ती निःशब्द- मराठी लघुकथा
सौ. प्रिया…..
आज सारी शक्ती एकवटून भांडणं झाली तरी अविशी बोलयाचेच अशी जणू खुणगाठचं बांधली होती शरयूने. शिवाय आज ती खूप सुंदर तयार झाली होती.अविला आवडते ती अबोली colour ची साडी नेसून अबोलीच्या फुलांचा गजरा तिने केसात माळला होता….सावळी च,पण बाकी नाकी डोळी ठसठशीत,चार- चौघीत उठून दिसावी अशी शरयू..लग्नाला 2 वर्षे झाली होती,
सुरुवातीचं एक वर्ष तर सण समारंभात कसं गेलं कळलंच नाही..सारं काही आता सुरळीत सुरुवात झालं होतं.मनासारखं सासर,घर,संसार,नीटनेटका सुरू झाला होता…शिक्षक असलेला अविनाश उच्चविचाराचा,आदर्श शिक्षक,पाहता क्षणी मनात भरावा असाच होता. .शिवाय शिक्षकी पेशयामुळे शरयू ने त्याला होकार दिला होता.तिला याच क्षेत्रातला नवरा हवा होता.सारं तिच्या मनासारखं झालं होतं…!
आता मात्र तिला ‘आई’ व्हायचं होतं.पण अवि मनावर घेतच नव्हता ,का ते माहीत नाही?
पण हा विषय काढला म्हणजे तो टाळत असे.फक्त तुला एक गोष्ट सांगायची आहे,वेळ आली की सांगेन ,हेच त्यांचे ठराविक उत्तर असे.आणि तिची बोलती बंद होई,पण ती सतत बेचैन असे. तसा तो खूप चांगला माणूस होता.शिस्तप्रिय,सद्गुणी,विचारी,विवेकानंदांच्या विचाराने प्रभावित होता.अवि वाईट मार्गावर जाऊन काही काम करेल ,शक्यच नाही,अशी शरयुला खात्री होती.तसे पाहता शरयुत ही काहीच कमी नव्हते..गुणांची खाण, छान घर सांभाळणारी,सासू सासऱ्यांच्या आज्ञेत,अगदी सोज्वळ मुलगी होती…!
पण तिचीही काही स्वप्न होती,तिच्या सोबत लग्न झालेल्या मैत्रिणीना सर्वाना मुलं झाली होती..तेव्हापासून तिलाही आता आई व्हायचे वेध
लागले होते…छोटी पावलं घरात खेळावीत,घराचं गोकुळ व्हावं,आपल्यालाही बाळाला कुशीत घेण्याचं सुख मिळावं,एक कामेच्छा पूर्ण व्हावी,चार चौघीत ताठ मानेने मिरवता यावं,उलट्या होणं,चिंचा बोर खावी वाटणं, आईपणाची चाहूल लागणं, डोहाळे लागण,सासून सुनेच कौतुक करणं, लाड पुरवणं,डोहाळजेवण,चांदण्यातल,अंधारातल…..
अविन आपल्याला अलगद बाहुत उचलून घेण्याचं स्वर्गसुख,आपण बाप होतोय हा आनंद अविच्या चेहऱ्यावर पाहण्याचा मोह अश्या कितीतरी स्वप्नात ती आजवर जगत होती,ती सारी स्वप्न तिला सत्यात उतरवायची होती..आज काही झाले तरी अविशी बोलयचेच ,माघार घ्यायची नाही,असा जणू शरयू ने चंगच बांधला होता…म्हणून ती छान तयार झाली होती….!
दारावरची बेल वाजली,तशी तिनं साडी आणखी सावरली,आरशात डोकावली आणि हलकेच दार उघडले….
तिला तयार झालेली पाहताच अवि मनातून प्रसन्न हसला
,”अरे वा…!बायको,आज काय विशेष?बाहेर गेलतीस कुठे?”
“नाही,आता जायचे आहे,तुझ्यासोबतच…”इति शरयू….
