कविता कृष्णमुर्ती-Kavita Krushnamurthi
गोड आवाजाची देणगी मिळालेली गायिका कविता कृष्णमुर्तीचा जन्म 25 जानेवारी 1958 रोजी तमिळ अय्यर परिवारात झाला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायिका म्हणून एका पेक्षा एक सरस गाणी गायली आहेत. सोबतच त्यांना शास्त्रीय गायनाचे ही उत्तम ज्ञान आहे .
अवघ्या आठ वर्षाची असतांना कविताजीने संगीत स्पर्धेमधे गोल्ड मेडल जिंकले.
कविता कृष्णमुर्तींनी गायलेले देशभक्ती पर गीत
ऐ वतन तेरे लिए…
आजही 15ऑगस्ट, 26जानेवारीला ठिकठिकाणी वाजवले जाते. त्यांच्या गीताशिवाय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आजही अपूर्ण आहे.
गुम हैं किसी के प्यार में दिल सुबह श्याम…
कोणाच्यातरी आठवणीने हृदय दिवसरात्र तडपत आहे.
तुझ्या प्रेमात हृदय हरवून बसलेला मी तुझ्या आठवणीने दिवसरात्र तळमळत आहे… अशा कल्पित आशयाचे गीत कविताजीने मधुर आवाजात गायले.
प्यार झुकता नहीं या चित्रपटातील
तुमसे मिलकर ना जाने क्यो और भी कुछ याद आता है …
हे कविताजींचे गायलेले गाणे.. पडद्यावर आपल्याला लहान मुलाच्या तोंडून ऐकायला मिळते . कविताजींचे लहान मुलाच्या आवाजातील हे ह्रृदयस्पर्शी गीत आजही मनाला प्रसन्न करते..
लताजी आणि आशाजी च्या काळात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी कविता जी ची गायकी इतकी आकर्षक, विलक्षण, अभूतपूर्व , सुमधूर, परिपूर्ण, परिपक्व आहे की,
2005 मधे कविता जी ला पद्मश्री पुरस्कार मिळाला…
1995 ते 1997 च्या दरम्यान चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार त्यांनी प्राप्त केले.
साठव्या दशकाच्या मध्या पर्यंत….
” इंटर मिनिस्ट्री ” स्पर्धे मधे त्यांना बरेच पदक मिळाली.
सत्तर ते नव्वद च्या दशकात… छत्तीसहून अधिक भाषांमधे पन्नास हजारहून अधिक गाणे त्यांनी रेकाॅर्ड केली.
बांग्ला फिल्म “श्रीमान पृथ्वीराज” चे
“”मेरा प्यार हैं तेरा वादा l
तु ये वादा तोड न देना l
मैने तेरे लिए दुनिया छोडी l
तु मुझको छोड न देना l””
या गीता ने लताजी सोबत कविता जी ची गायन करीयर ची सुरुवात 1971साली झाली.
“तुमसे मिलकर ना जाने क्यो “….
हे गीत गाजल्यानंतर कविता कृष्णमुर्ती यांनी मागे वळून पाहिले नाही.
त्यांच्यासाठी “प्यार झुकता नहीं ”
चित्रपटातील हे गीत “मैलाचा दगड” ठरले.
त्यानंतर “हवाहवाई “ “करते है हम प्यार मि. इंडिया से”...या गीताने त्यांना वेगळी ओळख मिळाली.
देशभक्ती गीत, प्रेरणा देणारे गीत, प्रेम गीत, भक्ति गीत, अंगाई गीत, शास्त्रीय गायन , भजन, गज़ल, लोक गीत कोणत्याही प्रकारचे आणि विविध भाषेत गायनावर प्रभुत्व असलेली ….शास्त्रीय संगीतात तरबेज असलेली…विविध भाषेत हजारो गाणी स्वतः च्या नावावर करणारी…
… कोकीळ आवाजाचे दैवी वरदान लाभलेल्या प्रतिभावंत कविता कृष्णमुर्ती…आज त्यांच्या वाढदिवसाची औपचारिकता साधून त्यांच्या सुमधुर आवाजातील माझी आवडती आणि आपल्या सर्वांच्या काही लोकप्रिय गीतांवर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्युली ज्युली जाॅनी का
दिल तुमपे आया ज्युली
तेरे लिये चढ जाऊ सुली
तु ही तो मेरी जान हैं जान हैं जान हैं l
“जीते है शान से” चित्रपटातील हे गीत… इंदिवर ने अप्रतिम शब्दात रचलेल्या ह्या गीताला अनु मलिक यांनी संगीत दिले आहे.
नायक आणि नायिका एकमेकांना बेधडक पद्धतीने प्रेमाची स्वीकृती देणाऱ्या आशयाचे हे गीत …प्रेक्षकांना पार्श्वगायिके कडून गायनाची अपेक्षा असते तसेच कविता जी ने ह्या गीताचे आपल्या उत्साही बेधडक अंदाजात सादरीकरण केले. कविताजी चे हे गीत ऐकतांना पाय आपोआपच सुर ताल वर थिरकु लागतात.
