५-उसवले धागे कसे?
५-उसवले धागे कसे?

५-उसवले धागे कसे?

५-उसवले धागे कसे?
उसवले धागे कसे, कधी सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट
भाग-५
आनंदीचे माझ्यावरील प्रेम कमी झाले होते का?  नाही.मला कधीही तसे जाणवले नाही.पण आता ती राजकारणावर,तिला मिळालेल्या सत्तेवरही प्रेम करायला लागली होती. तिला मी आणि राजकारण दोन्ही हवे होते.
राजकारणासाठी मला किंवा माझ्यासाठी राजकारणाला सोडायला ती तयार नव्हती.
पण मला फक्त आनंदी हवी होती.माझी आनंदी, अवखळ,अल्लड,खोडकर.
अजून दोन वर्ष आनंदीसाठी थांबायचे ठरवले.
मी कंपनीतील नौकरी सोडली आणि जरा  दूर असलेल्या शहरात स्वतःची कंपनी सुरु केली.
कंपनीची कामे वाढली होती.मी आता राहायला तिथेच गेलो.पंधरा दिवसातून एकदा घरी येत होतो. आनंदीची भेट प्रत्येक वेळी होईलच याची खात्री नसायची.
फोनवरच जास्त बोलणे व्हायचे.
आनंदी विचारायची,
चैतन्य आपण लग्न कधी करायचे?
तू राजकारण सोडले कि लगेच करु.
यावर ती काहीही बोलायची नाही.
दोन वर्ष निघून गेली.
घरी वैभवचे शिक्षण संपले होते.त्याला अमेरिकेत नौकरी  मिळाली.बाबा सेवानिवृत्त झाले. आम्ही दोघे भाऊ शिकलो,करियरला सुरुवात केली म्हणून आईबाबा आनंदात होते.
इकडे आईबाबा दोघेच राहायचे. दोघांनीच घरी राहण्यापेक्षा तेही काही दिवसांसाठी  अमेरिकेत   गेले.
घरी कोणी नव्हते त्यामुळे माझे घरी जाणे कमी होत गेले.
आता परत निवडणूका आल्या.
आनंदीने फोनवर ती निवडणूकीत उभी राहणार असे सांगितले. मला आवडले नाही पण हे अपेक्षित होतेच.
नंतर  मी घरी जाणे बंदच केले.आनंदी खूप मागे लागली प्रचारासाठी ये म्हणून.पण मी  गेलो नाही.
 बरेचदा मी फोन केला कि आनंदीला बोलायला वेळ नसायचा,म्हणून मी फोन करणे बंद केले.आनंदी वेळ मिळाला कि फोन करायची.तिचे माझ्यावर प्रेम आहे हे वारंवार सांगायची.मला ते माहीत होतेच.पण मला नेमके काय हवे हे आनंदीला कळत नव्हते. ती आमच्या नात्याचे गांभीर्य  लक्षात घेत नव्हती.
माझी कंपनी स्थिरस्थावर झाली.मी इथे  एकटा राहत होतो म्हणून आईबाबा मला लग्न कर म्हणून मागे लागले.
मला काय करावे समजत नव्हते. आईला आनंदीबद्दल सांगितले. आई आनंदीला लहानपणापासून बघत होती.अनंतरावांनी मुलांना शिस्तीत,संस्कारात वाढवले हे तिला माहीत होते.आई-बाबा लग्नाला तयार झाले. 
मी आनंदीशी लग्नाबद्दल बोललो.ती तयार होतीच  पण लग्नानंतर तिला तिथेच राहायचे होते. ती अनंतराव आणि राजकारण सोडू शकत नव्हती.
मी अनंतरावांसोबत बोलायचे ठरवले.आनंदीने मला त्यांच्याशी बोलू नको असे सांगितले.
आमचे लग्न होणार नाही,आम्ही कधीही सोबत राहू शकणार नाही हे जवळपास  माझ्या मनाने नक्की केले होते.
माझे घरी जाणे आता जवळपास बंदच झाले होते.
आनंदी पुन्हा एकदा निवडून आली.
