श्रीदेवी- ख्वाबो की शहजादी
श्रीदेवी- ख्वाबो की शहजादी

श्रीदेवी- ख्वाबो की शहजादी

श्रीदेवी- ख्वाबो की शहजादी

सौ. दर्शना भुरे..

हवा हवाई
अवि विवि विवि विवि
हवा हवाई अवि
विवि विवि वि

हवाहवाई गर्ल… श्रीदेवी
आज तिचा जन्मदिवस..
अभिनय आणि सौंदर्याचे मुर्तीमंत उदाहरण असलेली भारतीय सिनेमातील पहिली महिला सुपरस्टार.

१३ ऑगस्ट १९६३ साली तामिळनाडू मधील शिवकाशी येथे जन्मली. तिला घरी लाडाने अम्मो म्हणत..
बालपणापासून अभिनयाची आवड असल्याने तिने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली तिने साकारलेल्या छोट्या मुरगन ने लोकांना अक्षरश; वेड लावले होते.. अभिनय तिच्या नसानसात भरला होता.. अभिनयासोबतच तिला नृत्याचीही विशेष जाण होती.
तिच्या प्रत्येक चित्रपटातील भुमिका तिने तिच्या सहज, सुंदर अभिनयाने जिवंत केल्या .
अतिशय बोलके डोळे , चंचल,नटखट अशी श्रीदेवी..

गोरी तेरे अंग अंग मे
रूप रंग के सजे हूए कलशे..

तोहफा..चित्रपटातील तिचे हे गीत, त्यातील कलशांची सजावट पाहताना डोळ्यांचे अगदी पारणे फिटते..

श्रीदेवी चे काही निवडक गाणी..

चांदणी..

मेरे हाथो मे नौ नौ चूड़िया है
थोड़ा ठहरो सजन मजबूरिया है
मेरे हाथो मे नौ नौ चूड़िया है
थोड़ा ठहरो सजन मजबूरिया है..

लम्हे..

मोरनी बागा मा बोले आधी रातमा
छननछन चूड़ियां खनक गयी देख साहिबां
चूड़ियां खनक गयी हाथ मा..

बंजारन…

तेरी बंजारन रास्ता देखे गीत
बघ तुझा बंजारा रस्ता,
कधी येणार माझा बंजारे

कर्मा..

मैने रब से तुझे मांग लिया
आ भर दे मेरी मांग पिया आ आ

चांदणी…

तेरे मेरे होठों पे
मीठे मीठे गीत मिटवा
आगे आगे चले हम
पीछे पीछे प्रीत मितवा
तेरे मेरे होठों पे
मीठे मीठे गीत मिटवा
आगे आगे चले हम
पीछे पीछे प्रीत मितवा

नगिना…

भूली बिसरी एक कहानी
भूली बिसरी एक कहानी
फिर आयी
फिर आयी एक याद पुरानी
भूली बिसरी एक कहानी
फिर आयी एक याद पुरानी
भूली बिसरी एक कहानी
भूली बिसरी

हिर रांझा..

रब ने बनाया तुझे मेरे लिए
मुझे तेरह लिए
रब ने बनाया तुझे मेरे लिए
मुझे तेरह लिए
एक ब्नके दो टुकड़े किए
दिल तड़पाया तेरा मेरे लिए
मेरा तेरह लिया..

मि.इंडिया..

काटे नहीं कटते ये दिन ये रात
कहनी थी तुमसे जो दिल की बात
लो आज मैं कहता हूँ ई लव यू
ई लव यू ई लव यू
ई लव यू ई लव यू
ई लव यू ई लव यू
ई लव यू ई लव यू

चांदणी..

परबत से काली घटा टकराई
पानी ने कैसी ये आग लगाईं
परबत से काली घटा टकराई
पानी ने कैसी ये आग लगाईं
हाय आग लगाईं
दिल देने दिल लेने की रुत आई
परबत से काली घटा टकराई
पानी ने कैसी ये आग लगाईं
हाय आग लगाईं
हाय आग लगाईं..

खुदा गवाह..

 

हम
तू मुझे क़ुबूल
इस बात का गवाह खुदा
खुदा गवाह
तू मुझे क़ुबूल
इस बात का गवाह खुदा
खुदा गवाह

जितेंद्र सोबत तिच्या जोडीने त्या काळात अक्षरश:धुमाकूळ घातला होता..

जुली मध्ये बालकलाकाराची भुमिका साकारल्यानंतर अभिनेत्री म्हणून तिचा जितेंद्र सोबत चा आलेला पहिला चित्रपट..
हिंमतवाला…त्यानंतर तिने
मवाली,तोहफा,घर संसार, अक्कलमंद,जेस्टीस चौधरी,औलाद, हिंमत और मेहनत,सुहागन, धर्म अधिकारी

असे अनेक चित्रपट केले जितेंद्र सोबत तिची जोडी सुपरहिट ठरली..त्यांच्या सर्व चित्रपटाला
प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते..

यासोबतच तिने अभिनेता
मिथुन चक्रवर्ती सोबत.. जाग उठा इंसान, वतन के रखवाले..
अनिल कपूर सोबत.. जुदाई , जुदाई, लाडला, लम्हे, रुप की रानी चोरी का राजा, हिर रांझा

जॅकी श्रॉफ सोबत.. कर्मा, जवाब हम देंगे..

राजेश खन्ना सोबत.. मकसद, मास्टरजी, नया कदम

अमिताभ बच्चन…  बंजारन, खुदा गवाह,गिरफ्तार

सनी देओल सोबत.. नगिना चित्रपटाचा दुसरा भाग निगाहे साकारला
तिची रजनीकांत आणि सनी देओल सोबत तिने साकारलेली चालबाज चित्रपटातील भोळसट अंजू आणि चालाक मंजू ची दुहेरी भूमिका केलेली खूप नावाजली..

