भाग-2-हरवलेल्या मित्राची गोष्ट(सत्यकथा)
भाग-2-हरवलेल्या मित्राची गोष्ट(सत्यकथा)

भाग-2-हरवलेल्या मित्राची गोष्ट(सत्यकथा)

जयू, आज त्याची फक्त दहावी नापास एवढीच ओळख होती.मूळ गाव कंधार….जिल्हा नांदेड.
नापास झाला तसा घरातून निघाला,मार्कमेमो ची खिशात गुंडाळी करून कोंबली,आणि घरातून निघाला तो तडक गावच्या सीमेबाहेर एका पुलावर उभा होता.निर्मनुष्य रस्त्यावर दुरून एक गाडी येताना त्याला दिसली .ती त्याच्याजवळ येऊन थांबली.गाडीतून एक पन्नाशी उलट लेला इसम डोकावला,”बेटा,… ये रास्ता नांदेड की तरफ जाता क्या?”
कुणी दूरची परकी family वाटत होती.त्याने लगेच.
“हाँ चलो मैं बताता हूं। “म्हणत सरळ गाडीतच बसला…
कुठे जातोय? काय करतोय?कुठे थांबणार?खिशात नापासचा मार्कमेमो,अंगात कपडे,बस्स्स, बाकी आपण काय करतोय,त्याला काहीच कळत नव्हतं….!
पुढचे भविष्यच माहित नव्हते.
माणसाचा क्षणाचाही भरवसा नसतो म्हणतात ते असे.नशिबाचे फासे पालटले जणू त्याच्या ,पण तेही अशा पद्धतीने….बापरे…!
गाडी मालक मोठा गुजराथी माणूस वाटत होता. सोबत त्याची family होती.1 मुलगा,1 मुलगी आणि पत्नी अशी मोठी असामी दिसत होती.नांदेडला उतरून जावे असे त्याच्या मनात होते ,पण नियतीने काही वेगळेच निश्चित केले होते.गाडी १००/१५० किलोमीटर गेली असेल नसेल तोच गाडीला मोठा अपघात झाला.क्षणात होत्याचे नव्हते झाले.जयू कोमात गेला.दुर्देवाने गाडी मालक आणि जयू दोघेच वाचले.त्याची family मात्र जागीच संपली होती.तो व्यापारी मालक बिचारा वयोवृद्ध होता.पार कोलमडून गेला,त्याची मनःस्थिती काय झाली असेल,कल्पनाही करवत नव्हती.किती भयानक होत हे सारं….!
पण तो बापडा धीराने उभा राहिला.जयू चा श्वास चालू होता.हे कळताच आजूबाजूला जमलेल्या लोकांच्या मदतीने त्याने जयू ला हॉस्पिटल मध्ये दाखल केले.जयू शुद्ध हरपला होता.तो कोमात गेला होता.
देव सुद्धा किती परीक्षा पाहतो ना…? नाव,गाव,पत्ता काहीच माहित नसलेल्या चा तो इसम बाप झाला होता..! या मुलांच्या घरी कळवायचे तरी कसे? हा प्रश्न त्याच्यासमोर होता. खरं तर खिशातल्या मार्कमेमो वरून हे सर सोपं झालं असतं.पण व्यापारी तो व्यापारीच.बुद्धीने हुशार होता.त्यानं विचार केला, आपलं तर पूर्ण कुटुंब गेलं.आपण एकटे पडलो आहोत.एवढी सारी संपत्ती,व्यापार याचे मी काय करू?माझ्या आयुष्याचा काय भरवसा?कोण पाहणार?कोण सांभाळणार?
आणि व्यापाऱ्याने जयू ला सोबत घेऊन जायचे ठरवले.तो शुद्धीवर आला खरा.पण मेंदूला झालेल्या इजे मुळे त्याची स्मृती गेली होती.त्याला काहीच आठवत नव्हते.या गोष्टीचा व्यापाऱ्यास हि जणू फायदाच झाला होता.तो जयंतास घेऊन दिल्लीला रवाना झाला….!
हे सारे त्याच्या तोंडून ऐकताना जणू सारा चित्रपट डोळ्यासमोरून सरकतोय असंच वाटतं होतं.

क्रमशः……

अंतिम भाग Link

https://marathi.shabdaparna.in/भाग-3-हरवलेल्या

प्रिया देशपांडे

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!