Competition-शर्यत-लेख
आज सकाळी सकाळी रेडिओवर गाणे ऐकायला मिळाले.
बचपन भी गया
जवानी भी गयी
एक पल तो अब हमें
जीने दो जीने दो….
हे गाणे ऐकले आणि खूप आधी ऐकलेली
मोठ्यांनी पाठ करवून घेतलेली ही कविता आठवली.त्यातील शर्यत,स्पर्धा जन्मभर आपली पाठ सोडत नाही.
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
आयुष्य म्हणजे काय?
शर्यत,शर्यत आणि शर्यत,
नर्सरीपासूनच शर्यतीचा अर्थ पालकांमुळे समजलेला असतो
उद्या शाळेत धावण्याची शर्यत आहे. वेगात धावायचे हं.पहिला आला पाहिजे.
परवा काय निबंध स्पर्धा त्यातही पहिला आला पाहिजे
मग काय नृत्य स्पर्धा, कथाकथन स्पर्धा ……
रोजच कसली ना कसली शर्यत आणि त्या शर्यतीत पालकांनी जिंकण्याचे केलेले आवाहन.
वरुन पालकांची ओरड, काय करणार? competition च एवढी वाढली कि आपल्याला धावायला लागणारच.नाहीतर मागेच राहू.
लहानपणापासून सवयीची झालेली ही शर्यत आणि ती जिंकण्यासाठीची धडपड अंगवळणी पडत जाते.
सवय होऊन जाते. स्पर्धेशिवायचे आयुष्य नको वाटायला लागते.
माझ्या मित्रापेक्षा मला चांगले मार्कस् असायला(च) हवे,माझे करियर त्याच्यापेक्षा चांगले असावे.
शेजाऱ्यांच्या गाडीपेक्षा माझ्याजवळ चांगली गाडी असावी,
त्या नातेवाईकाच्या घरापेक्षा माझे घर चांगले असावे..अशा कित्येक स्पर्धा आपल्याला जिंकायच्या असतात. त्याशिवाय जीवनाला अर्थ येणार नसतो.
शर्यतीत जिंकलो नाही तर नैराश्य ग्रासते आपल्याला
झोप येत नाही. आत्मविश्वास कमी होतो
ही शर्यत जिंकल्यावर दुसरी शयर्त जिंकायची असते.
मग तिसरी…चवथी…….स्पर्धेला अंत नाही,
आणि शर्यती फक्त मीच जिंकायल्या हव्यात असे नाही.माझ्या मुलांनीही माघार घेता कामा नये.
तो माझ्या कलीगचा मुलगा डाॕक्टर बनला.
एका मित्राचा मुलगा आयआयटीला गेला.
एक चांगल्या काॕलेजमध्ये एम.बी.ए. करायला गेला.
याने जालाच हवे.
त्याच्या बाकी आवडी संगीताच्या,चित्रकारीच्या काही वर्ष बाजूला ठेवाव्या लागतील. नाहीतर हा मागेच पडेल.
शर्यत,स्पर्धा नसेल तर मुले मेहनत करत नाहीत….
असे पालकांना वाटते.
पण आवडणारी गोष्ट असेल तर मुले मेहनत करतातच.
तू सगळ्यांना मागे टाक म्हणण्यापेक्षा तू हे खूप छान कर.तुझे सगळे प्रयत्न ओत असे सांगितले तर……
मुले करतीलच कि मेहनत.
एखादं मुलं गाणं छान म्हणेल
एखादे चित्र छान काढेल
एखादे कविता छान रचेल
पण आपण त्यांना हे करुच देत नाही.त्यांच्यावर लादतो खूपशा गोष्टी.
आणि त्या बदल्यात खूप गोष्टी हिरावून घेतो.
ह्या शर्यतीने आपले अवघे आयुष्य व्यापले आहे.
इतके कि Entrance Exam लाही Competitive Exam म्हणतो आपण.
प्रवेश परीक्षा स्पर्धा परीक्षा बनल्या.
जीवन कधीतरी संपणार हे लक्षात घेतले तर शर्यतीला कितपत महत्त्व द्यायचे हे आपण समजू शकू.
सेवानिवृत्त झाल्यावर मी माझे राहीलेले छंद,आवडी पूर्ण करणार.अशी म्हणणारी माणसे आसपास बघितली कि लक्षात येते ही कोण पुढे पळे शर्यत साध्या साध्या आवडी जपायलाही म्हातारपणाची वाट बघायला लावते….
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा











खूपच सुंदर 👌