा आणतेस ना..

मधुकररावच्या आवाजाने विमलची तंद्री तुटली तशी ती चुलीवर ठेवलेल्या चहाकडे वळली..

मधुकररावने पाहुण्यांचे बोलणे मनावर घेतल्याचे विमलला जाणवले ..

 

 

 

चहा उकळून उकळून केव्हाचा अर्धाच झाला होता. तिने पटापट तो कपबशीत गाळला आणि लगबगीने खोलीत आली..

 

खोलीत मधुकरराव कसले तरी कागद चाळत बसले होते.. त्यांच्या हातात चहाचा कप देत ती म्हणाली..

कसले कागद आहेत हे?

 

काही विशेष नाही ग …

 

मग..

 

अग ऐक ना.. मी काय म्हणतो..

आपली वैकुंठा आता नऊ वर्षांची झाली.. आणि पाहुणे म्हणतात तसे खरच या वयात मुलींची लग्ने होतात.. पण मला तर वैकुंठा लहानच वाटते.तुला काय वाटते विमल?

हो खरे आहे पाहुण्यांचे..पण आपण वैकुंठाच्या लग्नाचा अजून विचारही केला नाही..

 

 

हो ग.पण आता करावा का?

मुलगा विनायक छान आहे शिवाय एकुलता एक.. मोठे घराणे…सुखी राहिल आपली पोर..

 

हो बरोबर आहे पण आपली वैकुंठा अजून किती बालीश आहे.. तेव्हा मला वाटते एखादे वर्ष थांबावे..

 

 

अग फक्त पाहुणे म्हणाले तसे सोयरीक जुळवून ठेवू.. लग्न पुढच्या वर्षी करू.

 

ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं . .

 

मग उद्या कळवून टाकतो तसे..

आता प्रमिलाचे लग्न महिन्याभरावर आले असल्याने गावातील पत्रिका वाटण्यासाठी उद्या त्यांचा मुक्काम आहेच ना.. वैकुला कुंकू लावून जातील ते..

हो चालेल..

 

असे म्हणून विमलने होकारार्थी मान हलवली…

दिवस कसा तरी गेला.पण रात्री

उद्या पाहुणे वैकुंठाला कुंकू लावून जातील.. माझी वैकु.. परकी होणार मला…

लेकीचे विचार, लेकीची काळजी…. ती पूर्ण रात्र जागीच होती..

 

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!