मराठी नाटक- मी स्वरा आणि ते दोघं 
मराठी नाटक- मी स्वरा आणि ते दोघं 

मराठी नाटक- मी स्वरा आणि ते दोघं 

मराठी नाटक- मी स्वरा आणि ते दोघं
 मी, स्वरा आणि ते दोघ-आगळा विषय घेऊन आलेले मराठी नाटक
“खुपदा किंवा नेहमीच असे होते,लग्नापूर्वी चांगले मित्र -मैत्रीण असे असलेले नाते नवरा बायकोत परावर्तित झाले कि अती परिचयात अवज्ञा असे काहीसे अनुभवास येते.
जोडीदाराकडून अपेक्षा आणि  त्या पूर्ण  न झाल्याने होणारा अपेक्षाभंग”.
मी, स्वरा आणि ते दोघ!
नाटकाची सुरुवात मंजुषा(निवेदिता सराफ)पासून होते.यशवंत (विजय पटवर्धन)मंजुचा वर्गमित्र आणि  आधीचा प्रियकर जो मंजुवर खूप  प्रेम करतो,तिच्या आवडीनिवडी पूर्ण  करतो.
मंजु त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेते.
 मंजु रसरसून जीवन जगणारी,विनोदबुद्धी असलेली,मनाचा कौल मानणारी,बिनधास्त स्वभावाची.तिच्यामनाविरुद्ध मि.रानडेसोबत तिचा विवाह होतो.सासरी सगळ्यांची मने जपण्यात आयुष्य  घालवणारी मंजु मि.रानडे  गेल्यानंतर ती जीवनाकडे आशादायी दृष्टीने बघायला लागते.लग्न  लवकर झाल्यामुळे अपूर्ण राहलेले  शिक्षण तिला पूर्ण करायचे आहे. जीवन तिच्या मनाप्रमाणे  जगायचे आहे,रोच्या रुटीनमध्ये खूप  मिस् झालेल्या गोष्टी आता करायच्या आहेत.
 आणि  हे सर्व  करतांना लोक काय म्हणतील याचा अजिबात  विचार करायचा नाही असे ती ठरवते.लोकांसाठी,लोकांचा विचार करत जगलेले आयुष्य आता तिला नको आहे.
 याउलट यशवंतचा स्वभाव आहे. साधा,सतत समाजाची पर्वा करणारा,स्वतःचे मत नीट मांडू न शकणारा यशवंत ,मंजुवर जीवापाड प्रेम करणारा, तिच्या आवडीनिवडी जपणाऱ्या  यशवंतची भूमिका विजय पटवर्धन यांनी उत्तम साकारली आहे.
मंजुची एकुलती एक लेक स्वरा(रश्मी अनपट)
स्वभावाने सालस,हळवी
 स्वरा एकदा सागरकडून आणि  दुसऱ्यांदा मंगेशकडून फसवली जाते.
तिला आता मंगेशपासून डिव्होर्स हवा आहे.ती आईजवळ राहायला येते.
तिच्याच आॕफिसमध्ये पुणेकर कपिल (सुयश टिळक) असतो.त्याला स्वरा आवडते.
स्वभावाने बिनधास्त असलेल्या मंजुच्या डोक्यात एक वेगळी कल्पना येते.
तिच्यावरील प्रेमापोटी यशवंत,स्वरा ,कपिल तिची कल्पना मान्य करतात आणि  चौघे सोबत राहायचे ठरवतात. सोबत राहतांना होणाऱ्या गमतीजमती,अनुभव ,अनुभवाने आलेले  शहाणपण  दिग्दर्शक नितीश पाटणकरने उत्तम रंगवले आहे.
लेखक आदित्य मोडक यांनी हे नाटक लिहिले आहे. काही संवाद खूप खरे वाटतात.
मंजुची भूमिका निवेदिता सराफ यांनी सुरेख वठवली आहे.
मंजु आणि पुणेकर कपिलचे संवाद  बघण्यासारखे आहेत.
स्वरा बनलेली रश्मी अनपट आणि  कपिलच्या भूमिकेतील सुयश टिळक यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे.कपिलमुळे नाटक जास्त energetic झाले.कपिलची संवादफेक लाजवाब.
वेगळा विषय,उत्कृष्ठ कथा ,उत्तम मांडणी ,सुरेख अभिनय,टायमिंग साधणारी संवादफेक असणारे चंद्रकांत लोकरे  निर्मित नाटक
मी,स्वरा,आणि ते दोघं  प्रेक्षणीय  झाले आहे.
 सिनेमांचे रसग्रहण वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा.

https://marathi.shabdaparna.in/सिनेमा

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!