*ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला*
*भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता*
*मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू*
*तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें*
*मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन*
*विश्वसलो या तव वचनी । मी*
*जगदनुभव-योगे बनुनी । मी*
*तव अधिक शक्त उद्धरणी । मी*
*येईन त्वरे कथुन सोडिलें तिजला सागरा, प्राण तळमळला*
*शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी*
*भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती*
*गुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें*
*जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा*
*ती आम्रवृक्षवत्सलता । रे*
*नवकुसुमयुता त्या सुलता । रे*
*तो बाल गुलाबहि आता । रे*
*फुलबाग मला हाय पारखा* *झाला । सागरा, प्राण तळमळला*
*नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा*
*प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी*
*तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या*
*भुलविणें व्यर्थ हें आता । रे*
*बहु जिवलग गमतें चित्ता । रे*
*तुज सरित्पते जी सरिता । रे*
*त्वद्विरहाची शपथ घालितो* *तुजला । सागरा, प्राण तळमळला*
*या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा*
*त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीते*
*मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी*
*तरि आंग्लभूमी-भयभीता । रे*
*अबला न माझिही माता । रे*
*कथिल हे अगस्तिस आता । रे*
*जो आचमनी एक क्षणी तुज* *प्याला । सागरा, प्राण तळमळला*
*रसग्रहण :*
सावरकरांनी लिहलेल्या या गीतास “मोठ्या गौरवाचे गावं” म्हणले तर वावगे नाही. शब्दशब्दातून प्रकट होणाऱ्या वेदना आणि देशभक्ती फुलून येते. साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतिरी त्यांना स्फुरलेलं हे अप्रतिम गीत.
तारुण्यातील उत्साह आणि देशभक्ती नसानसात भिनलेली. देशप्रेमाचं वार डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक म्हणजे सावरकर.
इटलीला स्वतंत्र्य मिळवून देणाऱ्यात सिंहाचा वाटा असलेल्या मँझेनीच आत्मचरित्र सावरकरांनी भाषांतरित करून भारतात पाठवलं होतं. त्याची प्रस्तावना एवढी प्रेरणादायी होती की ब्रिटिश सरकारला भीती वाटली आणि त्यावर बंदी आणली गेली.
माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तर तो क्रांतिकारी बनतो या मताचे सावरकर.
परिस्थितीला सामोरे जाताना आपण पकडले जाणार हे कळताच पळून जाऊन तो ब्रायटनच्या किनाऱ्यावर बसले होते. पकडले गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाहीच अत्यंत अस्वस्थ वाटणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून आपण जाऊ शकत नाही आणि तेव्हा आपसूकच आलेले शब्द म्हणजे ‘ने मजसी ने’……
सागरावर रुसलेला हा देशभक्त म्हणतो – सागरा तू भूमातेचा सेवक.भूमतेचे पाय धुताना मी तुला नित्य पहिला आहे.त्यावेळी तू मला फिरायला एकत्र जाण्यासाठी साद घालत होतास. दुसऱ्या देशात जाऊ असही म्हणाला होतास. सृष्टीची विविधता पाहू |
सुष्टीची विविधता पाहण्याची इच्छा झाली होती. त्याच वेळी माझ्या आईच्या हृदयातील हुंकार मला ऐकू येत होता. माझा विरह तिला नाही सहन होणार याची खात्री होती मला.
*त अ जननी हृदय विरहंश* *कितीही झाले। परी तुवा वचन तीज दिधले.*
पण तू वचन दिलंस – की मार्गस्थ म्हणजे वाट माहिती असणारा आणि मी याला पाठीवरून घेऊन जाईल मार्गशः स्वये मीच पुष्टी वाहीन.
तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू अथांग आहेस सागरा त्यामुळे तुझा अनुभव पण या विश्वासावर मला जगण्याची सुंदर अनुभूती यावी ही एक इच्छा.
मी लवकर येईल असं सांगून भारत मातेचा किनारा सोडला, पण आता जमेल की नाही ठाऊक नाही म्हणून तर प्राण तळमळतो आहे.
शुक्र पंजरी हरीण शिरावी शिरावी पाशी। ही फसगत झाली तैशी
पिंजऱ्यात पोपट आणि पार्ध्याच्या जाळ्यात हरीण अडकावा तसा मी इथे फसलो आहे. सार अंधःकारमय दिसत आहे, मार्ग सापडत नाही असं होऊन बसलंय.
सावरकर म्हणतात – मला आठवतं माझ्या देशात आम्रवृक्षांची वत्सलता त्या सुंदर वेली, इकडे ते सारे कुठेच दिसत नाही. प्रासाद मोठे मोठे असले तरी, माझ्या भारत मातेची झोपडीचं मज प्रिय आहे.
शेवटच्या कडव्यात त्यांची आर्तता आहे. विशेषतः ती दिनवाणी नाहीतर ती आक्रमक आर्त आहे. संकटात सापडलेल्या सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून सिंहाची डरकाळी आहे.
सागराला सरितेची आन घातली आहे. नायकाने आव्हानं दिल्यावर खलनायक हसतात असं वाटून ते म्हणतात
*या केन मिषे हससी निर्दयी कैसा ।*
*का वचन भंगसी ऐसा.*
माझ्या भारत भू ला तू वचन दिले होतेस. मी याला परत आणेल, मग आता का शांत आहेस?
भारत भू पण काही अबला नाही. हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ती ऋषींचा प्रसंग विसरलास का? तुझ्यावर कोपुन त्यांनी एका आचमनातंच तुझं सगळं पाणी पिऊन बसले होते, सर्वांनी प्रार्थना केली म्हणून तू वाचलास अन्यथा…..
प्रिया देशपांडे











मस्त
सुंदर रसग्रहण
सुरेख रसग्रहण