४-marathi story series-उलटे पडले फासे
४-marathi story series-उलटे पडले फासे

४-marathi story series-उलटे पडले फासे

marathi story series-उलटे पडले फासे
आतापर्यंत  आपण वाचले,
राहूल,मनिष,विनयची होस्टेलमध्ये भेट होते,सोबत राहता राहता तिघांची मैत्री होते.घर,आई-वडील,बहीण यांच्यावर प्रेम करणारा,हूशार,अभ्यासू विनय  राहूल-मनिषपेक्षा  वेगळा आहे.त्याच्या आईवडिलांनी केलेले संस्कार तो कायम लक्षात ठेवून वागतो.
आता तिघेही होस्टेलवर बऱ्यापैकी रमले.
आता पुढे वाचा
भाग-४
marathi story series उलटे पडले फासे
दिनांक 
झाली परीक्षा सुरु.आज मराठीचा पेपर होता.चांगला गेला.
पुरवणी पण घेतली.
जुन्या शाळेत सगळ्यात चांगला निबंध मी लिहित होतो.आमच्या बाई वाचून दाखवायच्या वर्गात.
आणि  मुलांना म्हणायच्या विनयसारखा निबंध लिहायला शिका.
स्वतःचाच स्वतःला अभिमान वाटायचा.
 उद्या English चा पेपर आहे.
 व्याकरण जरा वाचायला लागेल. पुढे सगळा अभ्यास  इंग्रजीत राहील.म्हणून इंग्रजीवर भर द्यावा लागेल.
 बाकी तर तसा झाला आहे अभ्यास.
दिनांक 
संपली आज परीक्षा.सुटल्यासारखे वाटत आहे.सगळे पेपरस् चांगले गेले.फक्त गणिताची थोडी भीती वाटते. वेळ नाही पुरला मला.
राहूलचे गणित पक्के आहे एकदम.
उद्या जायचे आहे वापस.मनिष,राहूल पण चालले.राहूलची 
दिवाळी जोरदार असते.
त्याच्या दोन बहिणी अर्चना,अपर्णा,आई,वडील.शिवाय त्याचे नातेवाईकही जवळ राहतात.सगळे मिळून दिवाळी साजरी करतात.असे राहूल सांगत होता.त्याला घरी जायची खूप  घाई झाली.
मनिषचे तसे नाही.घरी तो आणि आई दोघेच.त्याचे बाबा अपघातात गेले आणि आईचे काका आणि आत्याशी संबंध बिघडले. आईचे माहेर लांबचे.त्यामुळे मामा,मावशी यांच्याशी जवळीक कमीच.
तो घरच्यापेक्षा इथेच जास्त रमतो.आईसाठी जावे लागते त्याला.
एकटा असल्यामुळे तो आईचा लाडोबा आहे.
आणि राहूलही दोन बहिणीनंतर झाल्यामुळे विशेष लाडका.
लाडामुळेच जरा बिघडले असतील.
(हे वाचून मनिष गालातच जरा हसला. त्या लहान वयातही विनय स्वभावाचे किती छान विश्लेषण करायचा.)
दोघेही झोपलेत ते.
मी पण झोपायला हवे.
बाबा येतील.तयारी करुन ठेवावी लागेल.बॕगमध्ये आधी डायरी भरतो. 
बाबांनी सर्वात चांगली दिलेली भेट म्हणजे ही डायरी.
माझ्या मनातले सगळे याच डायरीत मिळणार.
पुढे मी कधी आत्मचरीत्र लिहिले तर ही डायरीच उपयोगी पडेल.
दिनांक 
आलो आज. होस्टेलवर गेल्यापासून घरी आलो की पाहूण्यासारखी वागणूक मिळते. आजी तर फारच लाड करते. आईने पण काय काय बनवले फराळाचे.
आणि विणाही आधीसारखी भांडत नाही माझ्यासोबत.दादा
दादा करत मला होस्टेलच्या गमती विचारत राहते.
माझे मित्र  पंकज,विजय किती आनंदी झाले मला भेटून.
पंकज आणि विजय थोडे मनिष,राहूलसारखेच वाटतात कधीकधी.
तेही अभ्यासापेक्षा बाहेर भटकणे,मस्ती करणे यातच रमतात. मला कधी कधी पुस्तकातला किडा म्हणून हिणवतात. पण दोघेही मनाने खूप  चांगले आहेत.माझ्यावर प्रेम आहे त्यांचे.
दिनांक
संपत आल्या सुट्ट्या. उद्या जायचे आहे परत होस्टेलवर.
सगळ्यांसोबत पटपट दिवस गेले.पण आता जातांना वाईट नाही वाटत.राहूल आणि  मनिष पण चांगले मित्र बनले माझे. बाकी वर्गात पण काही मित्र  आहेत.
दिनांक
आलो आज वापस.राहूल,मनिषही आले.
आम्ही तिघांनीही दिवाळीचा भरपूर फराळ आणला.
आईला तर माझ्यासोबत काय देवू नि काय नाही असे होते.
उद्या सहामाहीचा निकाल येणार आहे.थोडी भीती  वाटत आहे निकालाची.
दिनांक
निकाल आला. मी वर्गात पहिला आलो.बाबांना आजच पत्र पाठवून कळवले.राहूल जेमतेम पास झाला आणि  मनिष तर गणितात चक्क नापास झाला. 
दोघेही बुद्धीने चांगले आहेत पण अभ्यासात लक्ष नाही.
त्यांच्या आईवडीलांनीही त्यांच्यासाठी काही स्वप्ने बघितले असतील. का ही दोघेही अभ्यास करत नाहीत?
बघतो.उद्या पुन्हा एकदा समजवतो.
दिनांक
आज मनिष आणि राहूल दोघांबरोबरही माझा वाद झाला.आज त्यांच्यातील एक अवगुण माझ्या लक्षात आला.
राहूल मधल्या सुट्टीत मुलांच्या बॕगमधले चुकून खाली पडलेले सामान उचलतो आणि  स्वतःच्या बॕगमध्ये टाकतो आणि  मनिष त्याला पाठीशी घालतो.
आज माझ्यासमोरच.आमच्या समोर बसणाऱ्या  संतोषच्या कंपासमधला बेंचवर पडलेला पेन राहूलने बॕगमध्ये टाकला.
मी मनिषला हे सांगितले तर तो म्हणाला मला माहित आहे.
(मनिष—अरे आम्ही ते सगळे गमतीत करायचो.)
संतोषने बाईंकडे तक्रार केली.पण मनिषने राहूल माझ्यासोबत होता.त्याने असे काही केले नाही असे खोटेच सांगून राहूलला वाचवले.
(मनिष– अरे मित्र आहोत ना आम्ही. एकमेकांविरुद्ध कसे बोलणार?)
क्रमशः
आधीच्या भागाची लिंक

https://marathi.shabdaparna.in/३-उलटे-पडले-फ

Next Part
प्रिय वाचक, कथामालिका कशी वाटत आहे.तुमच्या सुचना अवश्य कळवा.
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!