Thappad थप्पड- बस एक थप्पड ही तो था Review
Thappad थप्पड- बस एक थप्पड ही तो था Review

Thappad थप्पड- बस एक थप्पड ही तो था Review

Thappad
– बस एक थप्पड ही तो था Review
बस एक थप्पड ही तो था,इसमें इतना बवाल क्यूँ?
वर्षानुवर्ष  बायकोला संपत्ती मानणाऱ्या वर्गाला हा प्रश्न न पडला तरच नवल.
एक थप्पडच तर मारली—त्यात विशेष काय?
थोडा बर्दाश्त करना सीखना चाहिए औरतोकों.
थप्पड- एका स्त्रीचा स्वतःचा आब राखण्याचा प्रवास तापसी,पवैल गुलाटीच्या दमदार अभिनयाने सजलेला
हा सिनेमा बघायला बरीचशी जोडपी  दिसली.त्यातही मध्यमवयीन जास्त.(म्हणजे स्वाभिमान बरेचदा चकनाचूर झालेल्या  स्त्रिया आणि त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणारे नवरे जास्त)
स्त्रियांचा स्वाभिमान—खूपदा ऐकून ऐकून  गुळगुळीत झालेला  शब्द.    ह्या शब्दाचा मान राखणारा हा सिनेमा.
स्त्रियांचा मान किती जपावा,कुणी जपावा? या प्रश्नांची उत्तरे देणारा हा सिनेमा.
अमृता उच्चशिक्षित, CLASSICAL DANCER, संसाराची आवड असल्याने करियर न करता विक्रमसोबत समर्पितपणे संसार करते.  त्याच्या स्वप्नाला स्वतःचे स्वप्न मानू लागते.  दोघांमध्ये सर्व सुरळीत सुरु असतांना नवऱ्याला येणारे  FRUSTRATION  एका झटक्यात बायकोला थप्पड देवून बाहेर काढतो.
तिच्या आधी त्याला समजवायला गेलेला मित्र , भाऊ यांच्यावर तो हात उगारत नाही.
असे का? भावाला,मित्राला थप्पड न लगावता बायकोलाच का?
सिनेमा खरे तर या दृश्यापासूनच सुरु होतो त्याने तिला मारलेली एक थप्पड तिचे मन आणि पर्यायाने संसार उध्वस्त व्हायला पुरेशी ठरते. स्वतःचा मान चकनाचूर झाल्याने अपमानित झालेल्या  तिला  विक्रमसोबत राहणे असह्य होते.
तर विक्रमची मानसिकता
 इतना बड़ा तो कुछ नहीं हुआ ना। लोग क्या सोचेंगे मेरे बारे में कि बीवी क्यों भाग गई?
 तिची सासू
 घर समेट कर रखने के लिए औरत को ही मन मारना पड़ता है
तिची आई
  यही सुनना रह गया था कि बेटी तलाक लेगी? क्या गलती हो गई थी हमसे?
आजूबाजूला अशी मानसिकता असलेल्या स्त्रिया असूनदेखील अमृता मनाची ताकद हरवू देत नाही. पुरुष असलेल्या तिच्या वडिलांचा तिला भक्कम आधार मिळतो.
थप्पड मारल्यानंतर तिची होणारी तगमग,मनाची घालमेल,सर्वस्व दिल्यानंतर आपली संसारात किंमत काय,
समाजाचा  स्त्रीवर असणारा दबाव ….हे सगळे अनुभव सिन्हाने अचूक टिपले आहे आणि  त्याला अर्थातच तापसीच्या कसदार अभिनयाने  हातभार लावला आहे.
नायक बनलेल्या गुलाटीचा  अभिनयही  दाद देण्यासारखा आहे.
श्रीमंत,बायकोला गृहीत धरणारा, करियरसाठी सर्वस्व पणाला लावणारा, चूक करुनही SORRY न म्हणणारा पण आपल मुल दुरावलेल्या बायकोच्या पोटात वाढतेय हे बघून सैरभर होणारा  आणि शेवटी उपरती(वेळ निघून गेल्यावर) होणारा हतबल नवरा गुलाटीने उत्तम रंगवला.
