अगं थांब जरा इकडे तिकडे उड्या मारू नको बरं काहीतरी सांड लंवंड करशील. स्मिता आपली इकडून तिकडे धावत होती.
ये बरं माझ्याजवळ
ऐकल्याबरोबर ती स्मिता जवळ येऊन बसली. स्मिताने खूप प्रेमाने तिला जवळ घेतलं आणि समजावत बोलायला लागली . फारच खट्याळ झाली आहेस तू आता.
कुची स्मिताच्या मांडीवर जाऊन बसली. कुच्ची ने आपलं गाऱ्हाणं स्मिता समोर मांडायचा प्रयत्न केला पण स्मिता ला काही कळेना
. स्मिता म्हणाली चल तू तुझ्या जागेवर जाऊन बस मी काहीतरी खायला आणते तुला भूक लागली आहे का?
हे ऐकल्याबरोबर कुच्ची चे डोळे लुकलुकले. स्मिताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं अच्छा हे सांगायचं होतं का बर स्मिताने तिची ताटली घेतली आणि तिच्या ताटलीत थोडं दूध घातलं आणि त्यात तिचा खाऊ पण घातला.
आता कुच्ची शांत झाली होती ती तिच्या जागेवर आपल्या अंथरूण सारखं करत जाऊन गुपचूप झोपून गेली. स्मिताने तिच्या अंगावरून आपला मऊशार हात प्रेमाने फिरवला आणि तिच्या अंगावरचे पांघरूण सारखं करत तिथून उठली तिला बरीच कामं होती.
कुच्ची मागील वर्षापासून तिच्या घरी आली होती एक दिवस अचानक रात्री दाराबाहेर एक वेगळाच आवाज ऐकू आला म्हणून स्मिताने दार उघडून बघितल तर तिथे एक छोटू स सोनेरी रंगाचं मनी माऊ च पिल्लू आशाळभूत पणे तिच्याकडे बघत होत. स्मिता ला खूपच मजा वाटली अय्या तू का आवाज देतेस मला. किती गोड असं म्हणून स्मिताने तिला उचलून घेतलं.
मागून अनय ने विचारलं. कोण आहे ग?
स्मिता म्हणाली एक गोड पाहुणी आली आहेआपल्याकडे. आता मी आपल्याकडेच हिला ठेवून घेणार आहे नाही नको म्हणू
अनय हसला म्हणाला अच्छा तर तुला मैत्रीण पाहिजे वाटतं खेळायला. पण ती कधी एका ठिकाणी थांबेल का?
राहू दे जितके दिवस राहील तितके दिवस
. त्याच्या होकाराचा स्मिता ला खूप आनंद झाला ती लहान मुलीसारखी त्या पिल्लाला घेऊन सगळ्या खोल्यांमध्ये फिरून आली.
हळुहळु ते पिल्लू मोठ झाल.आणि स्मिताने तिला कुच्ची म्हणायला सुरुवात केली तिला पण बहुधा आपलं नाव खूप आवडलं होतं, कारण हाक मारली कि ती पळतच यायची. स्मिताने तिच्यासाठी आपली एक जुनी साडी काढून मउ गादी तयार केली .तिचं पाण्याचे भांड तिची खायची प्लेट जय्यत तयारी झाली तिची.
कुच्ची हुशार होती, सकाळी उठलं की म्याऊ म्याऊ करतच स्मिताच्या मागे मागे फिरायची. स्मिताने वाटीभर दूध घातलं चुटू चुटू पिऊन छान आळस देऊन स्मिताच्या साडीला तोंड पुसुन घ्यायची. आणि मग जेवायची वेळ होईपर्यंत बाईसाहेब बाहेर पडायच्या आजूबाजूच्या सगळ्यांना कुच्ची थोड्याच दिवसात परिचित झाली सगळ्यांच्या घरी चिल्लीपिल्ली तिच्याशी खेळायला वाटच बघत असायची. ती कधीच कोणाच्या स्वयंपाकघरात जात नसे त्यामुळे सगळ्यांच्या घरी तिला प्रवेश होता.
कुच्ची नि बाजूच्या घरातल्या पांढर्याशुभ्र बोक्याशी आपलं सुत जमवलं होतं. आणि एक दिवस स्मिताचा लक्षात आलं कुच्ची आता आई होणार आहे. अरे देवा आता काय करायचं पण तिला तसंच बाहेर काढून देणे सुद्धा तिच्या मनाला पटेना.
आता स्मिताने तिच्यासाठी स्पेशल फुड आणलं मग काय कुच्ची ची तर मजाच झाली बाई साहेब आता दुध पित नाहीशा झाल्या.
स्मिता आणि अनय दोघांनाही कुच्ची चा खूप लळा लागला होता. अनय म्हणाला बघुया पुढे काय करायचं ते सध्या राहू दे तशी पण ती दिवसभर घरी नसतेच
आता कुच्चीच पोट दिसायला लागलं होतं.
आजूबाजूची चिल्लीपिल्ली विचारायला लागली हे मावशी आपल्या कुच्ची ला बाळ होणार आहे का ग?
