तिची आजी
भाग-१४
प्रभाकरच्या मुलीचे लग्न आटोपले.पाचही मुलांचे कुटुंब लग्नात जमले होते,सीताईला समाधान वाटले.रमाई लग्नासाठी आली होती.खूप वर्षांनी दोघी बहिणी भेटल्या.रमाई काही दिवस सीताईसोबत थांबली.
प्रभाकरने मुलांचेही जवळपासच्या खेड्यातील मुली बघून लग्न करुन दिले.त्याच्या कुटुंबाचा व्याप आता वाढला होता.सर्व खर्च शेतातुन येणाऱ्या उत्पन्नावर भागवावा लागत होता. श्रीधरची आणि मनोहरची मुले बघितले की मुलांना शिकवले नाही याची खंत प्रभाकरला बोचायची पण आता वेळ निघून गेली होती.
श्रीधरची आणि मनोहरची मुले बघितले की मुलांना शिकवले नाही याची खंत प्रभाकरला बोचायची पण आता वेळ निघून गेली होती.पुढे ….
पावसाळ्याचे दिवस होते.श्रावण नेहमीसारखाच शेतात गेला.आभाळ अंधारुन आल्यामुळे,शेतातील पीक वाढल्यामुळे श्रावणला स्पष्ट दिसत नव्हते.पिकाच्या मध्ये वाढलेले गवत उपटण्यासाठी त्याने हात पुढे केला आणि तिथे असलेल्या सापाने त्याला चावा घेतला. प्रभाकरचा जीवाभावाचा मित्र गेला.बालपणापासून श्रावण प्रभाकरची सावली बनला होता.त्याच्याशिवाय प्रभाकर एकटा पडला.आता दुसरा गडी शोधावा लागला. श्रावण सगळे घरच्यासारखे सांभाळायचा.तसा माणूस मिळणे आता दुरापास्त होते. तो नौकर असला तरी प्रभाकरला तो मित्र वाटायचा.प्रभाकरच्या चुका श्रावणच्या लक्षात यायच्या पण त्याच्या प्रेमापोटी तो त्याला विरोध करायचा नाही.श्रावण गेल्यावर उतरती कळा सुरु झाली.त्याच्या सारखा प्रामाणिक माणूस प्रभाकरला सापडला नाही.
इंदुमतीला सीताईसारखी मेहनतीची सवय नव्हती त्यामुळे ती शेतीकडे लक्ष देऊ शकत नव्हती.
मुलेही लहानपणापासून लाडात वाढल्यामुळे आळशी बनली होती.
त्यात प्रभाकरच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाले.
डाॕक्टरने आॕपरेशन करायला सांगितले.
दुदैवाने आॕपरेशन करतांना डाॕक्टरची चूक झाली. प्रभाकरची नजर कमी झाली.
त्याला रात्री काहीही दिसत नव्हते.सीताईला कळल्यावर खूप दुःख झाले. इंदुमतीला पण रक्तदाबाचा त्रास सुरु झाला.मुले आपापल्या संसारात मग्न होती.आईवडिलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता.
श्रीधर आणि मनोहरची मुलेही मोठी झाली.थोरल्या मुलांना नौकऱ्या लागल्या.
गीताचा मोठा मुलगा नौकरीवर लागला.
एकंदरीत प्रभाकर सोडून सर्वांचे व्यवस्थित सुरु होते.
सीताईचे आता वय झाले होते.पण जन्मभर मेहनत केली असल्यामुळे प्रकृती ठणठणीत होती.
आताही ती कधी रिकामी दिसायची नाही.
एकदिवस इंदुमतीला ह्दयविकाराचा झटका आला आणि त्यातच ती गेली.
प्रभाकरला दुसऱ्यांदा जोडीदाराने दगा दिला होता.
श्रावण गेल्यावर एकटा पडलेला प्रभाकर आता इंदुमतीच्या जाण्याने हतबल,दीनवाणा झाला.
मुले,सूना आपापल्या संसारात दंग होते. मुलांना आई गेल्याचे दुःख होते पण आपापले संसारही होतेच. काही दिवसात ते पुन्हा संसारात रमले पण प्रभाकरला इंदुमतीशिवाय कायमचे एकटेपण आले होते.
इंदुमती होती तोवर प्रभाकरच्या खाण्यापिण्याची जबाबदारी तिच्यावर होती आता ती गेल्यावर सुनांना ती जबाबदारी नकोशी झाली. त्याला जेवण देणेही त्यांना कष्टाचे वाटत होते. सीताईने एकटेपण अनुभवले होते.प्रभाकरचे दुःख ती समजू शकत होती.
स्वाभिमान बाजूला ठेवून ती रोज प्रभाकरला भेटायला जात होती. प्रभाकर आता थकला होता.
आईला आपण खूप एकटेपणा दिला ही खंतही त्याचे मन पोखरत होती.भावांसोबत आपण चांगले वागलो नाही हेही त्याला जाणवत होत्या.खूप गोष्टी वेळ निघून गेल्यावरच लक्षात येतात.
सीताईला प्रभाकरचा एकटेपणा,त्याची कमी झालेली नजर
हे सगळेच दुःखदायक वाटायचे.
अशातच गीता एका सहलीला गेली असतांना तिचा अपघात होऊन त्यातच ती गेली.सीताईवर दुःखाचा पहाड कोसळला.गीता सगळ्यात धाकटी,सीताईची लाडकी होती.आयुष्यात खूप दुःख पचवलेली सीताई आता मात्र खचून गेली. आता हे दुःख जन्मभर तिची साथ सोडणार नव्हते.
इकडे प्रभाकरची नजर दिवसेंदिवस कमी होत होती.त्यात मुलांनी वाटण्यांसाठी हट्ट धरला.मुलांपुढे प्रभाकरचे काही चालले नाही. शेती वाटल्या गेली. प्रभाकरने स्वतःकडे चार एकर ठेऊन मुलांमध्ये वाटली. शेतीची वाटणी झाली कि आधी मोठी भासणारी शेती कमी कमी होत जाते.
शेतीची वाटणी झाली पण प्रभाकरचे काय त्याला स्वतःकडे ठेवायला कुणीही तयार नव्हते. प्रभाकरने एवढे मोठे घर बांधून त्यालाच आता तिथे जागा नव्हती. सीताई आता त्याला तिच्या घरी घेऊन आली, प्रभाकर त्या घरात राहायला गेल्यानंतर जुन्या घरी पहिल्यांदाच आला.
नशिबाचे फासे कसे फिरत राहतात.
जे घर सोडून तो ऐटीत नवीन घरी गेला त्या घराने निराधार केल्यावर पुन्हा जुन्या घरानेच आधार दिला.
क्रमशः
Previous Link
प्रभाकरला जुने घर आधार देते.पुढील कथा पुढील भागात अवश्य वाचा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
छान कथा
👌🏻👌🏻👌🏻👌🏻mast
छान कथा मालिका