६-मराठी रहस्यकथा-उलटे पडले फासे
६-मराठी रहस्यकथा-उलटे पडले फासे

६-मराठी रहस्यकथा-उलटे पडले फासे

नवीन शाळेत सोबत असणारे  विनयचे मित्र मनिष आणि वाईट मार्गाला लागतात.विनय त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो का? 
मराठी रहस्यकथा-उलटे पडले फासे
दिनांक
मी रोज दोघांनाही समजवतो.पण पालथ्या घडावर पाणी असा प्रकार होत आहे.
राहूलचे चोऱ्या करणे सुरुच आहे.त्याच्या जवळ सगळे असूनही तो चोऱ्या करतो हेही आश्चर्यच आहे.आणि मनिष कायम खोटे बोलून त्याला साथ देतो.
यांना घरी कळले तर आईवडिलांना काय वाटेल हा विचार नसेल येत का?
दिनांक 
उद्या परवा दोन दिवस सुट्ट्या आहेत.मनिष खूप दिवसांपासून मागे लागला माझ्या आणि राहूलच्या त्याच्या गावी चला म्हणून. मी बाबांची परवानगीही घेऊन ठेवली.उद्या जायचे म्हणतोय. मला फिरायला खूप आवडते पण मी जास्त कुठे फिरलो नाही.
आमच्याजवळ खूप पैसे नाहीत शिवाय बाबा सुट्ट्यांमध्येपण अभ्यास करायला लावतात. ते म्हणतात अभ्यास केलेला कधी वाया जात नाही.
पण मी ठरवले,मोठा झालो कि मोठी गाडी घ्यायची आणि आजी,आईबाबा,विणाला घेऊन लांबदूर फिरायला जायचे.
माझी राहली पाहिजे तोपर्यंत.
दिनांक
आज दुपारी मनिषच्या गावावरुन वापस आलो.गाव सुरेख आहे त्याचा माझ्या आजोळसारखा. सगळी छोटी छोटी घरे.झाडे आणि डोंगरांनी वेढलेले गाव. झूळुझूळु वाहणारी नदी,पक्ष्यांची किलबिल. खूप प्रसन्न वाटले तिथे.आज दुपारी परतलो मनिषच्या घरुन. घर छन आहे.छोटेसे,टूमदार.घरापुढे मोठे  वडाचे झाड आहे.त्याच्या पारंब्या पकडून खूप  झूललो आम्ही,मजा आली.
मनिषची आई किती प्रेमळ आहे.त्यांनी आम्हाला त्यांची शाळा पण दाखवली. शाळेत मुले त्यांच्याशी खूप आदराने वागात होती.मला खूपदा वाटले मनिषच्या आईला त्याच्या वाईट सवयीबद्दल सांगावे.पण नाही सांगू शकलो.
मी पहिला आलो म्हणून माझे खूप  कौतुक करत होत्या.आणि मनिषकडे लक्ष  ठेवत जा….वगैरे सांगत होत्या.
एका आदर्श शिक्षिकेचा मुलगा असूनही मनिष चोऱ्या करतो ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे.
दिनांक
कमी मार्कस्  आणि नापास झाल्यामुळे राहूल आणि मनिष दोघेही थोडा थोडा  अभ्यास करायला लागले. चोरीची वाईट सवयही कमी झाली होती.चारपाच दिवसात  अजयच्या दफ्तरातील चाॕकलेटची चोरी केलीच पण.दोन चाॕकलेटस् होत्या.राहूलने चोरुन एक स्वतः खाल्ली आणि एक मनिषला दिली.
माझे दोन्ही मित्र कधी सुधरणार देव जाणे.
दिनांक 
आज बाबांना पत्र पाठवले. मनिषच्या गावी गेलो होतो ,मजा आली,अभ्यास करतो,नीट जेवतो….वगैरे सांगितले.
विणा सातवीत आहे. तिलाही पुढे शिक्षणासाठी इथेच यायचे आहे. तिला डाॕक्टर बनायचे आहे.बाबा म्हणतात मी चांगला शिकलो,अभ्यास केला तर ती पण करेल.
मी दादा आहो नं तिचा. ती अभ्यासात हूशार आहेच. चवथीत स्काॕलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिली आली होती.
मी पण सातवीच्या स्काॕलरशिपच्या परीक्षेत पहिला आलो होतो.
बाबांचे मित्र ,शेजारी,नातलग सगळे बाबांना म्हणतात.
‘मनोहरराव  पैशांची नसली तरी बुद्धीची श्रीमंती आहे तुमच्या घरात.’ बाबा पण मग अभिमानाने आमच्याकडे बघतात. आईबाबा,आजी सगळ्यांना आमच्या बुद्धीचे कौतुक  आहे.
दिनांक 
मनिष आणि  राहूल खूप जवळचे वाटतात मला.जशी विणा वाटते तसेच. त्यांनीही खूप अभ्यास करावा.आणि मोठे  झाल्यावर अभिमानास्पद काहीतरी करावे.
त्यांच्या चोरीच्या सवयीचे घरी कळले तर आईवडील किती 
दुखावले जाणार.
मनिषच्या आईला तर मनिषशिवाय कोणीही नाही.
देवा,माझ्या मित्रांना सद्बुद्धी दे. 
दिनांक
आज बाबांचे पत्र आले.खाली थोडे आईने पण लिहीले.
सहामाही परीक्षेत जसा पहिला आला तसाच वार्षिक परीक्षेत ही यावा असे दोघांनीही लिहिले.वार्षिक परीक्षा जवळ येत होती. मी तर नियमितपणे अभ्यास करतो.
 काल शाळेत  वक्तृत्व स्पर्धा झाली.आश्चर्य म्हणजे मनिष माझा मित्र त्यात दुसरा आला.किती मुद्देसुद बोलत होता.मला खूप अभिमान वाटला मनिषचा.
दिनांक 
राहूलचे बाबा आज आले होते होस्टेलवर आणि शाळेतही.
 सरांना पण भेटले.मग आमच्या खोलीत येऊन राहूल समजवत होते.तुला चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला.घरापासून दूर राहतो.तुझी आई तुझ्या आठवणीत रडत राहते. तू अभ्यास करुन काही बनला नाहीस तर सर्व  व्यर्थ जाणार….
 यंदा पास तरी हो नाहीतर नववीतच राहशील.
  राहूल खाली मान घालून ऐकत होता.
दिनांक
वार्षिक परिक्षा जवळ येत होती. पुढे  दहावी महत्वाची असल्यामुळे  नववीत हुशार मुलांनाच पास करणार असे बाईंनी सांगितले.ते ऐकून राहूल,मनिष घाबरले.
अभ्यास वाढवला आता त्यांनी.
मी पण माझा अभ्यास करुन त्यांचे पाठांतर करुन घेऊ लागलो.गणित समजवून सांगत होतो.मला माझ्यासोबत तेही दहावीत असावेत असे वाटत होते.आम्ही आता जास्तवेळ सोबत राहत होतो.
क्रमशः
Next Part
Previous Link
राहूल,मनिष आणि विनय तिघांचेही आयुष्य असेचच राहणार कि  बदलणार…..वाचत रहा उलटे पडले फासे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!