स्वयंसिद्धा
भाग १
दत्तप्रिया- मोहिनी पाटनुरकर राजे
सुप्रियाने आरशात बघून केसात मोगऱ्याचा गजरा माळला. स्वतःला निरखून पाहिलं. केसावरून हात फिरवला. तुरळक चंदेरी केस डोकावून वयाचा अंदाज सांगत होते.
डोळे बंद केले, दीर्घ श्वास घेतला. मोगऱ्याचा दरवळ श्वासाबरोबर तिने तनामनात व्यापून घेतला .
मोगरा…… तिचा आवडता मोगरा . तिच्या केस मुकुटात कायम विराजमान असायचा. गरजेला अडचणीला सोबत असणाऱ्या माणसासारखा. मोगरा पण तिची साथ निभवायचा.
ती हळूहळू भूतकाळात हरवत चालली होती . आयुष्याच्या खाच खळग्याच्या वाटेवरून एकटीच निघाली . पण मागून कोणीतरी हाक मारली….
” आई ए आई ! “
“आई ! अगं काय विचार करते ? चल आवर. उशीर नको व्हायला आपल्याला . बघ मी , बाबा आणि सई तयार झालो तेव्हाच्या.
आजी-आजोबा मामा-मामी थेटच हॉलवर पोहोचणार आहेत. अशी भांबवल्यासारखी काय बघते? विसरली का आज तुझ्या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आहे .
तशी ती भूतकाळातून मागे फिरली .
“ज्या आठवणींचा आपल्याला त्रास होतो त्या आठवायच्याच नाहीत आई , कायम लक्षात ठेव “
लाखात बोलली शाल्वी
वळून नवऱ्याकडे बघितलं. त्यांनी छान असं खुणेने सांगितलं. आंगभर साडी दोन्ही खांद्यावरून पदर ठसठशीत कुंकू आणि मोगऱ्याचा गजरा. छानच दिसत होती सुप्रिया.
नवऱ्याने लांबूनच दृष्ट काढली तिची. तशी ती लाजली .
माधव काहीतरी पुटपूटला असं तिला वाटलं . त्याचे शब्द मध्येच विरले आतल्या आत.
तिचे कान आतुर होते त्याला ऐकण्यासाठी .
त्याने दोन पावले तिच्याकडे टाकली आणि थांबला आणि लगेच मागे फिरून बाहेरच्या खोलीत येऊन तिची वाट बघत बसला.
सवयीप्रमाणे घराबाहेर पडायच्या आधी सुप्रिया देवघरात आली.
दत्ता पुढे नतमस्तक झाली. ‘ गुरुराया आयुष्यातील सगळ्या प्रसंगांना तोंड द्यायला तूच मला बळ दिलं , असाच कायम पाठीशी राहा ‘ .
तिची दत्तप्रभू वर नितांत श्रद्धा आणि भक्ती होती.
तिला असलेल्या दत्ताचे वेड पाहून माधवने तिला ‘ दत्तप्रिया ‘ उपाधी बहाल केली होती.
तिला बाहेर यायला वेळ लागतो म्हणून माधव आपसूकच देवघरात आला. सुप्रिया पाठमोरी होती.
तिला आवाज द्यायला त्याचे ओठ विलग झाले.
‘ दत्तप्रिया’ त्याची मुक सादही तिच्या कानात घुमली.
तिला प्रेमाने बोलणारे शब्दच हरवले होते . त्याच्या शब्दासाठी ती रात्र रात्र जागली होती . आतुर होती माधवची साद ऐकण्यासाठी. पण …..
तिने प्रतिसादात्मक होकारार्थी मान हलवली.
दोन्ही मुली स्कुटी वरून आणि प्रिया माधव ऑटो ने कार्यक्रम स्थळी पोहोचले. आमंत्रित यायला सुरुवात झाली होती. वेळोवेळी साथ देणारे नातेवाईक, शेजारी, मित्र-मैत्रिणी, सुप्रिया जिथे नोकरी करते तिथले सहकारी वर्ग असे बरेच जण होते .
घरचेच पण मनाने दुरावलेली आपली माणसं ईच्छा नसतांनाही आणुन बसवल्यासारखी वाटत होती.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत शाल्वीने तिच्या आईचा नव्याने परिचय करून दिला .
‘ संसार नावाचा गाडा, आजी आजोबांचे आजारपण आणि बाबांसोबत घडलेली……’
शाल्वी क्षणभर बोलायची थांबली. आवंढा गिळला. आई बाबांकडे एक नजर टाकली, तर ते दोघं एकमेकांकडे बघत होते. तिला माधवच्या डोळ्यात स्वतः बद्दल अपराधीपणाची भावना जाणवली. सुप्रिया नी त्याला नजरेनेच शांत केलं.
‘ इतक्या सगळ्यांतून आईनी तिचा लेखनाचा, कवितेचा छंद जोपासला. आज तिचा पहिला कविता संग्रह प्रकाशित होताना आम्हाला खूप आनंद होतोय. तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित केला. मनातुन आभार.’
माझी आईला विनंती की तिनी तिची एक कविता सादर करावी ‘.
सवय झाली आहे आताशा
मला रोजचाच त्या व्यथांची
फक्त नव्या वाटा शोधते
मोजमाप त्यांचे मी ठेवत नाही,
येतील ,जातील त्या अश्याच
रोजचाच आहे त्याचा रस्ता,
वर्दळ त्यांची असू देत खुशाल
स्वागत त्यांचे हसता, हसता
करू देत मनावर त्यांना
हवे तेव्हढे वेदनेचे घाव,
तुझी सोबत म्हणजेच फक्त
आहे माझ्या सुखाचा गाव…
एक दिवस असाही येईल
होईल साऱ्या व्यथावेदनाचा अंत
दत्त वरद हस्त शिरी माझ्या
अन पाठीशी आहेत ‘दासोपंत’
सौ.दत्तप्रिया.
काय घडले माधव सोबत ? असे का बोलली शाल्वी
जाणुन घ्या पुढील भागात.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.









खुपच सुंदर, छान लिहलं
स्वयंसिद्धा सुंदर, छान लिहलं
खुप सुरेख
अतिशय सुंदर व अगदी उत्कंठा वाढवणारे लेखन आहे. कृपया पुढील भाग दिसतील अशी व्यवस्था केली तर ते बरे होईल.
लेखन अप्रतिम
अतिशय सुंदर व अगदी उत्कंठा वाढवणारे लेखन आहे. कृपया पुढील भाग दिसतील अशी व्यवस्था केली तर ते बरे होईल.
लेखन अप्रतिम
अतिशय सुंदर व अगदी उत्कंठा वाढवणारे लेखन आहे. कृपया पुढील भाग दिसतील अशी व्यवस्था केली तर ते बरे होईल.
लेखन अप्रतिम