तसा तो नेहमी तिला नेहमी म्हणायचा,वेळ जात नसेल तर,तुला हवं त्या गोष्टीत स्वतःला गुंतवून घे.,महिला मंडळात सहभागी हो,पण तिथेही तिच्या या आई पणाच्या चर्चेवरून मन नाराज होत म्हणून ती स्वतःच या साऱ्या गोष्टी टाळत असे…
त्याने पाण्याचा ग्लास खाली ठेवत हलकेच तिच्याकडे एक नजर टाकली आणि बोलला,
“आज mood वेगळाच दिसतोय बायकोचा…!!चल, तू म्हणशील तिथे जाऊ..!”
इतक्यात शरयू बोलली,
“हो,पण मला त्या आधी तुला काही बोलायचे आहे,तू फ्रेश हो,मी चहा ठेवते.”
आता अवि ने मनाशी अंदाज बांधायला सुरुवात केली,पण तरी त्याची विचार शक्ती संपली.चहा घेऊन ये,तोवर मी फ़्रेश होतो म्हणत तो रूम कडे वळला….फ़्रेश होऊन खुर्चीत रेलला, तोच शरयू चहाचा कप घेऊन आली. शांतपणे चहाचे घोट घेत अवि ने सुरुवात केली,
“बोल शरयू, तू काहीतरी म्हणत होतीस?,काय आज्ञा आहे?बोला…”
आता तिने जराही विलंब न करता अवि च्या चांगल्या mood चा फायदा घेतला आणि सरळ विषयाला हात घातला,खाली मान घालून ती बोलू लागली,
“अवि, मला आई व्हायचंय…..हो, …आई व्हायचंय…..माझेही काही स्वप्न आहेत,इच्छा आहेत,प्रत्येक स्त्री ला मातृत्वाची ओढ असते,तशीच मलाही आहे…मला माझ्या काळजाचा तुकडा हवा आहे…तिनं मन घट्ट करून एक दमात सारे वाक्य पाठांतर केल्याप्रमाणे निबंधासारखे वाचून मोकळी झाली….!
अवि मात्र शांत,निःशब्द,सारं ऐकत चहाचे घोट घेत होता…पण त्याच्या चेहऱ्यावर ची आणि चहाची पण चव उतरली होती…त्याला जी गोष्ट तिला सांगायची होती,ती वेळ आता आली होती…असे त्याला वाटले…
काहीच न बोलता त्याने फोन हातात घेतला,आणि फोन वर बोलू लागला,
“हॅलो, सर, सॉरी,
अवेळी फोन करतो आहे,पण मला उद्या सुटी हवी आहे,अचानक महत्वाचे काम आले आहे.पूर्वसूचना नसल्याने आधी बोलू शकलो नाही,सॉरी”
पण समोरून होकार आल्याने समाधानाची रेषा त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागली हे मात्र खरे….!
शरयू ला कशाचाच संदर्भ लागेना.आपल्या बोलण्याचा,अवि च्या सुटीचा,त्याच्या चेहऱ्याचा तिला अंदाज च लागेना…आता तिचा राग अनावर होत होता….पण तरीही ती संयमाने घेत होती,
“अवि, मला सुटी नको,मला बाळ हवं आहे बाळ.” तरीही अवि शांतच.