हवा हवाई…
1987 साली प्रदर्शित झालेला मिस्टर इंडिया चित्रपटातील
“हवा हवाई” ….
हे गीत बाॅलिवुडमधिल एक धमाकेदार गीत आहे.
अनिल कपूर, श्री देवी, अमरीश पुरी यांच्या मुख्य भुमिका असलेल्या मिस्टर इंडिया चित्रपटातील हे शानदार गीत कविता कृष्णमुर्ती यांच्या उत्साही, विलक्षण, भव्य आवाजात रेकॉर्ड केले आहे.
हे गीत ऐकल्यावर खरोखरचं असे वाटते की, कविता जी च्या आवाजाने तर सर्व रेकाॅर्ड तोडले आहेत…
विषेश म्हणजे हे गीत ऐकल्यावर कविता जी च्या चमकत्या आवाजाचे प्रदर्शन होते.
पहले प्यार का पहला गम…
“पापा कहते है” चित्रपटातील हे गाणे जावेद अख्तर यांच्या परिपक्व लेखनीने केलेली लाजवाब शब्दरचना असून राजेश रोशन यांच्या संगीताने सजविले आहे. हे सुंदर गीत चित्रपटात नायक जुगल हंसराज आणि नायिका मयुरी कांगो वर दर्शवले आहे.
या ह्रदयस्पर्शी गीतात कविता कृष्णमुर्ती ने आपल्या भावना अशा पद्धतीने भरल्या की, त्यांच्या ह्रदयातुन निघालेली मंत्रमुग्ध करणारी मनमोहक गायकी चाहत्यांच्या ह्रदयापर्यंत आपसुकच पोहोचते.
असे वाटते की, हे गीत कविताजी साठीच लिहीले आहे. कविताजी प्रत्येक गीत स्वतः च्या परिपक्व गातात.
दिल की आवाज हूं मैं…..
या गजल मधे…. ती तिच्या प्रियकराकडून शोधत असलेलं प्रेम व्यक्त करते.
गझल ची सुरुवात कविता कृष्णमुर्तींनी दिर्घ आलापने केली असून गायकीवर कमालीचे नियंत्रण आहे.
ही भावनात्मक गज़ल ऐकतांना प्रेक्षकांना कविता जी च्या परिपक्व शास्त्रीय गायनाचा परिचय मिळतो.
ही तणावमुक्त करणारी गज़ल ऐकायला सुरूवात केली की, श्रोता शेवटपर्यंत ऐकणारच ऐवढे सुखदायक अप्रतिम संस्मरणीय गायकीचे सादरीकरण अनुभवास मिळते ही या ग़ज़ल ची खासियत आहे.
“प्यार हुआ चुपके से”..
1994 साली आलेल्या “1942 a love story” सिनेमातील जावेद अख्तर यांनी लिहिलेले आर डी बर्मन चे संगीत असलेले हे गीत मनिषा कोईराला वर दर्शवले आहे.
यात पहिल्यांदा प्रेम अनुभवत असलेल्या प्रेयसी च्या मनाची व्यथा दर्शवली आहे.
तिला तिच्या प्रेमाच्या भावनांची जाणीव होते तेव्हा तिला आश्चर्य वाटते की, तिला काय झाले…
अशा आशयाचे गीत ….मनाला स्पर्शून जाणाऱ्या या गीताला प्रशंसनिय शब्दांनी सजवावे असेच हे गीत कविता जी ने आपल्या मधुर आवाजात गायले केले आहे. विशेष म्हणजे कविताजीचा आवाज मनिषा कोईराला तंतोतंत जुळतोय.
रिम झिम रिम झिम..
मुकुल दत्त जी यांच्या शब्दात लिहिलेले….आर डी बर्मन जी यांच्या संगीत ने सजवलेले…हे गीत 1994 साली प्रदर्शित झालेल्या “1942-A love story” चित्रपटातील आहे.
हे बाॅलिवुड चे सदाबहार मनातील कल्पनेने भरलेले गीत आहे.
या गीताची रचना जितकी आकर्षक मनाला भावणारी , मनाला स्पर्शून जाणारी कविता कृष्णमुर्ती यांची गायकी आहे.
अशी ही जन्मतः कोकीळ आवाजाची देणगी लाभलेली ज्ञानसम्राज्ञी कविता कृष्णमूर्ती यांना आपल्या सर्व चाहत्यांकडून कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
स्मिता औरंगाबादकर.
छान लिहिले
खुप छान स्मिता
कविता कृष्णमूर्ती माझी fvrt आहे.
अप्रतिम लिखाण 👌
सुंदर लिहिले