Bollywood singer-शमशाद बेगम-सुंदर आवाजाची मल्लिका
Bollywood singer-शमशाद बेगम-सुंदर आवाजाची मल्लिका

Bollywood singer-शमशाद बेगम-सुंदर आवाजाची मल्लिका

Bollywood singer-शमशाद बेगम

 दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं हू तेरे पीछे अपना बना ले सरकार हाय मै तेरे कुर्बान…

 सय्या दिल मे आना रे आके फिर ना जाना रे छम छमा छम…

भारतीय सिनेमातील सर्वात सुंदर आवाजाची मल्लिका शमशाद बेगम यांचे नाव भारतातील प्रथम गायिकांमध्ये सामील होते . शमशाद बेगम चा जन्म..14 एप्रिल 1919 रोजी लाहोर येथे झाला. छोट्या शमशाद ला लहानपणापासूनच गायनाची आवड होती पण त्यांचे वडील मिया हुसेन बक्षला त्यांच्या मुलीने चित्रपटासाठी गाणी गाणे अजिबात आवडत नव्हते. 1924 साली शमशादला तिच्या शाळेतील एका स्पर्धेतून गायनाची संधी मिळाली. छोट्या शमशादचे गाणे आणि तिचा आवाज ऐकून तिची वर्गशिक्षिका तिच्यावर इतकी प्रभावित झाली की शाळेतील प्रार्थनेसाठी शमशादला सर्वात समोर उभे करून मुख्य आवाजात गायला सांगून तिच्यामागून बाकीच्यांना गायला सांगू लागली त्यानंतर वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून शमशादने प्रेक्षकांसमोर गायला सुरुवात केली.

शमशाद ची गाण्यातील आवड दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहून तिच्या वडीलांनी तिला सिनेमात गाण्यासाठी परवानगी देताना तिच्यासमोर काही अटी ठेवल्या बुरख्यात राहायचे,पडद्यामागे गायचे.,आणि स्वतःचे फोटो नाही काढून घ्यायचे..वडिलांच्या या सर्व अटी मान्य करून त्यांनी गायला सुरुवात केली.
.हम दर्द का अफसाना दुनिया को सूना देंगे…

तेरी महफिल में किस्मत आजमाकर हम भी देखेंगे घडीभर को तेरे नजदीक आकर हम भी देखेंगे..

 

 शमशाद ला के एल सैगल  यांच्यासोबत अभिनयाची संधी मिळाली असता त्यांनी वडिलांची अट लक्षात ठेवून अभिनय सोडून गायनाला  प्रथम प्राधान्य दिलं. 
ओ लेके पहिला पहिला प्यार भर के आखो मे कुमार जादूनगरी से आया है कोई जादूगर. .. 
दुनिया तुम्हारी है. .. 
30 ते 40 च्या दशकात शमशाद बेगम  ऑल इंडिया रेडिओवर गाणे 
गात होत्या. इथूनच त्यांच्या आवाजाला प्रसिद्धी मिळत गेली आणि शमशाद जींच्या आवाजाची जादू लोकांवर चढत गेली लोक त्यांच्या  जादूई आवाजाची प्रशंसा करू लागले. 
मेरे पिया गए रंगून किया है टेलीफोन तुम्हारी याद सताती है. .. 
संगीतकार गुलाम हैदरने शमशाद ची गायनाच्या क्षेत्रात खूप मदत केली पुढे 1944 मध्ये ते दोघे मुंबईला आले देशाची फाळणी झाली असता नंतर गुलाम हैदर पाकिस्तान मध्ये निघून गेले आणि शमशाद बेगम  मुंबईतच राहून गायन क्षेत्रात कार्यरत राहिल्या. इसवी सन 1960 पर्यंत त्यांनी एकापेक्षा एक हिट गाणी गायली. 
कहीपे निगाहे कहीपे निशाना. .. 
गीता दत्त,  सुरेय्या, मुबारक बेगम, नूर जहान त्यांच्याच  सोबतच्या गायिका.. 
 शमशाद बेगमच्या आवाजाची जादू प्रेक्षकांवर इतकी चढली होती की त्या काळात आशाजी आणि लताजीं ना देखील शमशाद जींच्या  शैलीत गाणे गायला लावत होते. संगीतकार नौशाद,ओ पी नय्यर आणि सचिन देव बर्मन सोबत शमशाद बेगम ने खूप हिट गाणी दिले. 
कभी आर कभी पार लागा तीरे नजर सय्या घायल किया रे तुने मोरा जिगर… 
ओ पी नय्यर तर नेहमीच म्हणत शमशादजींची आवाज मंदिरातील घंटे सारखी मंजुळ आहे. ती सरळ हृदयात घर करून जाते. 
पगडी पहन के तुर्रेदार… 
बोल तेरा नाम क्या रे…
वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी गणपतलाल बट्टोसोबत प्रेम विवाह करून चित्रपटातील गाणी गाण्याचे प्रमाण हळूहळू  कमी करून 1965 ला गायनातून निवृत्ती घेतली. 
आजही शमशाद बेगमच्या गाण्याचे रिमिक्स करून वाजवले जाऊन .. 
कभी आर कभी पार लगा तेरी नजर.
या गाण्यावर
 तरुण मंडळी  थिरकताना दिसते. 
आपल्या जादुई आवाजाने इतिहास रचणारी सुरेल आवाजाची गायिका शमशाद बेगम ने गायनाचे कुठलेही प्रशिक्षण घेतले नव्हते. त्या काळात त्यांना घरातून बाहेर पडण्यासाठीही मनाई होती. 
2009 मध्ये शमशादजींना पद्मभूषण पुरस्काराने भूषविल्या गेले. 
अशी  माझी आपल्या सर्वांची  आवडती गायिका शमशाद बेगमच्या भाषेत सांगायचे झाले तर त्या नेहमी म्हणत, 
कलाकार कभी मरते नही….. 
सौ. दर्शना भुरे हिंगोली…
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

6 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!