उलटे पडले फासे
१४-उलटे पडले फासे-marathi story series
मयंक आणि मी लहानपणापासून सोबतच वाढलो.
आमच्या वयात असलेल्या कमी अंतरामुळे आम्ही चुलतभाऊ कमी आणि मित्र जास्त होतो. आमची आजी असेपर्यंत आमचे एकत्र कुटुंब होते.आजी गेल्यावर संपत्तीच्या वाटण्या झाल्या. आणि आम्ही दुसऱ्या घरी राहायला गेलो. तेव्हा आम्ही काॕलेजमध्ये होतो.एवढी सोबत,एकत्र घालवल्यावर आम्ही कंपनीही सोबतच काढायचे ठरवले…..
आता पुढे वाचा.
उलटे पडले फासे-marathi story series
मानकर सर– मग भागीदरी तुटण्याचे कारण?
शाश्वत अग्रवाल- आमच्या आयडीयाज् मॕच होत नव्हत्या.
मयंक नेहमी परंपरागत पद्धतीने काम करायच्या प्रयत्नात असायचा आणि मला नवीन पद्धत,नवीन कल्पना भूरळ घालायच्या.
म्हणून आम्ही प्रेमानेच भागीदारी तोडली.मी माझा हिस्सा घेतला आणि ही कंपनी उभारली.
मानकर सर- अच्छा.पण मयंकच्या कंपनीपुढे तुमची कंपनी अगदीच लहान वाटतेयं,त्याचे दुःख असणारच.
शाश्वत सर-नाही सर, उलट माझ्या कंपनीचा जम बसवायला मी मयंकचा सल्ला घेत होतो. दोघात स्पर्धा नव्हती.
मानकर सर- बरं तुमच्या सांगण्यावर या मी विश्वास ठेवतो.
शिखाशी तुमचे कसे संबंध होते?
या अचानक आलेल्या प्रश्नावर शाश्वत गडबडला.
शाश्वत अग्रवाल–आम्ही तिघे एकाच काॕलेजमध्ये होतो,
मला शिखा आवडायची पण तिला मयंक आवडतो हे समजल्यानंतर अर्थातच मी बाजूला झालो.
शाश्वतच्या बोलण्यावर मानकरसरांचा विश्वास बसला.
पण मग कोण असेल खुनी?
ते पुन्हा एकदा शाश्वतच्या कंपनीत गेले.
शाश्वतकडून त्यांना विश्वासने कंपनीच्या हिशोबात अफरातफरी केली म्हणून त्याला काढण्यात आले एवढी माहिती मिळाली.
विश्वासकडे संशयाची सुई फिरवायला एवढी माहिती पुरेशी होती.
फाईलमधला विश्वासचा पत्ता घेऊन मानकरसर चौकशीसाठी त्याच्या घरी पोहचले.पण तो पाच वर्षापूर्वीच
ते घर सोडून निघून गेला होता. शेजाऱ्यांकडून त्याचा दुसरा पत्ता घेऊन मानकरसर तिथे पोहचले.
विश्वास एका चाळीत गरीबीत जगत होता.
तो कामावरुन घरी येईपर्यंत मानकरसर तिथेच थांबले.
तो घरी येताच चौकशी सुरु केली.
विश्वास परिस्थितीने गांजला होता.जास्त चौकशी नाही करावी लागली.मानकर सर त्याला पोलिसस्टेशनमध्ये घेऊन गेले. त्याने लगेच कबुलीजवाब दिला.
मयंकने नौकरीवरुन काढल्याने विश्वासचे आयुष्य उध्वस्त झाले होते. त्याला दुसरीकडे नौकरी मिळाली नाही.जे काम मिळेल ते रोजंदारीने करावे लागत होते.
घरच्या जबाबदाऱ्या आणि पैशांची आवक यांचा मेळ बसत नव्हता.
