गाडी पहावी शिकून-मराठी विनोदी कथा
काल माझ्या मैत्रीणीने गाडी घेतली अन् मला एकदम माझ्या गाडी शिकण्याचे दिवस आठवले..
आम्ही गाडी घेतली अन् मग आमच्या अहोंसोबत गाडीत फिरण्याचे दिवस मी enjoy करु लागले …पण नंतर त्यातील पण उत्सुकता हळूहळू कमी होऊ लागली ..
एक दिवस मलाअसेच खूप बोअर होत होते ..मी ह्यांना म्हणाले कि..
चला ना आपण जाऊ कुठेवरी फिरायला …
आजच्या भाषेत …long drive ला . ..पण त्यांना काम असल्याने.. मला साफ नकार मिळाला
…आणि एवढी गाडी उभी आहे ..तर तू घेऊन जा कि….
अशी वरतून सुचना पण आली …पण मला तर गाडी चालवता येत नव्हती ..
परंतु त्यांचे हे वाक्य मी एक challenge म्हणून स्विकारले..आणि लगेच ड्रायव्हिंग क्लास चा शोध सुरू केला ..
पण माझ्या मैत्रीणींचा ड्रायव्हिंग क्लास चा अनुभव फार काही चांगला नव्हता.. त्यामुळे तो नाद मी सोडून दिला… आणि मग काय करता येईल याचा विचार करु लागले……
एकदम डोक्यात idea आली …ह्यांच्या कडूनच गाडी शिकले तर……कसेबसे त्यांना तयार केले ….अन् मग सुरु झाला आमचा ड्रायव्हिंग चा क्लास….. दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन उठून मी खूप उत्साहात तयार झाले ..
(खूप दिवसांनी असा उत्साह अंगात संचारला होता .) आणि खाली गाडी जवळ येऊन थांबले.. पण ह्यांची काही लवकर येण्याची चिन्हेच दिसेना…. जसा जसा उशीर होत होता.. तसा तसा माझा रागाचा पारा हळूहळू चढू लागला ..पण मला तसे होऊ द्यायचे नव्हते… कारण आजपासून ते माझे गुरु आणि मी त्यांची शिष्या होते…
खूप वेळा नंतर गुरुंचे थाटात आगमन झाले. चेहऱ्यावर असे काही भाव होते कि विचारू नका
पण …..
उघड ती गाडी ….. *अहो*
मी गाडी उघडून पटकन ड्रायव्हर सीट वर जाऊन बसले..
उठ …. *अहो*
का ? .. *मी*
उठून बाजूच्या सिट वर बस ..
काय करणार गाडी शिकायची होती ना…उठून चुपचाप बाजूच्या सिट वर जाऊन बसले..
त्यांनी मग गाडी चालू केली …आणि आज फक्त स्टिअरींग ..वर लक्ष दे ..असे म्हणून ते गाडी चालवू लागले हे तर अजबच..
*मी* काय लहान आहे का? नुसते बघायला.. अरे मला गाडी शिकायची आहे ,बघायची नाही….
.पण ……पण ..मी हे फक्त मनातच बोलले… जोरात बोलून..उगाच सगळेच काम निकालात निघाले असते ..अशातच दोन तीन दिवस गेले ….त्यानंतर
आज आपण गिअर टाकायला शिकू या …. *हे*
जशी आज्ञा …. *मी*..
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
मस्तच.
मस्त ..
मस्त.
Mi pan pahili shikun gadi 😃🌹🌹🌹
Nice