बोलके चित्र-नेत्रकिमया
बोलके चित्र-नेत्रकिमया

बोलके चित्र-नेत्रकिमया

बोलके चित्र-नेत्रकिमया

नेटवर उगाच टाईमपास करत असता, हे डोळ्यांचे चित्र दिसले. क्षणभर त्याकडे पहात असताना, डोळ्यांचे महत्व, त्यांना एकंदर असलेला मान, लक्षात आला..

उगाच त्याकडे कानाडोळा करण्याऐवजी, त्यांचे महत्व डोळ्याखालून घालू

म्हणजे बघा हं…इतर ज्ञानेंद्रियां पैकी फक्त जीभ आणि डोळेच प्रतिवाद करतात, अथवा व्यक्त होतात. त्यातही जीभ आपल्या वाचाळपणासाठी प्रसिद्ध आहे. आवाज खूप पण अर्थापेक्षा अनर्थच जास्त. डोळ्यांचे तसे नाही….आवाज अजिबात नाही, पण अर्थ अगदी काळजाचा ठाव घेणारा….

एखाद्याचे विकृतपणे पहाणे त्रासदायक ठरते, तर प्रिय व्यक्तीचे पहाणे मन मोहरून टाकते,
गुरूची करडी नजर शिष्याचे आयुष्य घडवते
शोले मधील ठाकुरची थंड नजर मनात खदखदणारा ज्वालामुखी दाखवते

बर इतर अवयवांपेक्षा….डोळे आणि केसच असे आहेत की ज्यांची सौंदर्यप्रसाधने अगदी अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतील.. इतकी आर्थिक उलाढाल करतात, म्हणजे एका अर्थी ते economy वर ही नजर ठेऊन असतात की !!!!

लग्नाच्या बोलाचालीमध्ये मुलीचा / मुलाच्या चष्म्याचा नंबर……त्याचा / तिचा मनातला नंबर खाली वर करू शकतात….म्हणजे बघा….!!!

एकंदर मराठी भाषेतही डोळ्या वरून माझ्या मते सगळ्यात जास्त म्हणी, वाक्प्रचार आहेत……

म्हणजे बघा बरका……डोळ्याला डोळा भिडवणे म्हणजे विद्रोह करणे…..तेच डोळ्यात डोळे मिसळणे, म्हणजे समर्पित होणे…..डोळा मारणे म्हणजे विकृती….डोळा ठेवणे,म्हणजे लबाडी चोरी चा उद्देश…..
प्रेमिकांचा आपसात चालणारी नेत्रपल्लवी…हा तर एक वेगळाच विषय होईल…..

डोळ्यांच्या सौंदर्यावरून सुनयना….केसांच्या सौंदर्यावरून सुकेशा अशी विशेषणे आहेत…पण इतर अवयवांच्या सौंदर्यावरून असे विशेषण माझ्या डोळ्यासमोर तरी आले नाही…..म्हणजे…कानावरून…सुकानी…..नाकावरून….सुनाकी…..छे काहीतरीच वाटते….
आपल्या शरीराच्या फार कमी अवयवांना माणसाचे आडनाव होण्याचा मान मिळाला…त्यापैकी डोळे एक आहेत……पण त्यातही…..डोळे आडनावाचा माणूस डोळसपणे सगळी परिस्थिती समजून घेत असेल असे नाही हं…

एवढेच काय तर…..आपल्या मृत्यू नंतर….दुसऱ्याचे जीवन फुलवण्याचे काम करण्यात डोळ्यांचा नंबर खूपच वरचा आहे…..म्हणजे जितके लोक नेत्रदानाबाबत जागरूक आहेत तितके इतर अवयवांबाबत दिसत नाहीत.

अबबबब…हे डोळे महात्म्य अगदीच डोळे दिपवणारे आहे की……………..
चला आता माझाही थोडा डोळा लागतो आहे…….वेळीच थांबलेले बरे…..नाहीतर……ह्यांना इतका वेळ कसा मिळतो…..हे तुमच्या डोळ्यात यायचे………

वैशाली जोशी ..खोडवे

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

https://marathi.shabdaparna.in/प्रेमकथा

 

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!