मराठी संगीत रसिकाला आशा खाडिलकर हे नाव नव्याने सांगण्याची खरेतर काहीच गरज नाही. ११ जानेवारी हा त्यांचा जन्म दिवस १९५५ साली सांगली इथे त्यांचा जन्म झाला.
वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी बाळकृष्ण मोहिते यांच्याकडे संगीत शिक्षणाला सुरूवात केली.
श्री माधव खाडिलकर यांच्याशी विवाहा नंतर त्या मुंबई इथे स्थाईक झाल्या. व पुढचे शिक्षण माणिक वर्मा यांच्याकडे घेण्यास सुरवात केली.त्याचबरोबर इतरही दिग्गज गायकांकडून मार्गदर्शनाचा लाभ त्यांना झाला. म्हणूनच, किराणा, आग्रा, ग्वाल्हेर घराण्याचा प्रभाव त्यांच्या गायकीवर दिसून येतो.
तसेच नाट्यगीता बरोबरच, ख्याल, बंदीश, भजन, भावगीत असे सगळेच प्रकार त्यांनी लीलया सादर केले आहेत. त्याच बरोबर संगीत आराधना, संगीत कविराज जयदेव या नाटकांचे संगीत दिग्दर्शन ही त्यांनी केले आहे.
माधव खाडिलकर यांच्यासह त्यांनी ऊत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट स्थापन केला. व या माध्यमातून नवोदित कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
‘आनंदी आनंद गडे’, ‘खरा तो प्रेमा’ ‘नरवर कृष्णा समान’
अशी अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात घोळत असतात.
एक प्रख्यात गायिका,उत्कृष्ठ संगीत दिग्दर्शक, असण्याबरोबरच, त्या एक व्यक्ती म्हणुन ही तितक्याच मोठ्या आहेत हे त्यांच्या साध्या राहणीमानात दिसून येते. आणि आपल्या मोठेपणाचा कोणताही बडेजाव त्यां कधीही मिरवत नाही.कलाकाराने फक्त कलेशीच बांधिलकी ठेवावी असे त्यांचे ठाम मत आहे.
नविन पिढीला मार्गदर्शन करण्यासही त्या सदैव तत्पर असतात. कदाचीत त्यामुळेच त्यांना झी ,सा रे ग म प च्या एका पर्वात परीक्षक म्हणुन पाचारण करण्यात आले होते. तेथेही आपल्या संगित विद्वत्तेचे सवंग प्रदर्शन आजिबात न करता, स्पर्धकांना समजेल अशा सोप्या भाषेत त्या संवाद साधत.
त्यांच्या अशा यशस्वी सांगितीक कारकिर्दी बद्दल, ‘माणिक वर्मा’ ‘कुमार गंधर्व ‘ ‘स्वर रत्न’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. ते खरोखरच योग्य आहे. पण मला एक नक्कीच वाटते, की
अशा पुरस्कारांच्या मापदंडा मध्ये कोणत्याच महान कलाकाराची प्रतिभा बंदिस्त करता येत नाही.
आशा ताई त्यापैकीच एक आहेत.रसिक प्रेक्षक त्यांची गाणी गुणगुणत असतात, व त्याबाबत चर्चा करत असतात, आणि कोणताही संगीत महोत्सव त्यांच्या गाण्याशिवाय पुर्ण होत नाही, हाच त्यांना लाभलेला सर्वात मोठा पुरस्कार आहे
दीर्घ आणि निरोगी आयुष्या साठी त्याना खूप खूप शुभेच्छा.
आणी माझ्या आवडी चे त्यांचे हे गाणे….
वद जाऊ कुणाला शरण गंं
तुम्हालाही ऐकायला नक्कीच आवडेल.
वैशाली जोशी खोडवे
खूप छान
Wah सुंदर लिहिलयस
खुप सुंदर माहीती. व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभी रहाते.
सुंदर
सुंदर लिखाण
सुंदर शब्दा अंकान
Nice writeup👌👌
उत्तम लेखन