५-स्वप्न तहानलेले
दिवस तुझे हे फुलायचे
घर जवळ येत होते. मध्ये आंनदीचे आवडत्या गुरुजींचे घर लागले.
अरे दादा साने गुरुजी आहेत कि गेले?
मागच्या वर्षी गेले ते. थकले होते. मला शिक्षणात किती मदत केली त्यांनी. आज माझे वैभव त्यांच्या मूळे आहे.
तुझे लग्न झाले तेव्हा आपल्या घरी काय होते?
माझी नोकरी साधारण होती.दोन वेळचे जेवण मिळायचे. सरांच्या प्रोत्साहनामुळे मी समोर शिकलो. परीक्षा दिली. समोर चांगल्या पगाराची नोकरी लागली. देवमाणूस होते ते. शेवटी हाल झाले त्यांचे.पॅरालिसीसने त्यांचे फिरणे बंद झाले होते.
त्यांना शाळेची आठवण यायची.मग त्यांना गाडीत टाकून शाळेत घेऊन जायचो. त्यांना तेवढेच बरे वाटायचे. चेहरा फुलायचा त्यांचा. शाळा दिसली कि म्हणायचे.सारे आयुष्य गेले रे या शाळेत. किती विद्यार्थ्यांना घडवले मी. आता ते सर्व आठवले कि पुन्हा हातात खडू घेऊन शिकवण्याची इच्छा होते. तो मान, सन्मान,प्रेम आठवते.आता खूप बदल झाला. पुर्वीसारखे विद्यार्थी नाही राहिले आता.
जुन्या घराचा कायापालट होऊन तिथे सुशोभित घरे दिसत होती.दादा माझ्या मैत्रिणींचे घरे तर ओळखायला नाही येत.साधे कौलारू घरे बदलून बंगले दिसत आहेत. मोजकेच घरे आहे त्या स्थितीत आहेत.
आंनदी इकडे, तिकडे बघत होती.आपल्या गावाचे पण शहरात परिवर्तन होईल एक दिवस.तेवढ्यात जनावरांचा कळप आला. तिला पोळा आठवला. किती मजा येत होती पोळ्याच्या दिवशी. सगळीकडे पुरणपोळीचा घमघमाट असायचा.बैलांचा एक दिवस किती थाट असायचा.
दूरवर ओळखीच्या पाऊलखुणा दिसू लागल्या. वाड्याचा वरचा मजला दिसू लागला.अंतर पार करत वाडा जवळ आला. गच्चीवर कनक उभा असल्याचा भास होऊ लागला.
आंनदी घरी निघाली कि वेगाने तो गच्चीवर जायचा आणि दुरपर्यत बघत राहायचा. वाडा सामसूम दिसत होता. सदैव मानसांची वर्दळ असणारा वाडा आज एकटा, एकाकी दिसत होता.प्रत्येक दिवस तिथे उत्साहाने भरलेला असायचा.
आंनदी बघ, आला वाडा. वाड्याचे वैभव नाही राहिले आता. कनक असता तर वाडा आधीसारखा गजबजून राहिला असता. तुझ्या लग्नानंतर काही दिवस होता तो.
मला कधी, तरी भेटायचा.पण आधी सारखा नाही दिसायचा . उदास,निस्तेज वाटायचा.गर्दीत हरवल्यासारखा वाटायचा. मी प्रयत्न केला विचारण्याचा पण तो टाळत होता. त्याला समाजसेवेची आवड आधीपासून होती.
शाळा सुरू करून गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यायचे असे सांगायचा. शाळेचे बांधकाम सुरू होते आणि अचानक तो आश्रमात निघून गेला. एवढे वैभव सोडून तिथे असतो म्हणे तो. मला नक्की माहीत नाही. तुझ्या सोबत पण त्याने संपर्क नाही ठेवला.
त्याला जवळचे कुणी नाही ग. त्याला प्रेमाने, धिराने समजावून सांगणारे कुणी तरी हवे. त्याने लग्न का केले नाही ते कळलेच नाही. तू त्याची जवळची मैत्रीण, तुला पण त्याने कधी काही सांगितले नाही का?
बघ तू वाड्यात जाऊन.दिपासोबत बोल. तिला कनक कुठे आहे नक्की माहीत असेल.
