जीवनगाणे . भाग -१
जीवनगाणे . भाग -१

जीवनगाणे . भाग -१

 भाग -१

  गाणं म्हणजे …………

 “अवखळ झरा , झुळझुळणारा वारा ,

  सोनपिवळ्या उन्हातल्या बरसणाऱ्या श्रावणधारा ” 

गाणं आणि आपलं नातचं काहीतरी वेगळ आहे  गाण्याइतकं जवळचं नातं कोणतं असूच शकत नाही अस मला वाटतं.नेहेमीच्या धकाधकीच्या जीवनात   देखील आपली साथ न सोडणार, नैराश्यातून बाहेर काढणारं,मनाला रिझवणारं स्वतःबद्दल विचार करायला   लावणारं ते आपलं गाणचं .

मनात दडलेल्या भावना शब्दरूपानं बाहेर पडतात आणि  मग तयार होतं समोरच्या व्यक्तिच्या हृदयाचा आणि मनाचा ठावं घेणारं निर्मळ भावनांचं सुरेल प्रतिक अर्थातच गाणं.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण नाना प्रकारच्या लयीमधे कधी संथ ,कधी अगदीच घाईत तर कधी मध्यम लयीत आपला दिनक्रम पूर्ण करत असतो . कधी कधी तर आपण आजुबाजुला काय चाललेय याचा काडीमात्रही विचार न करता आपल्याच तालात असतो . हे सर्व लय ,नाद आणि ताल मिळून शेवटी बनतं ते गाणं. 

म्हणजे खरचं आपण दिवसभर गाण्यातच तर जगत असतो  सकाळच्या वातावरणाची प्रसन्नता वाढवणारं मनाला ताजतवानं करणारं गाणं मग ते भक्तिगीत असो किंवा भावगीत दिवसभराची मनाची आणि काम करण्याची शरीराची ऊर्जा कायम टिकवून ठेवतं .

गाणचं कधीकधी आपल्याला आपल्या दु:खावर मात करण्याची ताकद देत असते कळत नकळत आपल्या मनावरचा ताण हलका करते आणि भरकटलेल्या आपल्या मनाला ताळ्यावर आणते .

गाणसुद्धा आपल्या मित्र मैत्रिणी सारखचं असतं. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींवरून चिडवणारे आणि रुसल्यानंतर आपला रुसवा काढून हसवणारे . बघा ना गाणं किती प्रकारची नाती निभावू शकतं वेळप्रसंगी परखड शब्दात आपली कानउघडणी करणारं आत्मपरीक्षण करायला लावणारं आणि तितक्याच प्रेमानी जवळ घेणारं गाणं अगदी आपल्या आई वडीलासारखं ,कधी हक्कानी आपल्याशी वाद घालणारं बंडखोरी करणारं आपल्या भावंडासारखं, योग्य मार्गदर्शन करून आपल्याला प्रगतीच्या उंच शिखरावर पोहचवणाऱ्या गुरुजनांसारखं .

 कधी कधी अगदी लहान मुलासारखं खोडेसाळपणा करतं म्हणजे अगदी परीक्षेत सुद्धा ते आपला पाठलाग करतं प्रश्नाचं उत्तर नेमकं आठवत नसेल तेव्हा गाणं मात्र नक्कीच आठवणारं माझ्या बाबतीत हे अगदी ठरलेलं आहे.

 गाणं आपल्याला नेहमीच मायेची ऊब देत असतं तेही न मागता आपल्या प्रेमळ आजी आजोबांसारखं. प्रत्येक नात्यात गाणं आहे हे गाणं असचं अखंड गात राहिलो तर प्रत्येक नात्याची त्यातील आपुलकीची प्रेमाची जाणीव होऊन आपल्या नात्यांची वीण अजून घट्ट होऊन नक्कीच मोठा मजबूत धागा तयार होईल मग हे वस्त्र परिधान करून आनंदाने आपण जीवन गाणे गाऊ .

 आपल्या प्रत्येक क्षणात , प्रत्येक श्वासात गाणं आहे ते आपल्याला शोधायचय त्याचा रोज रियाज करून आनंदी सुरेल गीत गात जीवनाचा प्रवास आपल्याला आवडेल त्या सुरात करायचा आहे . आपण गाण्यात नसून गाणचं आपल्यात आहे म्हणूनच .. ….

 जीवन गाणे गातचं रहावे जीवनगाणे

 झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे

हा जीवनगाणे………… (भाग १) 

 संगितोपचार आणि आपण (जीवनसंगीत) या विषयावर माझ्या लेखाचा जीवन गाणे (भाग२) जरूर वाचा आणि शेअर करायला विसरू नका.

you can watch the video about music theropy on our shabdaparna you tube  channel

https://youtu.be/eRBqSNgyDDg

 धन्यवाद.

प्रतिमा कुलकर्णी – जोशी

   

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!