कमल हसन सोबत..सदमा
गोंविदा सोबत.. गैरकानूनी

अक्षय कुमार सोबत… मेरी बीबी का जवाब नही..  जॅकी श्रॉफ सोबत जवाब हम देंगे ,अनिल कपूर सोबत रूप की रानी चोरो का राजा सलमान खान सोबत चंद्रमुखी. चांदका तुकडा, प्रेम पुजारन..चित्रपट केले..
तिच्या कारकिर्दीत ऋषी कपूर सोबत तिच्या भूमिका असलेल्या चांदणी, नगिना सारख्या चित्रपटांनी
भरघोस यश मिळवून दिले..

तिच्या चित्रपटांची यादी तशी खुप मोठी आहे.. पैकी तिचे काही निवडक चित्रपट..

तोहफा.. दोन बहिणींची कथा असलेल्या या चित्रपटात आपल्या बहिणी साठी आपल्या प्रियकराचा त्याग करणाऱ्या बहिणी ची भूमिका श्रीदेवी ने साकारली.. यात तिच्या बहिणी च्या भुमिकेत जया प्रदा होती.

खुदा गवाह… महानायक अमिताभ बच्चन सोबत दुहेरी भुमिका असलेला तिचा हा चित्रपट.. याची शुटींग काबूल मध्ये करण्यात आली..
या चित्रपटात अमिताभ समोर तिच्या वाट्याला खूप छोटी भूमिका आली होती. तरी या छोट्याशाच भुमिकेमुळे तिच्या अभिनयाची भरपूर प्रशंसा झाली.

जुदाई.. यात एका लालची  महिलेची भूमिका तिने साकारली.. अशी महिला जी स्वतः च्या च नवऱ्याचे पैशाच्या लोभापायी दुसऱ्या महिलेशी लग्न लावून देते.. भरपूर पैसे मिळाल्या चा आनंद ते नवरा दुरावल्यानंतर चा पश्चात्ताप यातील एकूण तिचा अभिनय खरोखरच वाखाणण्याजोगा आहे..

चालबाज… यातील अंजु मंजू ची रजनीकांत, सनी देओल सोबतची दुहेरी भूमिका.. यातील उत्कृष्ट अभिनयासाठी तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..

नगिना.. या चित्रपटात तिने इच्छाधारी नागिन भूमिका साकारली.. अभिनेता ऋषी कपूर सोबतचा तिचा हा एक सुपरहिट चित्रपट.. यातील ..
मै तेरा दुष्मन तु मेरा दुष्मन.
हे गाणे आयकॉनिक मानले जाते.. यातील तिचे नृत्य ही अप्रतिम..

मिस्टर इंडिया.. एका अदृश्य व्यक्ती सोबत रोमान्स करण्याचा अप्रतिम अभिनय.. यात तिच्या सोबत अनिल कपूर होता.

लम्हे… अनिल कपूर सोबत चा अजून एक चित्रपट.. यातील अतिशय सुंदर अशी साकारलेली तिची दुहेरी भूमिका.. हा चित्रपट सर्व वयाच्या वर्गातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला..
यातील अभिनयासाठी तिला दुसऱ्यांदा फिल्म फेअर अवार्ड मिळाला..

चांदणी.. ऋषी कपूर,विनोद खन्ना सोबत चा प्रेम त्रिकोण असलेला चित्रपट… प्रेम, रोमान्स, विरह अशा विविध छटा असलेला तिचा अभिनय तिच्या करिअर मधील चांदणी हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला.. यातील
मेरे हातो मे नौ नौ चुडिया है.. हे गाणे प्रत्येक लग्नाच्या वेळी वाजवले जाते..
या चित्रपटात गायक जॉली मुखर्जी सोबत तिने स्वतः चांदणी ओ मेरी चांदणी.. हे गीत गायले..

सदमा… यातील स्मृतीभ्रंश झालेली एकवीस वर्षीय तरूणी अचानक सात वर्षांच्या बालिकेसारखी वागू लागते.. यातील तिचा हुबेहूब अभिनय.. शेवटी तिची स्मृति वापस आल्यावर ती ट्रेन मध्ये बसली असताना कमल हसन चा बाललीला करून तिला ओळख देण्यासाठी केलेला अयशस्वी प्रयत्न.. प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या चित्रपटासाठी तिला प्रथम फिल्म फेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

हिम्मतवाला… तिच्या सुपरहिट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट.. यातील श्रीमंत, घमेंडी मुलीच्या भुमिकेत ती भाव खाऊन जाते. यातील अभिनयामुळे तिची गणना सुपरहिट अभिनेत्री मध्ये होवू लागली.

बोनी कपूर सोबत लग्न केल्यानंतर दोन मुलींची आई बनलेल्या श्रीदेवी ने सुमारे पंधरा वर्षांनंतर
इंग्लिश विग्लिश …चित्रपटातून पुनरागमन करित आपल्या अभिनयाची पुन्हा एकदा चुणूक प्रेक्षकांना दाखवली.. तिचा इंग्लिश विग्लिश हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला..

मॉम… चित्रपट तिच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात शेवटच्या चित्रपट ठरला..

अवखळ, गोड हास्य असणारी आपल्या मनमोहक अदांनी लोकांना घायाळ करणारी सर्वांची लाडकी अशी अभिनेत्री श्रीदेवी आपल्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांच्या नेहमीकरीता स्मरणात आहे आणि यापुढेही राहिल.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!