भाग-२०
उलटे पडले फासे
खुनाची केस-मराठी कथामालिका
तुमचा मुलगा शेखर नाही का घरात?
नाही.तो मित्रांसोबत महाबळेश्वरला गेला दोन दिवसांसाठी.
चला येतो मी.
असे म्हणत मानकर सर उठले.आणि पोलिसस्टेशनला गेले.पण त्यांच्या डोक्यात आता विचारांचे नवीन चक्र सुरु झाले होते. शेखरचे वागणे त्यांच्या मनात संशय निर्माण करत होते.
शेखर मयंकच्या घरी उशिरा का पोहचला असेल?
हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता. त्याला असलेल्या पैशांच्या गरजेमुळे संशय बळावत होता.
पुढील आठवड्यात मयंकच्या खुनाची केस कोर्टात जाणार होती.त्याआधी हाती धागेदोरे येणे आवश्यक होते.
दोन दिवसांनी ते परत शेखरची चौकशी करायला त्याच्या घरी गेले.शेखर नुकताच परतला होता.
मानकरसरांना बघून तो चपापला.
साहेब तुम्ही?
हो.जरा चौकशी करायची होती.
आईबाबा दिसत नाही आहेत?
आहेत आत. बोलवू का त्यांना?
नको.आज तुझ्याशीच काम आहे.
शेखरचे घाबरलेपण मानकरसरांच्या लक्षात आल्याशिवाय राहले नाही. थंडीतही त्याला घाम आला होता.
अरे शेखर,किती घाबरलास? मी तर अजून चौकशीही सुरु केली नाही.
साहेब माझी चौकशी? कशाला? आणि मी कशाला घाबरु?
तू प्रश्न विचारु नकोस.मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे.
मानकरसरांच्या आवाजात जरब होती.
विचारा साहेब.शेखर चाचरत बोलला.
मयंकचा खून झाला तेव्हा तू कुठे होतास?
घरीच होतो साहेब.
मग शिखा खून झाल्यावर तिथे गेली तेव्हा तू सोबत नव्हता.
साहेब, मी झोपून होतो. झोपायला उशीर झाला .
आईबाबा,शिखाताई गेले होते तेव्हा मी गाढ झोपून होतो.मला कोणी आवाजही दिला नाही.
शेखर आता आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे देत होता.
मग दहा पंधरा मिनिटांत तू गाढ झोपेतून कसा जागा झाला? आणि लगेच मयंकच्या घरी पोहचलास?
शेखर थोडा विचारात पडल्यासारखा वाटला.पण लगेच बोलला,
साहेब बहूतेक मी गाडीच्या आवाजाने उठलो.
शिखाताईने गाडी काढली.बंगल्याच्या चौकीदाराला उठवायला गाडीचा हाॕर्न वाजवला असणार.
अच्छा हाॕर्नच्या आवाजाने तू उठला आणि लगेच मयंकच्या घरी पोहचला.
तुला कसे समजले ते मयंकच्या घरी गेल्याचे?
मी हाॕर्नच्या आवाजाने उठलो आणि गाडी कोणी नेली ते बघायला बाहेर आलो.कोणी दिसले नाही म्हणून शिखाताईला फोन केला.आणि मग तिच्या घरी गेलो.
शेखर सफाईने उत्तरं देत होता. पण त्याने तिला फोन केला हे शिखाने सांगितले नव्हते.
शेखर खोटा बोलत आहे हे मानकरसरांनी ताडले.
पुढील आठवड्यात मयंकच्या खुनाची केस कोर्टात जाणार होती.त्याआधी हाती धागेदोरे येणे आवश्यक होते.
पोलीसस्टेशनमध्ये चौकशीसाठी यावे लागेल आताच
असे म्हणून शेखरला गाडीत बसवले.आणि त्याला घेऊन पोलीसस्टेशनवर गेले.
आता मात्र शेखर खूप घाबरला.
पोलीसस्टेशनमध्ये शेखरची कसून चौकशी सुरु झाली.त्याचा मोबाईल तपासला.त्यात त्याने त्या रात्री शिखाला फोन केल्याचा पुरावा नव्हता.
मानकर सरांनी त्याच्याकडून त्याचा गुन्हा वदवून घेतला.
क्रमशः
….प्रिती….
Previous Part
Next Part
प्रिय वाचक,कथामालिका कशी वाटत आहे….आवर्जून सांगा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.
तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा







छान
सुंदर कथा