हासुन फारकत-varhadi katha
हासुन फारकत-varhadi katha

हासुन फारकत-varhadi katha

आजी… आजी.. नीलू धावत आली..
काय व नीलू… काऊन बोंबलुन रायली..
अव आजी तो सिनेमातला भुवन तुले माईत आहे न त्यान काय केल
तुले माईत आहे काय..
नाई बापा..मले कस माईत राईन काई ..आज बातम्या नाई पायल्या .. अन हा भुवन कोन होय व..
काय बीचारे आजी तुले तो लगान सिनेमा दाखवला नोता काय.. त्यातला भुवन..आपल्या गावात शुटींग कराले आला नोता काय तो.. लोकायन किती जीव लावला होता त्याले..अन ते गौरी किती साजरी दिसे.. तिले ते खेड्यातले कपडे लयच शोभुन दिसे..

अव माय.. तो भुवन त मले चांगला माहित आहे.. सिनेमाभर नीरा क्रिकेट खेळत रायते… अन लोकायला शिकवते.मले लयच आवडते तो ..त्याची अन गौरीची जोडी लयच शोभुन दिसे..मले त वाटे या दोघान लगनच करून घ्याव.. भुवनले विचारल म्या तस..तसा तो हासला.. म्हने कसा… अव आजी मले दोन लेकर हायेत …लयच जवान दिसते.. साजरा दिसते…अन त्याचा तो कोनता सीनेमा होता व पोलिस दाखवला त्याच्यात..

अव आजी तो सरफरोश होता.
अव माय तो सिनेमा मले लयच आवडते..तो सिनेमा पायला अन आपल्या गावातला गन्या पोलीसात भरती झाला. तो त्या भुवनचा लय मोठा फॕन हाये अस तो सुम्या सांगत जाये.
भुवनचा वाढदिवस असला का रक्तदान करते तो.

मले त फॕन समजेच नाई म्या म्हनल त्याले.. सुम्या हे फॕन काय होय रे…तसा तो हासाले लागला.. म्हनते कसा ..
आजी तुले इग्रंजी नाई समजत ..जाऊ दे.

भुवन अन त्याची बायको आपल्या गावात मागल्या वर्षी आहे होते.. ते आले तवापासुन गावात पाण्याची रेलचेल झाली.
काय केल व त्यान..?… मले त लय गरीब दिसे तो.
अव त्यान दुसऱ्या बायकोला सोडून दिल.. नीरा सकायपासुन तेच सुरू हाये. लोक कामधंदा सोडून तेच पाऊन रायले. कोनालेच कुनकुन नोती तो असा करन म्हणून लोक त नीरा हपचप झाले. दोघाच चांगल पटे..

अव माय… लेकरू हाये न त्यायला… सोन्यासारख
काय बुद्धी सुचली त्याले मतारपनात पन्नाशीच्या वर हाये ना बापा तो.. आपल्या अटीसा त नातु रायतात बापा… दिवसभर बुढा… बुढी म्हनत रायतात..

अरे नीलु तु झाली तवा मी चाळीस वर्षाची होती. आजी झाली मी तवापासुन मले गावात बुढी… बुढी मनाले लागले.
अव आजी ते पाय जना बुढी येऊन रायली. तुईवाली मैत्रीण..नीरा लगलग फिरत रायते गावात.. कुठ काय चालु हाये तीले माईत रायते.

काय करन माय.. लय वाखे हाये तिचे..
यव जना… बस आमाशी….
काव गंगा .. त्या भुवनले पायन बिचारे कशी बुध्दी सुचली ..छप्पन वरसाचा हाये ना तो..पोरा बाळाचे लगन कराच वय हाये त्याच.. अन आता तोच तिसर लगन करनार हाये म्हनते.

अव जना मले बी धक्का बसला पन काय करत खरी गोष्ट हाये.. टी वी वर तेच चालु हाये म्हनते. मले त या कामाच्या रगाड्यात टी वी पाहाले फुरसत नाई.
अव या फोटो त पाय दोघबी हासुन रायले.. त्या लेकराले दोघबी सांबायनार हायेत.. अन ते पान्याच काम बी दोघमिळुन करनार हायेत.. भांडन बी नाई दोघाच..

अव माय गंगा मंग सोबतच कावुन नाई रायत बापा.. ऐवढा तीतंबा कायला करत्यात.. आपल्या गावात त आधी कचाकच भांडन होते रोज मारामारी होते.. सार गाव जमा होते.. मंग कुठीसा फारकतीचा विचार येते डोक्शात त्यायच्या.. हे त नवीनच हाये बापा.. हासुन फारकत

अव त्या सीनेमातल्या लोकायच लय निराळ काम हाये.. बीचारे आपले त रोजचे खायचे वांदे हायेत.. दिस निगांला का चुल कशी पेटन याचा ईचार करा लागते.. कोनत्या स्कीमा आपल्या पर्यत पोचत नाई.. नीरा हाल हायेत…

या लोकाले आपन मोठे करतो.. आजकालचे पोट्टे मायबापापरीस त्यायची पुजा करत्यात.. ते काय खातेत.. पितेत याची सबन कायजी असते .. स्वतःच्या कमाईची त्यायले फिकीर नाई.

चल बाई गंगा जातो घरी त्या भुवनच्या नादी लागल्यान आपल भल होनार हाये काय..त्यान तीसर लगन केले का मले सांगजो व नीलु.. दोनी बायका लय साजऱ्या होत्या. दुसरी आपन पायली मस्त नाजुक.. साजुक होती..

मले त लय खराब वाटुन रायल..बिचारी कुठ राईन व आता
अव आजी … त्या लोकाची सगळी सोय असते .. मोठे .. मोठे बंगले असत्यात .. गाडी ..घोडे समद असते.. तु कायजी नोको करू.ऊद्या सकाई वावरात जा लागते निंदाले.
हो माय जातो बरोबर. त्या भुवनची तीसरी बायको दाखवजो मले…

ज्योती संजय रामटेके

ही विनोदी,वऱ्हाडी कथा आवडल्यास कृपया शब्दपर्णच्या YOU TUBE CHANNEL ला भेट दया

https://youtu.be/zsRFQnM1yio

शब्दपर्ण साईटवरील इतर व-हाडी कथा वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा.
ज्योती संजय रामटेके

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!