ये शरद लवकर
कायम तुझीच असणारी सुगंधा…..सुगंधाचे पत्र आठवून तिच्या आठवणीत शरदराव झोपी गेले.
भाग-६
पहाटेच कावेरीने आवाज दिला
अहो,उठा
walk ला जायचे नाही का?
शरदराव –आज नाही.तू जाऊन ये.
कावेरी-बरं.ही डायरी आणि पेन हातात घेऊनच झोपले तुम्ही.
शरदराव काही न बोलता पुन्हा झोपले.
उठले तेव्हा उशीरच झाला होता.
सगळे नाश्ता करायला बसले होते.तेही हाॕलमध्ये आले.
शांतनु –मग आजोबा आत्मचरीत्र लिहिण्यावर विचार केला कि नाही?</div
तू सांगितले शांतनु आणि रात्रभर डायरी,पेन घेऊन बसले तुझे आजोबा.पहाटे झोपले.ते खूळ टाकू नको त्यांच्या डोक्यात
कावेरीने हसत हसत शांतनुला सांगितले.
शांतनु-आजी विचार करत असतील आजोबा.सुरुवात कुठून करायची…हो ना आजोबा?
शांतनु अगदी खरं बोलला तू.इति शरदराव.
बाबा उद्या जाऊ आम्ही परत.सुगंध म्हणाला.
कावेरीला कसनुसं झाले.वर्षातून तीन चारदाच घर भरल्यासारखे वाटते.इतरवेळी आम्ही दोघेच.
बरं.शरदराव म्हणाले.
शांतनु-मला सुट्ट्या आहेत सध्या.जाॕब जाॕईन करायला दोन महिने वेळ आहे.मी थांबणार काही दिवस इथेच आजी.
शांतनु आजीकडे बघत म्हणाला.
कावेरीआजी खूष झाली.
शांतनु-जुईआत्यालाही बोलवू ग आजी आपण.
कावेरीआजी -हो पुढल्या आठवड्यात येते बोलली.
तिच्या सासूबाई आजारी होत्या म्हणून यायला नाही मिळाले तिला.
शांतनु-आणि सरुआजी पण नाही आली.आजोबांची लाडकी बहीण.
ती चालू नाही शकत.व्हिलचेअरवर असते.शरदरावांना सांगतांना डोळ्यात पाणी आले.
शांतनु-आजोबा आपणच जाऊन सरुआजीला भेटायला.
शरदराव काहीच बोलले नाही.
नाश्ता करुन सगळे बाहेर गेले. दुपारचे जेवण बाहेरच करुन संध्याकाळी परतले.सगळे सोबत असले कि ते असेच करायचे.जवळपास एखाद्या ठिकाणी जायचे आणि रात्री परतायचे.
दुपारी उशिरा जेवण झाल्यामुळे रात्री कुणाला जेवायची इच्छा झाली नाही.सगळे खुर्च्या घेऊन अंगणात बसले.
शांतनु- आजोबा तुम्हाला बागेची आवड लहानपणापासून आहे का? किती छान बाग बनवली तुम्ही.
शरदराव – हो.माझ्या आईला झाडांची आवड होती. खेड्यात छोट्याशा जागेतही तिने झाडे लावली होती.चाफा,पारिजातक असे सुगंध देणारी झाडे तिला आवडायची. तेव्हा बाग प्रकार आम्हाला माहीतच नव्हता.
वसुधा-बाबा,म्हणून तुम्ही यांचे नाव सुगंध ठेवले नं.
शरदराव काहीच बोलले नाही.ह्दयात कालवाकालव झाली.मात्र ती कुणाला दिसणार नव्हती.
सुगंध नाव फक्त बाबांचे आहे. बाकी कुणाचे ऐकले नाही मी.शांतनु म्हणाला.
हो ना.सुगंधा नाव ऐकलेले. वसुधा म्हणाली.
सुगंधच नाव ठेवायचे हा यांचा आग्रह होता.आणि सुगंधच म्हणायचे असाही आग्रह होता.टोपणनाव ठेवू नाही दिले मला.कावेरीने सांगितले.
चला.मी जातो झोपायला.आज जरा थकलो मी…असे म्हणत शरदराव आत गेले.
अहो,डाॕक्टरकडे जायचे का?सकाळपासून अस्वस्थ वाटताय.
नको ग.बरा आहे मी.म्हातारा झालो कावेरी मी आता…असे म्हणत त्यांच्या खोलीत जाऊन बेडवर बसले.
शरदरावांच्या मागोमाग कावेरीताईही खोलीत आल्या.
जुईवर सासरची खूप जबाबदारी आहे हो. एवढ्या महत्वाच्या प्रसंगात माझी पोर येऊ शकली नाही.
शरदराव- अग महेश एकटा आहे आईवडिलांना.त्यामुळे त्यांची जबाबदारी राहणारच महेश-जुईवर.आणि आता येणार आहे नं ती.झालं तर मग.झोपू या कावेरी आता.
शरदरावांना झोप येत नव्हती.पण कालच्या आठवणींच्या वाटेवर जायची घाई झाली होती त्यांना.ती वाट एकट्याची होती.कुणाला सोबत घ्यायचे नव्हते.म्हणून आज आधीच डायरी,पेन बाजूला ठेवले.
डोळे मिटले.सुगंधाचे पत्र डोळ्यासमोर उभे राहले.सोबत सुगंधाही.मिटलेल्या डोळ्यात पाणी जमा झाले.
पण डोळ्यात पाणी जमा झाले म्हणून समोरचे चित्र धूसर झाले नाही.सगळे स्पष्ट दिसत होते. आठवत होते.
सुगंधाचे पत्र मिळाले.तिच्या वडिलांनी दिलेली मुदत संपली होती.मी बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात होतो.नौकरीसाठी अजून दोन वर्ष लागणार होती.मी तिच्या बाबांना पत्र लिहिले.अजून दोन वर्ष थांबण्याची विनंती केली. मी सुगंधाला आनंदात ठेवण्याचे वचन दिले.
पत्र पाठवून एक महिना झाला तरी त्यांचे उत्तर आले नाही.
सुगंधाचे पत्र आले.
अरे,बाबांनी नौकरीची अट कुठे घातली तुला?
काल बघायला एक स्थळ आले.बाबांना आवडले.आपले स्वप्न तुटण्याआधी लवकर काहीतरी कर शरद.
मला सुचत नव्हते.काय करायला हवे?नौकरीआधी लग्न शक्य नव्हते.सुगंधा दोन वर्ष थांबू शकत होती.
तिचे पत्र आल्यावर दुसऱ्याच दिवशी मी आजोळी गेलो.
सुगंधाच्या बाबांना भेटलो.त्यांना दोनच वर्ष थांबा अशी विनवणी केली.पण ते ऐकायला तयार नव्हते.
मी निघून आलो.सुगंधाची व्याकुळ नजर पाठलाग करत राहली.
सुगंधाचे एका श्रीमंत मुलासोबत लग्न झाले.स्वप्न भंगले.आयुष्य पुन्हा आधीसारखे राहले नाही. मी हिंमत करुन तेव्हाच लग्नाला हो म्हणायला हवे होते.आज सुगंधा माझ्या सोबत राहली असती….असे कित्येकदा वाटायचे.आजही वाटते. पुढेही वाटत राहील.
क्रमशः
प्रिती गजभिये.
(प्रिय वाचक,तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर तुम्हीही लेख,कथा,कथामालिका शब्दपर्णवर पाठवू शकता.)




कथा छान रंगतेय.👌👌
Chhan katha