चहाचा कप तिच्या हाती देत तो बोलला”शरयू,उद्या लवकर तयार होशील?आपण जर बाहेर जाऊ..मला तुला काही सांगायचे आहे,ती वेळ उद्यावर आली आहे.आपण बाहेरच जाऊ
.तिच्या अपेक्षांची यादी,अपेक्षित उत्तराची माती झाली होती,म्हणून ती नाराजच होती…
तिला वाटले होते, अवि आपल्याला प्रेमाने जवळ घेईल,समजावून सांगेल,हो तरी म्हणेल किमान..!पण छे यापैकी काहीच घडले नाही.प्रकरण तर वेगळेच वळण घेत चालले होते….शेवटी माझ्या स्वप्नाचे काय?इच्छा चे काय?तोंड फिरवून ती रात्री झोपी गेले,जे अवि ला अपेक्षित होतं… तोही फारसा काही बोलला नाही.खरं तर त्याच्या पूर्वसूचनेंन खूप काही सोपं झालं असतं…. पण…
आता दुसरा दिवस उजाडला.चेहऱ्यावर चे त्रासिक भाव घेऊनच शरयुने सारी कामे आटोपली…एवढ्यात अवि ही तयार होऊन आला…अवि ने पोटभर नाश्ता केला पण शरयू च्या घशाखाली घास उतरला नाही….तिचं मन कोमेजल होतं… दोघेही निघाले,रस्त्यावरची झाडे पळत होती तसे तिच्या मनातले विचार पळत होते.अविला सुद्धा आता Tension येत होते…सारे ऐकून शरयू ची अवस्था काय होईल?
दोघेही आपापल्या जागेवर चिंतेत होते…२० ते २५ मिनिटानंतर गाडी एक ‘अनाथालय ‘ जवळ येऊन थांबली.आणि अवि ने तिला उतरण्यास सांगितले.आता तिच्या पायाखालची जमीन सरकली…तिच्या विचारांची दिशा इथवर कधीच पोहोचली नव्हती…जड पावलांनी ती त्याच्या मागे चालू लागली.इतक्यात 2 वर्षाचा गोड मुलगा अवि ला येऊन बिलगला…आता मात्र शरयू ला भोवळ आली…
तिने जवळ असलेल्या भिंतीचा आधार घेतला.काय होतंय,काय घडतंय?तिला काहीच समजेना…अवि ने तिला घट्ट पकडले.आता त्याला पटले,तिला आधीच याची कल्पना दिली असती तर तिच्या मनाची मानसिक तयारी झाली असती.चुकलेच आपले….!
एवढ्यात तिथल्या एक कर्मचाऱ्याने शरयू ला पाणी दिले.तिचे डोके आता जड पडले होते.तिला पाऊल उचलणे ही कठीण झाले होते…अवि ने आपल्याला फसवले,आणि गेली २ वर्ष एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली हा धक्का तिच्यासाठी मोठा होता.क्षणात तिचे सारे विचार खुंटले होते….!
अवि ने रजिस्टर वर काही नोंद केली आणि त्या चिमुकल्याला घेऊन जाण्याची परवानगी घेतली.त्याला घेऊन तो शरयू सह गाडीच्या दिशेने निघाला. तिला त्याला बोलण्याची मुळीच इच्छा नव्हती…आपण फसलो गेलो आहोत.हेच एक तिला माहीत झालं होतं…तिच्या डोळ्यातील आसवं या नात्याला मान्य करायला तयार नव्हते….ती गुपचूप एकटीच मागच्या सीट वर जाऊन बसली.
अगदी निपचित पडलेल्या सावजा सारखी.!
अवि मात्र छोट्या ‘सुजय’च्या प्रश्नाला उत्तर देता देत परेशान होता.गाडी एक मंदिराजवळ येऊन थांबली.आणि अवि ने शरयू ला उतरण्यास सांगितले…,”शरयू,या मंदिरात चल, मला तुला काही सांगायचे आहे,”
अवि वरच्या प्रेमानं आणि विश्वासानं ती गुपचूप खाली उतरली. दुर्गा मातेचं मंदिर ते.तिघांनी दर्शन घेतलं,आणि मोकळ्या मैदानात एकांतात,निसर्गरम्य ठिकाणी त्यांनी बैठक मांडली.. छोटा सुजय एव्हाना तिथे खेळण्यात गुंग झाला होता..अनाथालय च्या बाहेरचा मोकळा श्वास त्याला मिळाला होता.
अवि ने शरयू ला जवळ घेतले.आणि तो सांगू लागला








