१२आभास हा छळतो मला -कथामालिका
१२आभास हा छळतो मला -कथामालिका

१२आभास हा छळतो मला -कथामालिका




ती माझी मैत्रीण आहे ना जाई तिची आई सारखी म्हणत असते, देवा अजून तू आम्हाला किती दुःख देणार?आता दुःख पचवण्याची ताकद नाही आमच्यात.

तुम्ही तेव्हा तिला उत्तर दिले होते,

अरे हट् आपल्या घराकडे दुःख कसे फिरकणार?सुखा आणि संपदा आहेत आमच्याजवळ.

मनोहरराव – वसुधा आठवते ग सगळे. आता घरात इतके दुःख आहे पण सुखाला जाणवतही नाही आहे ते.

दोघे बोलत असतांनाच फोनची रिंग वाजली.

मनोहररावांनी फोन उचलला.

फोनवर बोलतांना त्यांच्या चेहऱ्यावरील भावांवरुन काहीतरी अघटीत घडले हे वसुधाईंनी लगेच ताडले.

मनोहररावांनी फोन ठेवला आणि आणि बाजूला असलेल्या खुर्चीवर मट्कन बसले.

काय झाले? वसुधाताईंनी विचारले.
वसुधा मला पोलीसस्टेशनला जावे लागेल आता.
का हो?
वसुधाताईंनी घाबरुन विचारले.

अग सुखाला नेले आहे तिथे. तिच्याविरोधात तक्रार आहे बोलले पोलीस.

मी पण येते सोबत.



मनोहररावांनी संपदाला फोन केला आणि परस्पर पोलीसस्टेशनला यायला सांगितले.

मनोहरराव आणि वसुधाताई पोलीसस्टेशनला पोहचले.सुखदा काहीच विशेष घडले नाही या आविर्भावात बसून होती. संपदाही पोहचली.

पोलीसांनी चित्रकार मानसच्या तक्रारीवरुन सुखदाला अटक करावी लागेल असे सांगितले.

का?काय केले सुखाने?

त्या आठदहा दिवसपासून रोज मानसच्या पत्नीला धमकीचे फोन करत आहे. काल तर त्यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिलीयं. ऐकून सगळे सुन्न झाले.

संपदाने पोलीसाला समजवण्याचा प्रयत्न केला.सुखदाचे मानसिक संतुलन ठीक नाही हे सांगितले. पोलिसांनी तसे certificate दाखवायला सांगितले पण संपदाजवळ काहीही नव्हते.सुखदाला जमानत होईपर्यत तिथेच राहावे लागणार होते.तिथून संपदा आणि शाश्वत मानसच्या घरी गेले.त्याला विनवण्या करुन तिची मानसिक स्थिती सांगून तक्रार मागे घेण्याची विनवणी केली.मानस तयार झाला.

आता दिवसेंदिवस सुखदा मानसमध्ये जास्त गुरफटत चालली होती. Treatment नाही घेतली तर तिचे वेड भलतेच वळण घेईल असे मानसोपचारतज्ञाने सांगितले.पण सुखदा काही केल्या ऐकायला तयार नव्हती.
तिला लवकरात लवकर मानसोपचारासाठी तयार करणे आवश्यक होते.ते कसे करायचे ते ठरत नव्हते. सगळ्यांचे प्रयत्न चालले होते.
सुखदाचे आई-बाबा वयापेक्षा तिच्या काळजीने खंगत चालले होते. निर्णय घेणे त्यांना जमत नव्हते.

सगळी जबाबदारी शाश्वत आणि संपदावर आली.

सुखदाभोवती मानसचा गुंता घट्ट होत चालला होता.

मानस,त्याची चित्रे ,चित्रप्रदर्शने याशिवाय तिच्या ध्यानीमनी काहीही नव्हते.
आता तिला हाॕस्पिटलमध्ये अॕडमिट केल्याशिवाय ती ठीक होणे अशक्य होते.
मेंटल हाॕस्पिटलमध्ये सुखाला ठेवायचे ही कल्पनाच घरच्यांना करवत नव्हती.

संपदा डाॕक्टरांना म्हणाली,डाॕक्टर,सुखापासून कुणाला धोका नाही आहे.
तिने मानसच्या बायकोला धमकी दिल्याचे विसरलात मॕडम तुम्ही.




पुढील आठवड्यात सुखाला हाॕस्पिटलमध्ये अॕडमिट करायचे असा निर्णय घेतला.
सुखदा घराबाहेर कधीही जात नव्हती.दिवसभर तिच्या खोलीत राहायची.

आठवडाभर संपदा रोज एकदातरी सुखदाशी बोलण्याचा प्रयत्न करायची. तीही व्यवस्थित बोलायची.
मानससोबत बोलणे झाले,आज आम्ही भेटलो. माझे त्यांनी चित्र काढले….असे चित्र रंगवून संपदाला सांगायची.
संपदा हतबल व्हायची.

दोन तीन दिवसात सुखदाला अॕडमिट करायचे होते म्हणून
पहाटे फोन लावला सुखदाला

सुखा कशी आहेस ?
मी येत आहे उद्या घरी.दोन तीन दिवस सगळे सोबत राहू.संपदाच्या डोळ्यात पाणी आले.

ताई मी बरी आहे ग. आज कोर्टात जायचे आहे.

कशाला ग?
अग लग्न करतेय ना मानसशी.तुम्हीच तर मागे लागले लग्न कर म्हणून.

आणि मानसची बायको?

ती नाही आहे आता. तिचाच अडसर होता आमच्या प्रेमात.

मानस आता संपूर्ण माझे आहेत.
असे म्हणून सुखदा जोरात हसायला लागली.

तिचे बोलणे ऐकून संपदाचा थरकाप उडाला.फोन ठेवून लगेच ती शाश्वतसोबत आईबाबांच्या घरी जायला निघाली.पोहचली तेव्हा पोलिसांची गाडी घरासमोर होती. गाडीत सुखदा शांतपणे बसून होती.

घरातून सुख कायमचे बाहेर पडले.

कोर्टात सुखदा वेडी असल्याचे निष्पन्न झाले.आता तिची रवानगी मनोरुग्णालयात झाली…..

………………..समाप्त……………..

आभास हा छळतो मला….कथामालिका सुरुवातीपासून वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.

https://marathi.shabdaparna.in/१

प्रिती गजभिये

शब्दपर्ण लवकरच नवीन कथामालिका घेऊन येत आहे.

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!