स्मिताने हो म्हटल्याबरोबर त्यांनी आपापल्या घरातून वेग वेगळी खेळणी चेंडू आणून ठेवले .
कुची च्या पिल्लांची काय नाव ठेवायची यावर चर्चा व्हायला लागल्या.
किती गंमत न
आणि एक दिवस रात्री कुची ने दोन वाजता माझ्या दारावर पंजे मारून मला आवाज दिला.
अनय म्हणाला,
स्मिता बघ बरं कुची चा आवाज वेगळा येतोय. स्मिता पटकन उठले तिने दार उघडून बघितलं तर तिच्या आर्त स्वर आवरून स्मिताला कळलं कुच्ची ला माझी गरज आहे. तिने पुचीला तिच्या गादीवर मिळेल आणि तिच्या अंगावर हळूहळू हात फिरवत बसले श्वेताने हात फिरवणे थांबवलं किकुची पुन्हा आवाज काढायची असं करत दोन तास गेले.
स्मिता म्हणाली भाऊ आता झोप ना तू पण मी पण थोड्या वेळ झोपते असं म्हणून स्मिता आपल्या खोलीत परत आली.
पाच वाजताचा आलाराम वाजला स्मिता जागी झाली आणि तिला पहिल्यांदा कुची ची आठवण आली म्हणून ती पटकन कुची च्या गादी जवळ गेली तर काय तीन छोटी छोटी पिल्लं कुची च्या कुशीत छान पहुडली होती. स्मिता खाली बसले कुच्ची पटकन उठून उभी राहिली आणि स्मिताचा गाल चाटला .काय कौतुक .एका प्राण्याला सुद्धा आपल्या उपकार कर तिचे आभार मानायचे कसे कळले बरं.
स्मिताने कुच्ची आणि तिच्या पिल्लांसाठी एक खोका तिच्या मैत्रिणीकडून मागून आणला तिच्या पिल्लांसाठी छान मऊ गादी तयार केली. कुच्चीच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यामध्ये एक प्रेमळ भाव दिसत होता.
चार-पाच दिवसांनी कुच्ची पिल्लांना निर्धास्तपणे स्मितावर सोपवून बाहेर फिरायला मोकळी झाली पण अचानक एक दिवस रात्रीपर्यंत कुच्ची परतच आली नाही. स्मिताला काळजी वाटायला लागली. कुठे बरं गेली असेल कुची तिला कोणी मारले तर नाही?
तिने आपल्या भाच्याला म्हटलं अरे मागे खूप कचरा आहे तिथे तर नाही ना कुच्ची बघायचं का आपण?. भाचा म्हणाला
अग किती काळजी करशील मावशी येईल की.
नाही रे दोन दिवस झाले ती पण उपाशी आहे आणि तिची पिल्ले पण मला बघवत नाही आता हे मी कापसाच्या बोळ्याने दूध पाजते आहे त्यांना. पण त्यांचं पोट भरत नाही.
भाचा म्हणाला
बर चल
एक पाण्याचा डबा घेतला एका कागदात तिचा खाऊ घेतला आणि दोघं मागच्या बाजूला गेले. बघतात तो काय कुच्ची नालीच्या एका कोपऱ्यात दडून बसली होती तिला काही बाहेर येता येत नव्हतं भाच्याने तिला उचलून बाहेर काढल.
स्मिताला पाहिल्याबरोबर कुचीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला तिने तिचा हात चाटून घेतला श्वेताने तिच्यासमोर पाण्याचं भांडं ठेवलं लपलप आवाज करत पाण्याचा डबा पाण्याचा पिऊन टाकला.
स्मिताने आपल्या हाताने तिला थोडं खाऊ घातला तशी कुचीला जरा तरतरी आली. पण तिला बहुदा थोडं लागलं होतं पायाला ती विव्हळत होती स्मिताने तिला उचलून फडक्यात गुंडाळून घरी आणल. कुच्ची ला पिल्लाजवळ जायचं होतं पण स्मिता म्हणाली
थांब आई तुझ्या पिल्लांना पण तुझा त्रास होऊ नये आपण आधी तुला स्वच्छ करू. कुच्ची ला जनु स्मिताचा बोलणं कळलं होतं स्मिताने तिला डेटॉल च्या पाण्याने स्वच्छ पुसलं थोडा आणखी दूध दिलं आणि मग कुची ने पुन्हा स्मिताचा हात चाटून आपली संवेदना व्यक्त केली.
आणि एक दिवस कुच्ची आपल्या पिल्लांना घेऊन सात घर फिरायला निघून गेली.
स्मिता ला खूप वाईट वाटलं पण कुच्ची आज ना उद्या नक्की परत येईल हा तिला विश्वास होता आणि एक दिवस रात्री दहा वाजता दारावर कुची ने पायाने थाप दिली. स्मिता ला खूप आनंद झाला आणि पुन्हा कुच्ची स्मिताच्या घरी लाडावलेल्या लेकी सारखी आनंदाने बागडू लागली.
अपर्णा बडे
प्रिय वाचक,लेखक तुम्हीही शब्दपर्णवर लिहू शकता.मानधन
१००० views.ला १५ रु










Wahh
खूप छान बाल कथा