Mahendra Kapoor-महेंद्र कपूर-चलो एक बार फिरसे अजनबी
Mahendra Kapoor-महेंद्र कपूर-चलो एक बार फिरसे अजनबी

Mahendra Kapoor-महेंद्र कपूर-चलो एक बार फिरसे अजनबी

Mahendra Kapoor-महेंद्र कपूर

९ जानेवारी १९३४ साली जन्म झालेले महेंद्र कपूर महान गायक मोहम्मद रफीचे शागिर्द होते.गुरुला अभिमान वाटावा असेच गायन त्यांनी केले आहे.जवळपास २५००० गाणी त्यांनी गायली आहेत.
मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, मन्ना डे, तलत महमूद, हेमंत कुमार …सारख्या दिग्गज  गायकांच्या काळात महेन्द्र कपूर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
संगिताचे सोनेरी युगाचे(Golden Era) चे तेही सहभागी होते.
कल्पनेतील कल्पनेला चाहते  सत्य मानायला लागणे….हीच कलाकारांची ताकद ,जादू असते.
चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनो
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ़ देखो गलत अंदाज़ नज़रों से

लहान असतांना  ऐकलेले महेंद्र कपूरचे हे पहिले गीत.

कोणी गायले,संगीत कुणाचे हे तेव्हा कळत नव्हते पण आवाज कळला,समजला,भावला.नंतर गुमराहची बाकीची गाणी ऐकली.
नंतर समजले गुमराह सिनेमाची गाणी महेंद्र कपूरने गायले.
 टींव्ही वर सिनेमा बघायचा योग आला. प्रेमभंग झालेला तरुण आणि  तोही गायक. सुनील दत्तने पडद्यावर गायलेले हे गाणे बघतांना ह्दयात कालवाकालव होतेच
 गुमराह मधील महेंद्र कपूरने गायलेली सर्वच गीते अत्युत्कृष्ट आहेत. एकाहून एक सरस आहेत.
 साहिरने लिहिलेल्या गीतातील प्रेमभंगाचे दुःख  महेंद्र कपूरने गीतात पुरेपुर उतरवले आहे.
महेंद्र कपूरची जवळपास सगळीच गाणी हिट आहेत.
हवा ये हवा ये हवा
ये फ़िज़ा ये फ़िज़ा ये फ़िज़ा
है उदास जैसे मेरा
दिल मेरा दिल मेरा दिल
आ भी जा आ भी जा आ भी जा
आ भी जा आ भी जा आ भी जा
नायकाबरोबर आजूबाजूचे सगळे वातावरणच उदास आहे.तिने येण्यासाठी तो साद घालत आहे….
आप आये तो ख़याल-ए-दिल-ए-नाशाद आया
कितने भूले हुए ज़ख्मों का पता याद आया
आप आये   …
कधीतरी ती त्याची होती.तिच्या ओठांवर त्याचेच नाव होते,तिच्या  नजरेत त्याचे प्रेम आणि  ओठांवर त्याचे नाव होते.
जन्मभर सोबत राहण्याचे वचन तिने दिले होते….खूप  दिवसांनी तिला बघून त्याला ते सगळे आठवले. महेंद्र कपूरचा आवाज आणि सुनिल दत्तच्या चेहऱ्यावरचे भाव बघून ह्दयात कळ उठतेच. कल्पनेला चाहते  सत्य मानायला लागतात,दुःखाने व्याकुळ होतात….हीच कलाकारांची ताकद ,जादू असते
बीते हूये लमहोकीं कसक
हसन कमालने लिहिलेले हे निकाह मधील गीत.
गीत ऐकतांना डोळे पाणावतात.
 सोडून गेलेले दिवस परत फिरु शकत नाही पण आठवणी…त्या कायम असतात.सोडून गेलेले दिवस परत आणणे जितके कठीण आहे तितकेच कठीण आहे आठवणींना सोडणे…..
महेंद्रकपूरचे हे गीत आपल्याला भूतकाळात घेऊन जाते.
बदल जाये अगर माली
चमन होता नहीं खाली
