मुक्ती द्या फटाक्यांना- मराठी कविता
मुक्ती द्या फटाक्यांना- मराठी कविता

मुक्ती द्या फटाक्यांना- मराठी कविता

आली आली दिपावली
मांगल्याचा सण आला
दीप दीप प्रज्वलित
प्रकाश हा देता झाला

सण म्हणजे समृद्धी
सणा वाटे समाधान
प्रेम प्रतीक हो याचे
गोड मिठाईचे दान

द्यावे घ्यावे एक व्हावे
वाटा सुख दुःख सारे
सोबतीस स्नेही येता
वाहे आनंदाचे वारे

तेल, उटणे, सुगंधी
धूप, दीप, घरोघरी
सडा रांगोळीचा थाट
रोषणाई दारोदारी

अशी संस्कृती आपली
ठेवा आपला अमोल
अरे फटाक्याच्या धूरे
बिघडला सारा तोल

प्रदूषण आवाजाचे
धूर, धोका तो अफाट
मुक्ती द्या हो फटाक्यांना
संस्कृतीची चाला वाट

नको धन अपव्यय
योग्य कारणासी लावा
गोरगरीबासी द्या हो
बघा समाधान ठेवा

सुवर्णा पाटुकले
सातारा

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!