१२-धूके दाटलेले उदास उदास-स्वप्न तहानलेले
१२-धूके दाटलेले उदास उदास-स्वप्न तहानलेले

१२-धूके दाटलेले उदास उदास-स्वप्न तहानलेले

स्वप्न तहानलेले
भाग-१२

धूके दाटलेले उदास उदास

ज्योती रामटेके

आंनदी, कनक एकाच काॅलेजमध्ये होते.
कनक, आंनदी ने त्यांच्या प्रेमाचा कधी दिखावा केला नाही. मनाच्या कुपीत फुलत होते ते. काॕलेजमध्ये त्यांच्या प्रेमाविषयी कुणाला काही माहीत नव्हते. वाड्यात पण तसेच होते. आराधना आणि आक्काशिवाय कुणाच्याही ते लक्षात आले नव्हते.
तसेही वाड्यात होतेच कोण? काकाच्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या होत्या.

एके दिवशी आक्काने आंनदीच्या आईजवळ लग्नाचा विषय काढला. आंनदीचे लग्नाचे वय झाले आता. मुले बघायला सुरुवात केली कि नाही आक्का विचारत होती.

योग्य वयात करा लग्न आंनदीचे. आम्ही आहोत तुमच्या मदतीला.काही काळजी करू नका.नंतर मुलाचे पण करावे लागेल लग्न.
हो,आक्का खरे आहे तुमचे.मुले बघणे सुरू आहे. सध्या आंनदी तयार नाही. काही दिवस थांबा म्हणत आहे.

मुले चांगली शिकली.मुलाला लागेल नौकरी.सुरु आहे प्रयत्न. आक्का तुमच्या मदती शिवाय नसते झाले हे सर्व. वाड्यातील सर्वांचे खूप उपकार आहेत आमच्यावर

आंनदीच्या लग्नाची चर्चा होऊ लागली. आंनदी दिसायला सुंदर तर होतीच पण स्वभावाने खूप गोड होती.चांगली, स्थळे मागणी घालत होती.

आंनदी टाळण्याचा प्रयत्न करत होती. कनक आक्काला कधी सांगेल यांची वाट बघत होती. आता काॅलेज बंद होते. आंनदीचे वाड्यात जाणे कमी झाले होते.

दोघे संध्याकाळी नदीकाठी भेटायचे. दीपा असायची सोबत. आज आंनदीने लग्नाचा विषय काढला.
कनक आपल्याला लवकरच लग्नाचे ठरवावे लागेल. घरात रोज लग्नाबद्दल चर्चा असते.वाड्यातून होकार मिळाला कि झाले. माझे आई.. बाबा तर माझ्या आंनदात खूष असतात.

त्यांना काय,मी आनंदात असायला हवी.कालच एक स्थळ आले. आई,बाबाला पंसद आला आहे मुलगा. त्याला घरी कधी बोलवायचे यावर बोलणे सुरू आहे.

आंनदी खरे आहे तुझे.मला आता विचारायला हवे.
कनकने आक्काजवळ आंनदीचा विषय काढला.
आक्का विरोध करणारच हे त्याला माहीत होते.

ते घराणे आपल्या तोलामोलाचे नाही, लोक काय म्हणतील? अशी बरेच कारणे तिने शोधली होती. आक्काच्या मनातले त्याला कळत होते.

आराधना आणि मला वाढवण्यात आक्का नी सारे आयुष्य घालवले होते. पोटच्या मुलासारखी माया दिली तिने.बिचारी आधीच दुःखी त्यात माझ्यामुळे अजून भर पडणार. कनक सैरभैर झाला.

आंनदी तर माझे सर्वस्व आहे. तिच्या शिवाय मी कसा जगू? बराच वेळ तो नदीकाठी फिरत होता. आज तो पहिल्यांदा आंनदी शिवाय नदीकाठी गेला होता . दीपा गच्चीवर होती. ती आश्चर्याने बघत होती. कनक आणि एकटा.

तो वेगाने नदीकडे चालला होता. दीपा ने जोरात आवाज दिला. कनकचे लक्ष नव्हते. काय झाले असेल आज कनकला? वाड्यात कुणी दुखावले असेल का त्याला? कनकचे आणि आंनदीचे काही झाले असेल का?

सध्या आंनदी कडे तिच्या लग्नाचा विषय सुरू असतो.
देवा, सर्व ठिक व्हायला हवे.कनकला आक्का ने विरोध केला तर..ते एकमेकांना कसे विसरू शकणार?

कनक एकटाच नदीकाठी फिरत होता.आज आईची आठवण येत होती त्याला.

आज आई असती तर? ती माझ्या पाठीशी नक्कीच उभी राहिली असती. तिने प्रथम माझ्या प्रेमाचा विचार केला असता. आई इतके निस्वार्थी प्रेम जगात नाहीच. देवा, आक्काच्या प्रेमाची किंमत द्यावी लागेल का मला?नदीचे पाणी संथ वाहत होते. तो पाण्यात पाय ठेवून बसला.आंनदी आणि त्याने बघितलेले सुखद स्वप्न तो आठवू लागला.आंनदी तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नाचे घर कधी तोडणार नाही हे वचन तुला दिले होते मी.
काय करु मी?

पायाखालची वाळू सरकत होती.दोघांनी वाळूत बनवलेले घरटे कुणीतरी मोडत आहे,असा भास त्याला होत होता.

कनक..कनक दीपा आवाज देत होती. कनकचे लक्ष नव्हते.
तो गाणे गुणगुणत होता.

धूके दाटलेले उदास उदास
मला वेढीती हे तुझे सर्व भास

दिपा आवाज देत त्याच्याजवळ आली.
अरे कनक,काय झाले तुला? असा वेड्यासारखा का वागत आहेस. मी किती आवाज दिले तुला. वाड्यात काही झाले का? आणि हे काय तुझ्या डोळ्यात अश्रू..

दीपा.. मी आणि आंनदीने बांधलेले स्वप्नातले घरटे कुणीतरी पायदळी तुडवीत आहे. आक्का आमच्या लग्नाला नाही म्हणत आहे. तिने मला सांभाळले. आईचे प्रेम दिले. तिच्या मनातले मी आधीच ओळखले होते.
आराधनाचे लग्न माझ्यासोबतच करायचे हा तिचा दुराग्रह आहे. तिला माझ्या भावना कळत नसेल का?
आराधना समजदार आहे. ती आधीच दुर झाली. पण आक्का स्वभावाने जिद्दी आणि हट्टी आहे.

अरे मग बाबासोबत बोल. ते नक्कीच तुला समजून घेतील.
प्रेमाची किंमत कळते त्यांना. सर्व आक्का सारखे नसतात.
चल रात्र होत आहे. वाड्यात वाट बघत असतील.
कनक.. दीपा घरी जायला निघाले.बाबा वाट बघत होते.

क्रमशः

Previous Link

https://marathi.shabdaparna.in/११-स्वप्न-तहानलेले

Next Part

https://marathi.shabdaparna.in/१३-स्वप्न-तहानले

प्रिय वाचक,कथामालिका कशी वाटत आहे….आवर्जून सांगा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!