बदला कथा
शिकार ममतेची
पोलिस इन्स्पेक्टर पाटील टेंशन मध्ये बसून होते.कारणही तसेच होते.खून होवून दोन महिने झाले होते पण खून कोणी केला हे कळत नव्हते.सर्व चौकशी करून झाली होती.सर्वांच्या जबानी घेतल्या कसून विचारपूस केली पण काहीच फायदा नाही झाला.आजूबाजूच्या गावात तळ ठोकून बसले ज्या लोकांवर संशय वाटत होता त्यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलविन्यात आले पण काहीच हाताला लागत नव्हते.
गाव बरेच मोठे होते.काॕलेज शाळा सर्व काही होते.
गावात बरीचशी श्रीमंत घराणे होते.गावात त्यांच वर्चस्व राहायचे.मग काय ओघाणेच राजकारण चालायचे.कोण कुणाच दुष्मन बनेल सांगता येत नव्हते.आतून काही असले तरी वरून गावात शांतता होती.अशातच गावाला आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळाला होता.गावात आबासाहेबांच खूप प्रस्थ होते.गावातील लोक त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते.घरातही त्यांचा तोच दबदबा होता.त्यांचा शब्द हा शेवटचा असायचा.कावेरी ही त्यांची मुलगी सुंदर
सुशिल ती शहरात शिकायला होती.सुट्टीत घरी येत होती.
आबासाहेबांच कावेरीवर खूप प्रेम होते.प्रत्येक इच्छा तिची पूर्ण करायचे.बस फाट्यावर थांबायची.दर वेळी तिला घेण्यासाठी गाडी जायची.पण आज गाडी अचानक बंद पडली.आॕटो सतत सुरू असायचे त्यामूळे काळजीचे कारण नव्हते.येईल आॕटो करून असे म्हणून आबासाहेब निश्चित झाले.
वेळ चालली होती. बस येऊन गेली होती.पण कावेरी घरी पोहचली नव्हती.सर्व काळजीत पडले.ती बसमधून फाट्यावर ऊतरली असे कंडक्टर सांगत होता. त्या दिवसी गावात एकच आॕटो सुरू होता.दुसरा आॕटोवाला गावाला गेला होता.रात्र सरत होती.धीर द्यायला गावातील बाया बापड्या जमा झाल्या होत्या. आबासाहेब गरिबासा देवदूत होते.पोलिस आले..चौकशी सुरू झाली. .मैत्रीणींची चौकशी करण्यात आली.काही प्रेमप्रकरण दिसते काय हे बघून झाले.कुणाशी दुष्मनी….भांडण…राग ..द्वेष सगळे बघून झाले पण संशयास्पद काही आढळून आले नाही.
दिवस निघाला तसा गावात एकच गोंधळ उडाला.
जवळच्या तलावात कावेरीचा देह तंरगत होता.जवळच काॕलेज बँग दिसत होती.सारे गाव दुःखाने व्याकूळ झाले होते.आबासाहेब व त्यांच्या पत्नीचा आक्रोश बघवत नव्हता.पोलिस आले पुन्हा चौकशी सुरू झाली .कावेरीसारख्या निष्पाप मुलीला कोणी मारले असेल.ती स्वतः पाण्यात उतरली असेल का.?पाण्याजवळ नेऊन पाण्यात लोटले अशी शंका पोलिस काढीत होते.आबासाहेब बोलण्याचा परिस्थितीत नव्हते पण पोलिसांचा नाइलाज होता.गावात वरून शांतता होती पण आतून कुणी सूड घेतला असेल अशीही शंका पोलींसाना वाटत होती.आठवा आबासाहेब…कुणाशी काही वैर पोलिस विचारत होते.कधीतरी कुणाशी भांडणजमिनीवरून पैशावरून.हो आबासाहेब आजकाल लोक डोक्यात राग धरून बसतात. कुणाला कुणाचे चांगले नाही दिसत.
नाही साहेब माझी कुणाशी दुश्मनी नाही.सार गाव माझ्यावर जीव टाकते.आयुष्यात कुणाला दुखवले नाही.
