अनीता नाराज सोफ्यावर दुःखात बसून होती .मुले तिच्या अवती..भवती खेळत होती.सुमी आणि राहुल
दोघेही किती छान खेळत होती .मधूनमधून भांडणे सुरू होती .एकमेकांना चिडवणे… मारामारी..आरडाओरडा सुरू होती..किती भांडतात ही मुले आणि थोड्या वेळातच सर्व विसरून एक होतात जणू काही झालेच नाही.
अनीता सर्व बघत होती .तिच्या डोळ्यासमोर तिचे बालपण ..माहेर दिसू लागले.रम्य ते बालपण लोक उगीच म्हणत नाही .सुखी आणि निर्धास्त आयुष्य ..कशाचीही चिंता नाही.मस्त भावासोबत खेळायचे…मस्ती करायची आणि झोपायचे.भावाची खूपच लाडकी होती अनीता .
दोघेच बहिण भाऊ होते ते.घरात खूप लाडके होते .
घरी खूप शेती..नजर फिरवून बघितले तरी चोहीकडे छान हिरवीगार जमीन दिसायची .
अनीताला शेतात जाणे खूप आवडायचे.आई तर नेहमीच गंमत करायची.. तुला शेतकरी नवराच करून देऊ.. बस मग शेतात काम करीत अनीता हासायची.
काही दिवसांनी अनीताचे लग्न झाले ,नवरा नोकरी करायचा.छान चालले होते तिचे.भावाचे लग्न झाले.
घरातील वातावरण बदलायला लागले.वहिनी भावाच वागणे तिला खटकायचे.पण काय करणार?आई आधी तिला सर्व धान्ये भरुन देत होती.घरात काही कमी नव्हते
भरपूर शेती असल्यामुळे धान्यांची पोती पडून राहायची .हळूहळू भाऊ …वहिनीचा नाराजीचा सुर दिसू लागला.अनीताला खूप राग आणि दुःख झाले .मी पण याच घरात जन्म घेतला.माझाही सर्व गोष्टींवर अधिकार आहे मग माझ्या बाबतीत असे का?
उगीचच वाद..विवाद नको म्हणून आई..बाबांनी समजावून सांगितले पण अनीताला तिचा अधिकार हवा होता. भाऊ…वहिनी तर तिला जमिनीचा एक तुकडा द्यावयास तयार नव्हते .
अरे आपण लहानपणी नाही का प्रत्येक गोष्ट अर्धी …अर्धी करत होतो.तुला आठवते संञी गोळी दातांनी अर्धी करून देत होता .मग आताच हे का ?अनीताला काय करु हा प्रश्न पडला…तिने मग शेवटचा निर्णय घेतला.कोर्ट कचेरी सुरू झाल्या.रोज कोर्टात
जाणे…येणे राहायचे..दररोज भांडणे..दिसायचे..त्या लोकांचे उतरलेले चेहरे…कुणी आंनदात तर कुणी दुःखी .. हताश दिसायचे.
सर्व ही भांडणे…वादविवाद प्रेमाने …घरात सोडविता आली असती तर,….
शेवटी अनीताला तिचा अधिकार मिळाला.एका कागदाच्या तुकड्यावर सही करून तिला तिचे सर्व हक्क कायद्याने मिळाले पण त्याच कागदाच्या तुकड्याने नाते कायमचे तुटले.
ज्योती रामटेके
एका कागदाने कधी सुख तर कधी दुःख वाट्याला येते
सुरेख
Wah sundrch g
अप्रतिम ताई 👌