८-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-By-ज्योती रामटेके
आई,बाबा, मावशी घरी आले. लग्नाची तारीख माहिन्यानंतर काढली. तयारी सुरू झाली. घरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले….आता पुढे वाचा.
भाग-८
लग्नाची तयारी उत्साहात सुरू झाली. आई-बाबा आंनदी होते. लग्नानंतर चंदना डोळ्यासमोर राहील याचा त्यांना जास्त आनंद होता. कपडे खरेदीसाठी पियूष आणि त्याच्या दोन वहिनी आल्या होत्या. सर्वात लहान नणद नमु आली होती.अपर्णा आणि तिची गट्टी जमली.
सोबत सुमनताई होत्या. प्रत्येक गोष्टीत सल्ला देत बडबड सुरु होती. त्यांच्या दोन्ही सुना स्वभावाने मनमिळाऊ दिसत होत्या. पियूष शांत बसून होता. मध्येच चोरुन चंदनाला बघायचा.अपर्णाचा गोंधळ सुरू होता.ताई हे घे,ते घे सुरु होते. चंदना शांत होती. सुमनताईचे मध्ये.. मध्ये करणे चंदनाच्या, आईला आवडत नव्हते पण काय करणार. पियूष चांगला आहे नं, बाकीचे जाऊ द्या हे समाधान होते.शेवटी झाली खरेदी.
लग्नाचा दिवस उजाडला. आत्या, मावशी आधी आले.घर गजबजून गेले होते.सर्व सोहळा आनंदात पार पडला.चंदना माहेर सोडून सासरी आली.आशा,स्वप्न घेऊन नव्या विश्वात चंदनाचे पदार्पण झाले.
सासरी आपल्या गोड स्वभावाने तिने सर्वांना आपलेसे केले .
पियूषच्या भावाचे नवीन घर बांधणे सुरू होते.ते रहायला घर बघत होते. चंदनाने आग्रह करुन त्यांना जाऊ दिले नाही. छान राहत होते सर्व. चंदना खूष होती.पियूष एखाद्या वेळी शेतीवाडी असलेल्या गावी जात होता. कधी चंदना सोबत जायची.
छोटेसे खेडे होते ते, शांत वातावरण.
जवळच खळखळून वाहणारी नदी होती. नदीच्या काठावर दोघे मनसोक्त फिरायचे. बराच वेळ नदीकाठी जायचा. दोघांमध्ये प्रेमाच्या गोड गप्पा व्हायच्या. पियूष चंदनाला जपायचा.
पण पियूष एकदाही नौकरीचा विषय काढत नव्हता याचे तिला आश्चर्य वाटायचे.
चंदना सासरी आल्यानंतर घराचे रुप पालटले. घर प्रसन्न वाटत होते. घराचा प्रत्येक कोपरा उजाडला होता.सर्वांना वेळेवर जेवण चहा मिळायचा. सासरे तर चंदना वर खूप प्रेम करायचे. चंदना,आयुष्यात असे चविष्ट,गरम जेवलो नाही.तुझ्या सासुचा नेहमीप्रमाणे रोज तोच गोंधळ. कोणत्याही कामाचे नियोजन नाही. स्वयंपाक करायचा म्हणून करायचा. तू आल्यापासून जीव कसा सुखावून गेला.
किती मायेने करते तू. चंदना तिच्याकडे जास्त लक्ष नको देत जाऊ.
आमच्या काळात मुलींचे शिक्षणाचे कमी प्रमाण.मला कमीतकमी दहावी झालेली मुलगी हवी होती. सुमन शहरात शिकायला होती. लग्न झाल्यानंतर मला स्वयंपाक येत नाही हे तिने आईला सांगून टाकले. मी एकुलता एक लाडाचा
आई म्हणायची, अरे मी आहे नं शिकवायला,शिकेल हळूहळू. मला खाण्याची प्रचंड आवड. सुमन ने छान सुगरण बनाव असे मला वाटायचे.मी मदतीसाठी तयार राहायचो पण तिला मुळातच घराची आवड नव्हती.
आई प्रेमापोटी, माझ्याकडे बघून सर्व करायची. मुले झाल्यावर मी बदलत गेलो. दुसरा पर्याय नव्हताच.
आई थकली होती. तरीही बसल्या.. बसल्या बरेच कामे करायची.
सुमन आता निर्ढावली होती. बचत गटाचे कामे








छान कथा, पुढील भागाची उत्सुकता