आंनदीला आतून असह्य वेदना होत होत्या. डोळ्यातील पाणी तिने कसेतरी रोखून धरले.कनक..कनक म्हणून जोराने आवाज देऊन त्याला बोलवावे. समोर हा वाडा तुलाच सांभाळायचा आहे असे हक्काने सांगावे,असे तिला वाटू लागले.
आंनदी गावात किती बदल झाला,बघते नं तू.मायेची,प्रेमाची लोक निघून गेलीत.आता किती,तरी लोकांना तू ओळखशील नाही.दादा जुन्या आठवणींना उजाळा देत होता.
मामा, काय सुंदर आणि मोठाली घरे आहेत तुझ्या गावात.खेळायला मस्त आहे. मी तर दिवसभर खेळणार.पुर्वी खूष होती.
तुझ्या आईचेही हेच गाव आहे ग पुर्वी…मयंक हसत उद्गारला.
आई, भुक लागली आता.ते बघ रुद्र माझे घर, दिसले का तुला आंनदीचा चेहरा फुलला. बापरे केवढे मोठे घर. पुर्वी बघत होती. हो..रे.. इथली लोक पण घरासारखी मोठ्या मनाची.
आता माहिती नाही.काळाच्या ओघात काय..काय बदल घडतात.चला उतरा मुलांनो.मामाने आवाज दिला. दारात मामी, मुले वाट बघत होते.
आई,बाबाही असेच दारात वाट बघत असायचे.
तिच्या डोळ्यात पाणी आले.सुखरुप पोहचल्याचा धवलला फोन केला. दादाला दोन गोड मुली.. चौघेजण मस्त गप्पा करु लागले.असे मोठे घर मुलांनी प्रथमच बघितले होते.आंनदी दिसत होते पुर्वी आणि रुद्र.
वहिनीने छान गरम चहा करून आणला.वहिनीमध्ये एक क्षण आंनदीला आईचा भास झाला. आई असाच पटकन चहा आणायची. घरामध्ये आधी सारखी प्रसन्नता नव्हती.
काळाच्या ओघात सारं काही बदलत असतं हे मान्य करायलाच हवे. तिने स्वतःची समजूत घातली. तिने लावलेली फुलांची झाडे दिसत नव्हती. घर वाढवले म्हणून काढले असतील. जाऊ दे.. आता हे घर त्यांचे आहे.
परसात आईने लावलेली झाडे होती. दादा, वहिनी किती जीव लावत आहेत मला, मुलांना.सही हवी आहे म्हणून असेल हे सर्व.
शेती तरी किती होती,चार एकर. पडून होती तशीच.तिथे पिक येत नव्हते.आता कुणीतरी फ्लॅट बांधत असतील त्या जागेवर.दादा..
वहिनीला भरपूर पैसा मिळेल. म्हणून तर मला तातडीने बोलावले.
वहिनीचा थाट होता.घरात नौकर,चाकर होते. हे सर्व दादाने त्याच्या कर्तुत्वावर केले होते. हा थाट बघायला आई.. बाबा हवे होते. समाधानी झाले असते .ते बिचारे आयुष्यभर कष्ट करत राहले.तसे वाड्यात त्यांना कमी नव्हते. अडचणीच्या वेळी तेच कामी पडायचे.
आनंदी जेवायला काय बनवू …वहिनीच्या बोलण्याने आनंदी भानावर आली.
नीरजा,खूप दिवसांनी आली माझी बहीण.काहीतरी गोडधोड बनव अमेयने सुचवले.
बरं म्हणत नीरजा आत गेली.
आनंदी तिथेच अंगणातील झोपाळ्यावर बसली. तिच्या बाबांनी ती लहान असतांना तिच्यासाठी लावला होता.
लहान असल्यापासून तिच्या मनातील गुपितांचा झोपाळा साक्षीदार होता.
सर्व मैत्रीणी सोबत
दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे……गीत गायच्या.
आनंदी त्या मैत्रीणी,ते गीत आणि त्या गीतातील भावना सगाळे आठवत राहली…….
क्रमशः
Previous Part






खुप सुरेख कथा
Wah sundr पुढे jatiy katha..लिखाणाची तर्हा फारच surekh
अबोल प्रेमकहाणी