सिनेमात वडील आणि  मुलीचे सुंदर नाते दाखवलेआहे.
मुलगी घरी कायमची आली ,थोडी सहनशीलता दाखवून ती परत गेली तर काय बिघडेल ह्या विचाराची आई.
तर मुलीला योग्य वाटेल तेच तिने करावे या प्रगत  विचाराचे वडील कायम मुलीच्या पाठीशी  असतात.
अमृताशिवाय सिनेमात वेगवेगळा सामाजिक,आर्थिक स्तर असलेल्या पण पुरुषी मानसिकतेच्या बळी ठरलेल्या पाच स्त्रिया दाखवल्या आहेत.
नवऱ्याचा रोज मार खाऊनही आपल्यावर अन्याय होतो याची जाणीवच नसणारी अमृताकडे काम करणारी मोलकरीण आहे.
रोज मार खाणारी ती नवऱ्याला प्रश्न विचारते
 “क्यों मारते हो मुझे?” यावर नवऱ्याचे उत्तर
  “तुम्हें मारने के लिए लाइसेंस चाहिए क्या मुझे?
दुसरी स्त्री अमृताची आई(रत्ना पाठक) आहे.समजून घेणारा जोडीदार मिळूनही काही इच्छा अपूर्ण असणारी.
अमृताला सतत तडजोड करण्याचा सल्ला देणारी.
“औरतों को मन मारना पड़ता है.. थोड़ा बर्दाश्त करना सीखना चाहिए”
तिसरी स्त्री अमृताची सासू(तन्वी आझमी) जी स्वतःची ओळख जपण्यासाठी पतीपासून वेगळी राहते.पण सूनेच्या बाबतीत
बेटा परेशान था, हो गया उससे।
असा  विचार करणारी.
चवथी स्त्री  आहे अमृताची वकील नेत्रा(माया सराओ)
प्रसिद्ध न्यूज ॲकरची पत्नी आणि  अतिशय यशस्वी वकीलाची सून असलेली नेत्रा लायक असूनही या दोघांच्या वलयात अडकून राहते.
पाचवी स्त्री  आहे अमृताची वहिनी.
अमृताची आई आणि  भावाला तिचा वेगळे राहण्याचा निर्णय पटत नाही पण तिची वहिनी तिच्यासोबत ठामपणे उभी असते.
सिनेमाचा शेवट अनपेक्षित आहे. आपली मानसिक जडणघडण आणि  पुरुषप्रधान संस्कृती  शेवटपर्यंत  ती त्याला क्षमा करेल,एक थप्पडच मारली. एका थप्पडसाठी घर तोडणे योग्य नाही….हाच विचार करते.
५०% औरते मायकेमे रहेगी….हे वाक्य मन हेलावणारे असले तरी वास्तव दाखवणारे आहे.

अनुभव सिन्हाने  अमृता तर परत जाणारच ह्या विचारसरणीला धक्का देत  शेवट वेगळा केला आहे.

सिनेमाचा शेवट
थप्पड इतनीसी नही है
ही जाणीव देतो.
सिनेमात  ‘कुछ कमसा है’ अर्थपूर्ण गाणे चपखल बसले आहे.
त्यातील काही ओळी
टूट के हम दोनोमें जो बचा वो कमसा है
एक धागेमें है उलझे यूँ
 बनते बनते खूल गये
हम थे लिखे दिवारोपें
बारिश हूई और धूल गये
शब्दपर्णवरील इतर सिनेमांचे रसग्रहण वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
इतर सिनेमांचे रसग्रहण वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा.

https://marathi.shabdaparna.in/सिनेमा

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण पाठवून शब्दपर्ण टीममध्ये सामील व्हा.आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी  फेसबुक पेज शब्दपर्ण जरुर follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!