जीवनप्रवास-२
जीवनप्रवास-२

जीवनप्रवास-२

शाळेचे कामं घरातलं कामं करून दिवस कसे निघून जायचे ते कळतच नव्हतं, माझ्या नणदेच्या मुलीही आमच्या घरी
राहायच्या .आई सगळ्यांना बघायच्या.त्यामुळे आमचं घर हे वरदळीचच घर होतं. सतत लोकांची
ये जा चालू असे.
दिराच लग्न ठरले त्यावेळी माझी सुखदा पाच महिन्याची होती. दोघांचे करता करता, स्वयंपाक करता करता दहा
वाजले की माझे काम बंद करून शाळेची तयारी करत होती.९ वाजता माझे पती जेवायला बसत. दहा चं ऑफिस असे,
ते आता गोंदिया जिल्हा परिषद च्या मेन ऑफिस मध्ये होते.अधिकारी केव्हाही येत. म्हणून ते दहा पोहचून जात. आणि
सात ला परत येत. तेव्हा घरातल्या बाहेरच्या सगळ्या कामांकडे माझे लक्ष असे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी मुंबई ची नणंद,तिचे पती आणि दोन मुले असे सारे यायचे दोन महिने ते राहायचे तेंव्हा
मुलगी वर्षातून एकदा आली म्हणून माहेरवाशिणीचे मानपान असं सगळ करायचं मी कधी कोणताच भेदभाव
केला नाही. माझ्या माहेरच्यांना मी कधी काही केलं नाही.पण सासरच्या लोकांना बोलायची जागा ठेवत नसे,
तरी सुध्दा त्यांना बोलायचे ते बोलत होते. मी चूपचाप ऐकत असे. मोठी सून म्हणून जो मान किंवा छोट्या छोट्या
गोष्टीतला जो आनंद असतो, तो आनंद कधी मिळू दिला नाही.जसे घर बांधल्यांनतर पत्रिकेत आमचं नाव. दिराच्या लग्नात पत्रिकेत आमचं नाव नव्हतं. मोठी नणंद म्हणे कशाला पाहिजे.फक्त आईचेच लिहा. मला सासरे नव्हते मी चूपचाप ऐकूण
घ्यायची. मी नौकरी करत असूनही घरात त्यांच्यासाठीअडाणी आणि गवार आहे.
दिराचे लग्न ठरले, कोणत्या भावजय वाटत नसेल आपणदिराच्या लग्नात मिरवायचे, मुलीकडचे लोकं मान करतील.
पण इथे सर्व उलट आमचा नवदेव मिल्ट्रीतला ते केव्हा येतील?त्यांच्या तारखेचंच निश्चित नव्हतं तेव्हा आम्ही पत्रिकेत
एक तारखेच रिसेप्शन लिहल. आणि मुलीकडच्यांना तुमचेपाहूणे घेवून या. आपण एक तारखेला गायत्री मंदिरात लग्न
लावू. वेळ दहा वाजता ची दिली.एक नव्हेबर ला दहा वाजता लग्न लावून विधी आटोपल्यावर
मुलींकडच्या नातेवाईकांची चाळीस लोकांची सोय त्यांच्या जेवणाची व्यवस्था घरीच केली. सारे खूष झाले.
त्यांनतर पार्टी ग्राम पंचायत भवन च्या गच्चीवर होती.
असा कार्यक्रम पार पडला, त्यांनतर मुलीकडे पार्टी आयोजित करण्यात आली. नंतर पूजा असा सर्व विधी आटोपल्यावर रात्री परत आमगावला एक दिवस राहून नंतर मुलाची जायची तयारी झाली.
त्यानंतरचे पोस्टिग जयपूर ला झाले. तेव्हां ते मुलीला म्हणजेराखी ला घेवून गेले.त्यांनतर आई मुंबई ला गेल्या आम्ही फक्त दोघे व मुली होतो.
त्या गावाला गेल्या म्हणजे एक महिना राहून यायच्या त्यांची आई बहीण सर्व मुंबई, ठाणे, पुणे अशा ठिकाणीं असल्यामुळे सगळ्यांकडून येतांना वेळच लागायचा. सुट्टीत माझे गहू, तांदूळ, डाळ, निवडून ठेवण्याचे काम असे.
त्यातच भावाचे लग्न ठरल्याचे कळले, तेंव्हा मला टोमणा मिळाला. तुझा भाऊ आला का घ्यायला?
ह्यांच्या, चालीरीती सांभाळता सांभाळता नोकरी करून दमछाक  व्हायचं.
सारे कायदे कानुन, माझ्यासाठी होते. बर कुठलं सण वारं नव्हत.पण आमच्या गल्लीतील सर्वंनी गणपती मांडायचा ठरवलं
मलाही आनंद वाटला, घराच्या बाजूलाच गणपती मांडला होता. गणपतीची आरती नवीद्या, पूजा सर्व करून शाळेत
जायचं तेंव्हा एक उत्साह आणि शक्ती होती. तेव्हा सगळयंत्रवत काम होत असे. २००२ मध्ये आम्ही दुसरं स्वत:चे घर घेतले.

आधीच घर एका कुटुंबाला पुरेल असं होतं.आता दीर सुध्दा आमगावात राहायला आला होता.मिल्ट्रीच्या
नोकरीचा राजीनामा दिला होता. त्याची पत्नी ब्युटी पार्लरचालवत होती. लग्न झाल्यानंतर तिने हा कोर्स करून घेतला होता. तिचा नवरा मिल्टीत गेल्यावर तू घरी काय करशील
बाजुलाच सुरभी ब्युटी पार्लर आहे.तिथून तिने कोर्सपूर्ण केला.ती माझ्यावर प्रयोग करून बघायची नंतर
हेअर कटिंग साठी शाळेतल्या मुलींना ज्यांचे केस नीट नसतील त्यांना घेऊन यायची सुट्टीच्या दिवशी , त्यानंच्यावर
फुकट प्रयोग व्हायचे. अशा पद्धतीने तिने पार्लरचा कोर्स पूर्ण केला.

क्रमशः
(कथा आवडल्यास अवश्य कळवा.)
सौ सुनेत्रा संजय टिकेकर

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!