अरुनिमाला आज उठवेना.काल ची दगदग, पाहुण्यांची रवानगी , आधी दोन दिवस कार्यक्रम , एकूण , कहरच.
आज आरामच करावा लागेल .अस वाटलं.
रघुनाथ..(निमा चे यजमान)
अहो बाईसाहेब , उठायच नाही का?थकलात,थकून कस चालेल,अजून त लेका ची अमेरिका ला रवानगी राहिली आहे. बरीच कामे आहेत.मी क्लब च्या मिटिंग ला जाऊन येतो.करा तोवर आराम.
निमा विचार करते.नहुष, निहारिका…गोंडस माझी लेकरं, गुणांची ..कशी राहिल नहुष अमेरिकेला गेल्या वर कसा सुंदर कार्यक्रम आखला दोघां बहिण भावांनी माझ्या वाढदिवसा चा.एकूण उत्कृष्ट उत्सवच झाला ,किती सुंदर मनोगत मांडली सर्वांनी माझ्यासाठी. वन्स.. इतक्या जुळल्या आहे ,आणि अपर्णा ,भाऊजी,किती प्रेम आहे सर्वांच.
आणि हे …..कित्ती सुंदर बोलले… देवा ….डोळ्यांत पाणी च आलं,..
माझ्या श्वासांच्या पलीकडे तुला देवा ने श्वास बहाल करावे .हातात हात घेऊन चढती चा प्रवास केला पुढे उतारा वर सोबत करायची आहे..पांढऱ्या बटां रुष्ट सुरकुत्या पहायच्या आहे चेहऱ्यावर वर.
नातवंडा च्या निमित्ता ने पोक्त जवळीक करायची आहे.संसार थाटणे, लग्न करणे म्हणजे भातुकली चा खेळ नव्हेच ,मांडला मांडला, मोडला मोडला.एका ने विस्कटला ला दुसऱ्या ने तो आवरायचा असतो. माझा संसार फार निगुती ने केला तुम्ही अशीच पुढे ही सोबत करावी…
…काय आहे हे,….. मला तर आश्चर्य वाटले …. हे थोड्या शब्दात , पण मनात विसावेल अस बोलले माझी सगळी मरगळ,मनात साचलेल मळभ,खिन्नता,विषाद सगळं सगळं विरुन गेल .मला भाभडी ला कस कळल नाही आज वर सुखाच उपवन आहे माझ्या भोवताली ते. .
त्याला कारण ही तसेच होते.लाडा कोडात गेलेल बालपण,गोड गोंडस लेकरु म्हटल्या वर अतीलाड ,त्याला हुशारी ची जोड ,म्हणजे पारिवारिक अधिराज्य च.महाविद्यालयीन आयुष्य तर पंख लावूनच उडत होतं.. त्या आरसपानी सौंदर्यावर अनेक नजरा रोखल्या जायच्या…समवयीन मुल बघुन मन कसनुसं व्हायच..पण बिनधास्त स्वभावा मुळे मित्र मंडळी च वाढायची…वाटायच पांढऱ्या घोड्या वरुन येणाऱ्या राजकुमारच आपल्याला आयुष्या च्या सफरी वर घेऊन जाणार…त्यालाच बहाल करावा ह्या मना चा भरजरी संदूक ,जपलेले भावभावनांचे हिरे माणिक मोती.
आलेल पहिल स्थळ ,शेती वाडी ,मोठ्या हुद्या ची नौकरी.पालकांच्या लेखी उत्कृष्ट स्थळ, मी मात्र विवंचनेतं मुलाच वय सहा वर्ष अधिक ..अतीव प्रेम नी विश्वास पालकांनी होकार मिळवलाच माझा..रमले मी स्वप्न दुनियेत …..
रोवली संसार वेल…..फोफावत पण गेली .. कर्तव्याचे खतपाणी वेळोवेळी मिळत होते..पण सुगंधी आणी झुळझुळणाऱ्या वाऱ्याचा अभाव होता.नहुष , निहारिका च्या येण्याने घराचे उपवन झाले ..,,सुखाचे ताटवे बहरले. पण लडिवाळपणा परीकथेतच राहिला.उपवनाची निगा वाढली,मशागत वाढली.सगळं आलबेल सुरु होत. सगळी कर्तव्ये यथायोग्य पुरवल्या जाई…तरीही प्रेम म्हणजे कस असत कळेनाच ..उदासीन होत आयुष्य, मनधरणी, मनराखणी, कोड कौतुक त तेरव्या ला म्हणुन ही नव्हते..एकदा वन्स म्हणाल्या ही होत्या
“अरे रघुनाथा सगळ्या भूमिका चोख पार पाडतोस कधी तरी निमा चा प्रियकर ही हो रे,अशी नाजुका नी कामाक्षी बायको भेटली तुला,सारख नको रे गृहित धरत जाऊस.” पण काहीच फरक नव्हता पडला .
आणि काल चे हे बोलणें ..हे च प्रेम असाव .,हो न ,आठवत मला ,बाहेर जाण्याची तयारी बिघडली कि …
“हे काय आहे “”
ओरडा मिळायचा.चांगल दिसल की …..
“चला आवरा लौकर.”..
नहुष मेरिट आला होता ,नी येऊन गळ्यात माझा पडला तेव्हां चा त्यांचा नजर कटाक्ष…
नीहु ला प्रथमच साडी नेसवली नी पप्पांना दाखवली..,,तेव्हा जवळ घेऊन डोक्या वरुन हात फिरवत “कशाला बेटा”
नेसायची च आहे पुढे ..
मुलांनी काही विचारल की
“आपल्या आई ला आवडेल का” ते बघा,, तरच करा,तिची शिस्त मोडता कामा नये…
आई ग …. हे सगळे वागणे काय होते ,अग बाई .(आनंदाने)
हे सगळ प्रेमच तर आहे ..आयुष्या च्या प्रत्येक टप्प्यावर प्रेमा ची परिभाषा बदलत जाते हे मला वेडीला आता कळले .माझी संसार वेल बहरली होती कारण त्याला यथायोग्य मशागत मिळत होती..आज मी फार आनंदी होते .माझ्या मनातील ऋतूत बदल झाला होता संपूर्ण विषण्णते ,उदासीनते खिन्नते ची पानगळ होऊन आनंदा ची नव पालवी आली होती .मनी साठलेला अवसादाची ती वेल फूलांन्नी बहरून शोभीवंत झाली होती….
दारा वरची बेल वाजली ,
अय्या….(निमा लगबगीनं उठली ….)
देवा.. हे आलेपण …दहा वाजले .आणि आपण संसार वेली ला आलेल्या अवसादाच्यां फूलाचाच विचार करत राहिलो….कस असत नं …..
काळ आणि वेळ तुम्हाला कशी आणि कधी समज देऊन जाईल ,काही सांगता येत नाही…
.@$









खूप छान कथा.
पण अवसादाच फुल कधी पाहिलं नाही
Wahh beautiful
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेमाची परिभाषा बदलत जाते……सुरेख लिखाण