माझी कावेरी पाणी पाहून खूप घाबरायची.पाण्यापासुन दूरच राहायची.एकदा आम्ही तिच्या मामाकडे मुंबईला गेलो होतो तेव्हा समुद्र बघून कावेरीला चक्कर आली होती.तलावाजवळ तर जाणे शक्यच नाही.पण तिला तलावाला लागूनच असलेली टेकडी खूप आवडायची.आम्ही ती आली कि टेकडीवर फिरायला जात होतो टेकडीवर पण ती मागेच उभी राहायची कारण जास्त समोर गेले तर तलावात पडायची भिती असायची.तिला टेकडीवरून दिसणारा सुर्यास्त आवडायचा.
चौकशी सुरू होती.आॕटोवाल्यांना बोलावले.एक आॕटोवाला त्या दिवशी गैरहजर होता.तो खरे बोलत होता तो खरेच गावात नव्हता. दुसऱ्याची कसून चौकशी सुरू होती.बस माझ्यासमोर आली होती पण कावेरीताईकडे लक्ष नव्हते.त्या दिवशी बाजूच्या गावात यात्रा होती म्हणून बहुतेक लोक यात्रेत गेले होते.त्या दिवशी रस्ता सामसूम होता.पोलिसांना त्याच्यावर संशय घेण्यासारखे काही वाटत नव्हते.तिच्या शरीरावर एकही जखम नव्हती.तिने काही विरोध केला असेल अशी एकही
खूण आढळून आली नाही.टेकडीवरून कुणीतरी ढकलून दिले यावर पोलिसांच एकमत झाले.पण कुणी केले हे सर्व पोलिस चक्रावून गेले होते.
दिवस चालले होते.आबासाहेब रोज पोलिस स्टेशनला जात होते. एक दिवस अचानक पाटील साहेबांचा फोन आला. आबासाहेब लवकर या आरोपीला अटक करण्यात आली आहे.तडक ते गेले रागाने त्यांचा चेहरा लालबुंद दिसत होता.आरोपीला एकदा कधी बघतो असे त्यांना झाले होते.त्याला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसनार नाही अशी शपथ त्यांनी घेतली होती. ते पोहचले.
आरोपीच्या पिंजऱ्यात त्यांना सुलोचना दिसली.त्यांच्या पायाखालील जमीन सरकू लागली.
ती हसत होती.माझा बदला पूर्ण झाला आबासाहेब आणि ती अजून जोरात हसायला लागली ..आणि एका क्षणात रडायला लागली.
आबासाहेब तुम्ही सुलोचनाबद्दल आम्हाला काहीच सांगितले नव्हते.पाटील साहेब ओरडले.
अहो साहेब ती माझा भुतकाळ होती.ती तिच्या संसारात सुखी आहे.आम्ही ऐकमेंकाना केव्हाच विसरलो आहोत
ती असे का करेल.ते पण इतक्या वर्षांनी.ती खोटं बोलत आहे.
नाही आबासाहेब ती खरे बोलत आहे.आम्ही खूप चौकशी केली.हाती काही सापडले नाही. मग आम्ही मुंबईला गेलो.तुमचे जुने मित्र शोधून काढले.त्यांच्याकडून तुमची आणि सुलोचनाची प्रेमकहानी समजली.नंतर आम्ही तिच्या घरी गेलो.मोठा बंगला पण घरात कुणी नाही.बेल वाजवली सुलोचनाने दार उघडले.आम्हाला बघताच ती घाबरली.तिच्या हावभावावरून आम्हाला सर्व काही कळले होते.जवळच एक पेपर पडून होता त्यात कावेरीचा फोटो होता आजूबाजूला तुम्ही दोघे उभे काॕलेजमधील कार्यक्रमाचा फोटो होता.कावेरीचा फोटो विद्रुप केला होता जणू काही तिला खूप मोठी शिक्षा करायची होती सुलोचनाला.
आबासाहेब खरे बोला आता पाटील साहेबांनी सुचना केली.
