असेच एके ठिकाणी हा फोटो पाहिला. फक्त पाहिला नाही. तर बारकाईने पाहिला. मनात अनेक विचार आले काही कलाकृती स्वतःबरोबर खूप गहन…… अर्थ घेऊन मिरवत असतात .आणि आपल्या विचारांना आव्हान देतात… हे चित्र पाहिल्यावर मला अगदी तसेच झाले .माझी विचार प्रणाली त्यात अर्थ….. शोधू लागली एखाद्या कलाकृतीतून प्रत्येकाला एकच अर्थ सापडेल असे नाही .प्रत्येक जण आपापल्या वैचारिक क्षमतेनुसार त्यात अर्थ आणि सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
काही चित्र किंवा कलाकृती इतक्या बोलक्या असतात की त्यातून आपल्याला मानवी जीवनातल्या अनेक कंगोरे यांचे दर्शन होते मलाही हे चित्र असेच वाटले. किती छोट चित्र सहज पाहिलं तर काही विशेष वाटत नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे शोधले तर खूप अर्थ सापडणारे बोलके चित्र वाटू शकते मला हे चित्र खूपच आवडले. आणि म्हटलं बघूया शब्दात कस पकडता येतं ते एकाच चित्रात दोन वृक्ष आहेत चौफेर पाण्याची श्रीमंती लाभलेली आणि तरीही ते एक झाड ओसाड आणि निष्पर्ण वाटते असं का बर असावं…. निसर्गातल्या कोणत्याच गोष्टीला अतिरेक ..मान्य नाही .असेच अधोरेखित होते. माणसाचेही काही असंश असतं म्हणतात सोन्याच्या पलंगावर शांत झोप येईलच असे नाही…… काही लोकांना त्यांची श्रीमंती या ना त्या कारणाने मारते कधीकधी सुखही बोचते ….
तर दुसरं झाड खडकाच्या गरिबीत सुद्धा रुजवणार संघर्षाला कवटाळून स्वतःला सावरणार ज्याला रूजायचंय तो कुठल्याही परिस्थितीत प्रयत्न करणार त्याच्यावर असलेली चार हिरवी पाने पाण्याच्या श्रीमंतीत कुजणाऱ्या झाडापेक्षा स्वतःकडे लक्ष वेधून घेतात. जणूकाही ते आपल्याला सांगत आहे तुमची पद आणि प्रतिष्ठा कितीही
छोटी असू द्या काही फरक पडत नाही फक्त तुमचे कर्म आणि प्रयत्न जगण्याची चिवट आशा जिवंत…. असू द्या तुम्ही लक्षवेधी….. ठरणारच मग तुम्ही कुठे आहात …हा प्रश्न गौण होतो. माझ्याकडे पहा मी एवढासा जीव अक्षरशः रुजवण्यासाठी संघर्ष……करतो. जगण्याचे धागे चिवट करतो संकटांचा सामना करतो. खडकाला काही कळायच्या आत मी एक लक्षवेधी ……..वृक्ष ठरतो .आणि आनंदाने वाऱ्यावर डोलतो…… पावसात चिंब….. चिंब…. भिजतो …….उन्हाळ्याच्या तीव्र…. झळा सोसतो……तरीही मी हिरवागार …….बनुन हसतो सर्वच दुःख त्रासदायक नसतात ते आपली कसोटी पाहण्यासाठी असतात. आणि सर्व सुख समृद्धी ही प्रत्येक वेळी लाभदायक असतेच….. असे नाही. वास्तव जीवनात या दोन झाडांनी मला जीवनातील दोन पैलूंचे दर्शन घडवले……..
सिंधू व्हटकर-सोनवणे.











सुरेख
सुंदर …लिहिले
अप्रतिम