१९६६ मध्ये आलेल्या बहारे फिरभी आयेगी सिनेमातील,कैफी आझमीने लिहिलेले,संगीत O,P. नय्यरचे .गाण्यातच बहारे फिर भी आयेगी….असल्यावर गाण्याच आशादायी सूर असणारच.
आशादायी,अंधारलेल्या आयुष्यात प्रकाशाचे किरणे दाखवणारे हे गीत आहे.
एकामागे एक येणाऱ्या  काळोख-उजेडापेक्षा स्वप्न,इच्छा यांचा आधार घेत जीवन जगावे असा  संदेश या गाण्यातुन दिला आहे.हेही महेंद्र कपूरने अतिशय  सुंदर गायले आहे. कामी येतील
तुम अगर साथ देनेका
१९६८ मध्ये आलेल्या हमराजचे हे गाणे साहिरने लिहिले आहे.संगीत रवीचे आहे.
तिच्यासम तीच आहे.होकाराची वाट आहे….तिने सोबत कधी सोडू नये …अशीच साथ देत रहावी…
ह्याच सिनेमातील अजून एक नितांतसुंदर गीत आहे
आँखोमें कयामत के बादल.
आँखों में क़यामत के काजल
आँखों में क़यामत के काजल
होठों पे ग़ज़ब की लाली है
महेंद्र कपूरचा मदहोश करणारा आवाज या गीताला लाभल्यामुळे गीतातील नशा वाढली आहे.
सजाके मैं तुम्हारी बाहों के….ही ओळ तर अप्रतिम गायली आहे.
किसी पत्थर की मूरत से
मोहब्बत का इरादा है
हेही हमराज मधीलच गाणे आहे.
इतके हळूवारमुलायम गाणे पत्थरला नक्कीच  पाझर फुटेल.
लाखो है यहाँ दिलवाले
१९६८ मध्ये किस्मत माधील हे गीत.एस.एच.बिहारींनी लिहिलेले हे गीत,O.P.नय्यर यांचे संगीत.
महेंद्र कपूरच्या आवाजाने सदाबहार झालेले हे गीत आजही आल्हाददायक,प्रसन्न वाटते.
मराठी गाणीही तितकीच सुंदर  गायली आहेत
 गीत – आरती प्रभु
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – महेंद्र कपूर
ती येते आणिक जाते,
येतांना कधि कळ्या आणिते.
अबोल झालीस का, साजणी ?
आज जिवांची जुळली गाणी
ग.दि.माडगूळकर यांचे गीत,राम कदमचे संगीत.
मराठी सिनेमा अपराध मधील
सूत तेचि छेडिता
स्वप्नात पाहिले जे
एन.दत्ता यांचे संगीत
मधूसुदन कालेलकर यांनी लिहिलेले हे गीत
अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान
धुंदीत गाऊ,मस्तीत राहू
मधू इथे अन् चंद्र  तिथे…..
….अशी बरीच सुमधूर  गीते गायली आहैत.
देशभक्ती गीत म्हंटले कि महेंद्र कपूरची गीते सर्वप्रथम आठवतात. देशभक्ती गीत म्हणजे महेंद्र कपूर असे समीकरणच झालयं.बाॕलिवुड मधील भारत म्हणजेच मनोजकुमारसोबत महेंद्र कपूरची जोडी जमली होती.मनोजकपूरची बहूतेक  देशभक्ती गीते महेंद्र कपूरने गायली आहैत.
 है प्रीत जहाँ की रीत सदा
 मेरे देशकी धरती
 दुल्हन चली तिन रंगोकी
 अब के बरस तुझे
 मेरा रंग दे बसंती चोला
 ए जान ए चमन
गीतातील कोणताही प्रकार उत्तम गाऊ शकणाऱ्या,हळूवार,मुलायम आवाजाची देणगी लाभलेल्या,कित्येक अजरामर गीते देणाऱ्या महेंद्र कपूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…..
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

5 Comments

  1. Mohini1408

    अप्रतिम मखमली आवाजाचे गायक.
    महेंद्र कपूर ना वाढदिवशी सलाम

Comments are closed.

error: Content is protected !!