साहेब मी मामाकडे शिकायला होतो.सुलोचना घराकडे राहायची शिवाय एकाच काॕलेजमध्ये होतो.सोबत फिरणे सुरू होते.कधी बाहेरगावी फिरायला जात होतो.लग्नाचे आम्ही ठरविले होते.अशातच सुलोचनाला दिवस गेले.लवकरच लग्न करायचे म्हणून वडिलांना विचारले पण मामाच्या मुलीशीच लग्न करायचे यावर ते ठाम होते.तसे वचन त्यांनी मामाला दिले होते.माझा नाइलाज झाला.मी लग्न केले.सुलोचनाला वडिल नव्हते.घरची परिस्थिती गरिब.बिचारी सारखी रडत राहायची.तिने मला माफ केले होते. लोकांना कळू नये म्हणून त्यांनी मुंबई सोडली जवळच एका गावात ते आले तिथे ती राहू लागली.तिचे दिवस भरत आले होते.माझे नाव लावून तिला दवाखान्यात भरती केले.सुंदर मुलगी झाली आम्हाला.तिला मुलगी मरण पावली असे सांगितले कारण तिच्या आईला तिची सुटका करायची होती.तिचे लग्न करायचे होते. मी ती मुलगी अनाथालयात दिली. त्यावेळी माझी बायको बांळतपणाला माहेरी आली होती.
तेवढयात सुलोचनाला पोलिस घेऊन आले.साहेबराव तू मला बरबाद केले.आईने जबरदस्तीने मोठया वयाच्या पण खूप श्रीमंत माणसाशी लग्न करून दिले.ते त्याचे तिसरे लग्न होते. मला खूप मोठी शिक्षा मिळाली.मी आई नाही बनले.नवरा लवकरच मरून गेला.हे सर्व आबासाहेबामुळे घडले.मी ऐकटी..एकाकी राहत होते.मनात सतत बदल्याची भावना येत होती.असेच पेपरमध्ये यांचा फोटो बघितला किती हसरे कुटुंब दिसत होते.मला आयुष्यात काहीच मिळाले नव्हते. आई बनली पण मुलगी मला सोडून गेली.मुलीचा चेहरा बघायला नाही मिळाला.मी आबासाहेबाचा बदला घेणारच हे मी ठरविले.मी ऐकटीच का शिक्षा भोगू?चोवीस तास मनात तोच विचार.
अशातच मला तिकडे कोर्टाचे काम आले.लग्नानंतर मी तिकडे शेती घेतली होती.माझ्या मावशीचे गाव होते. तिकडे मी गाडी घेऊन निघाली .बसमधून कावेरी उतरत होती.फोटोवरून मी तिला ओळखले.मी ड्रायव्हरला वापस पाठविले.तिच्या मागे..मागे मी पायी निघाली.यात्रा असल्यामुळे रस्ता सामसुम होता. गाडी रस्त्याने असेल असे तिला वाटले.मी तिच्याशी ओळख केली.खूपच गोड वाटत होती कावेरी.टेकडीवरचा सूर्यास्त बघायला आम्ही टेकडीवर गेलो.दूरवर कोणीही दिसत नव्हते.मी जोराने तिला धक्का दिला.ती तलावात पडली मी वेगाने निघाली. फाट्यावर मिळेल त्या बसमध्ये बसली.
सुलोचना काय केले?.अग द्वेषाच्या आगीत तू स्वतःच्या मुलीला मारले.ती आपली मुलगी होती.तुला मुलगी झाली आणि पंधरा दिवसांनी मला मुलगी झाली.ती पोटातच मरण पावली.लता बेशुद्ध होती.तिची तब्येत खूप नाजूक होती माझे बाळ…माझे बाळ कुठे आहे अशी बडबड करत राहायची. ती पुन्हा आई होणार नाही हे डाॕक्टरने सांगितले होते.मला काय करावे हे कळत नव्हते.मी गेलो अनाथालयात आणि कावेरीला घेऊन आलो..तिला तिच्या जवळ ठेवली. कुणालाही काही समजले नाही.हळूहळू लताची तब्येत सुधारित होती.आम्हाला दुसरे मुल होणार नव्हते.लता तर एक क्षण कावेरीला सोडत नव्हती.आता तर ती वेडी बनली आहे.सारखी कावेरी …कावेरी म्हणून बडबडत असते.
सुलोचना बेशुद्ध झाली होती.तिने तिचा गुन्हा कबूल केला.पोलिसांनी तिला गजाआड केले.सर्वांच्या डोळ्यांत पाणी होते.अशी केस आयुष्यात प्रथमच बघितली होती.पाटील साहेब विचार करत बसले.या प्रकरणात चूक कोणाची…हे ठरवित होते
.खरी गुन्हेगार तर सुलोचना होतीच. पण आबासाहेब ही अप्रत्यक्ष गुन्हेगार होते.
भयंकर
बापरे,किती भयानक.
लिखाण उत्तम
भयंकर
Mast