आनंदीने खूप आग्रह करुन मला बोलवले.
पारसपिंपळाखाली भेटलो आम्ही.
तिला मी तिच्यापासून किती आणि का दुरावलो  हे समजतच नव्हते.
आमच्यात आधी असलेले बंध तेवढेच घट्ट आहेत याची तिला खात्री होती.
मी,माझे तिच्यावर असलेले प्रेम सगळेच तिने गृहीत धरले होते.
ती आमची शेवटची भेट ठरली.
आई आनंदीबद्दल विचारायची. मी आईला सगळे सांगितले.
आईने मला विचार करायला वेळ दिला.
माझे लग्न झाले कि वैभवचेही लगेच लग्न करायचे होते.
वैभवने मुलगी बघून ठेवली होती.
केतकी-आनंदला जिच्यासोबत लग्न करायचे होती तिच केतकी.
आनंद गेल्यानंतर ती अमेरिकेला तिच्या मावशीकडे गेली.तिथेच तिची वैभवसोबत भेट झाली.
केतकीने वैभवला आनंद आणि तिच्याबद्दल सगळे सांगितले होते त्यामुळे मी काही बोलण्याचा प्रश्नच आला नाही. 
आईने माझ्यासाठी प्राचीची निवड केली.प्राचीला नकार देण्यासारखे काही नव्हते. मी लग्नाला तयार झालो 
आणि  बालपणापासून सोबत असलेली आनंदी दूर गेली.अनोळखी असलेली प्राची आयुष्यात आली.
माझ्या लग्नानंतर लगेच वैभवचे लग्न झाले.पण केतकीमुळे माझे वैभवला भेटणे कमी झाले.ती दिसली कि मला आनंद आठवायचा.खूप वाईट वाटायचे.
 आनंदीच्या आठवणींनी चैतन्यची झोप उडाली होती.
आनंदीला प्रयत्न करुनही तो विसरु शकला नाही.
आता त्याला स्वतःचाही राग येत होता.
मी तेव्हा  तडजोड केली असती तर आनंदी आणि मी सोबत राहिलो असतो असे पुटपुटत तो दुसऱ्या कुशीवर वळला.
सकाळ झाली. प्राची ऊठली.रोजच्यासारखी तिची गडबड सुरु झाली.स्वयंपाक केला.तिचे आवरले. चैतन्यला आवाज दिला. त्याने सांगितले आज तूच जा प्राची.मी नाही जात कंपनीत.
तब्येत बरी आहे ना चैतन्य?
प्राचीने काळजीने विचारले.
हो ग.
मी थांबू का चैतन्य घरी? 
नको.मी बरा आहो प्राची.
बरं.काही वाटले तर लगेच फोन करअसे चैतन्यला सांगत 
प्राची गेली.
चैतन्य परत आनंदीच्या आठवणीत गुंग झाला.
मी आनंदीला भेटणे सोडले होते.फोनवरही टाळू लागलो. मला आता तिला विसरायला हवे होते.विसरण्याचा प्रयत्नही करु लागलो. पण लहानपणापासून जिच्यावर प्रेम केले,प्रेमाचा अर्थही कळत नव्हता तेव्हापासून तिच्यात गुंतलो.हा गुंता एवढा सहजासहजी सुटेल कि अजून वाढेल?
चैतन्य आनंदीच्या आठवणीत गुरफाटला असतांनाच प्राचीचा फोन आला.
मी ठीक आहो ग प्राची.चैतन्यने सांगितले.
प्राची आनंदीपेक्षा खूप वेगळी,प्रगल्भ आणि निरपेक्ष प्रेम करणारी.आई-बाबा ,वैभव सगळ्यांचीच मने प्राचीने जिंकली होती.
खूप वर्षांनी चैतन्यला त्याची प्रेयसी भेटली.काय होईल पुढे वाचा पुढील भागात.
क्रमशः
Prvious Link
चैतन्य एवढेच प्रेम आनंदी राजकारणावरही करते. पण चैतन्य हे स्वीकारतो का? पुढील भाग नक्की वाचा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!