पैशांची नड जाणवली कि त्याच्या मनात मयंकबद्दल राग खदखदायचा. मला रस्त्यावर आणणाऱ्या मयंकचे आयुष्य संपवायलाच हवे असे विचार नेहमी डोक्यात येत राहायचे.
मॕनेजर विश्वास नाईकनंतर कामावर आले
मानकरसरांनी विश्वासची रवानगी जेलमध्ये केली आणि तडक मनिषला भेटायला गेले. त्याला विश्वासबद्दल सर्व सांगितले.
आज विनयची जमानत झाली.
रमा जेलमध्ये विनयला भेटल्यानंतर गावी गेली होती.आईला इकडे घेऊन आली.कॕन्सरचे आॕपरेशन केले.खर्च राहूल आणि मनिषने केला.
अर्थात स्वाभिमानी रमा त्या खर्चाची परतफेड करणार होती.आॕपरेशन झाल्यावर आईला घेऊन परत गावी गेली.तिला राहूलच्या घरी राहणे योग्य वाटत नव्हते.
आज विनयची जमानत झाल्यावर त्याला भेटायला ती परत आली.
विनय राहूलच्या घरी आला आला तेव्हा रमा त्याच्या स्वागतासाठी हजर होतीच.
विनय आला.राहूलचा थाटमाट बघून त्याला त्याचे खूप कौतुक वाटले.घरात एका खोलीमध्ये राहूलचे दहावीपासूनचे सगळे सर्टीफिकेटस् लावून होते. ते बघून विनयचे डोळे पाणावले.
कुशाग्र बुद्धी असूनही विनय दहावी पास नव्हता.नशिबाने सगळे फासे उलटे टाकले होते.
त्याच्या वयाच्या सोळा वर्षापर्यंत आनंदात नांदणारे घर अचानक उध्वस्त झाले.
आणि आजही आयुष्याच्या विचित्र वळणावर तो येऊन पोहचला होता.दैव पुढे अजून काय दाखवणार देव जाणे…असे पुटपुटत विनय त्या खोलीच्या बाहेर आला.
रमाला त्याची व्यथा समजत होती.
त्यादिवशी पेपरमध्ये बातमी वाचली मयंकला बिझनेसमॕनचा अवार्ड मिळाला होता. मनात अस्वस्थता होतीच त्याच्याबद्दल.
आता विश्वासने ती अस्वस्थता कृतीत आणायची ठरवले.
पैशांची नड होतीच. आधी चोरी करायची आणि नंतर मयंकला संपवायचे असा विचार करुन विश्वास मयंकच्या घरात गेला. आधी कंपनीत कामावर असल्यामुळे मयंकच्या घरी त्याचे जाणे येणे होते.त्यामुळे घरात सहजतेने जाऊ शकला.
बेडरुममध्ये असलेले सोने आणि पैसे एका बॕगमध्ये भरले.
मयंक गाढ झोपेत होता. चेहऱ्यापर्यंत पांघरुण घेऊन होता,त्याचा चेहरा दविश्वासने झोपेत असलेल्या मयंककडे
विश्वास बॕग घ्यायला वळणार तेवढ्यात बेडरुमच्या खिडकीतून कोणीतरी आत आल्याचा आवाज त्याला आला.घाबरुन बॕग न घेता तो पळून गेला.
म्हणजे विश्वासच्या हातून चोरी झाली पण खूनी कोणी दुसराच आहे हे नक्की होते.
कोण असेल?
मानकरसरांनी विश्वासची रवानगी जेलमध्ये केली आणि तडक मनिषला भेटायला गेले. त्याला विश्वासबद्दल सर्व सांगितले.
आता पुढे काय….वाचत रहा उलटे पडले फासे.
…..प्रिती…
कथामालिका कशी वाटत आहे?
Comment मधून अवश्य कळवा.
Next part
https://marathi.shabdaparna.in/१५-उलटे-पडले-फासे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
Previous PART
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा





Mast
खूप आभार